स्तोत्रं १३:१-६

  • यहोवाच्या तारणाची वाट पाहणं

    • हे यहोवा, कुठपर्यंत (१, २)

    • यहोवा भरपूर आशीर्वाद देतो ()

दावीदचं गीत. संचालकासाठी. १३  हे यहोवा, तू कुठपर्यंत मला विसरशील? कायमचं? तू कधीपर्यंत माझ्यापासून आपलं तोंड फिरवशील?*+  २  मी कधीपर्यंत असा चिंतेत राहू? कधीपर्यंत दररोज मनात दुःख बाळगू? माझा शत्रू कुठपर्यंत माझ्यावर विजयी ठरेल?+  ३  हे यहोवा, माझ्या देवा, माझ्याकडे पाहा आणि मला उत्तर दे. माझ्या डोळ्यांना प्रकाश दे, नाहीतर मी मरून जाईन.*  ४  “मी त्याला हरवलं,” असं माझ्या शत्रूला म्हणू देऊ नकोस. मी पडल्यामुळे माझ्या विरोधकांना आनंदी होऊ देऊ नकोस.+  ५  मी तर तुझ्या एकनिष्ठ प्रेमावर भरवसा ठेवतो;+तुझ्या तारणाच्या कार्यांमुळे माझं मन हर्षित होईल.+  ६  मी यहोवासाठी गीत गाईन कारण त्याने मला भरपूर आशीर्वाद दिले आहेत.+

तळटीपा

शब्दशः “आपला चेहरा लपवशील?”
शब्दशः “मरणात झोपी जाईन.”