स्तोत्रं १३८:१-८
दावीदचं स्तुतिगीत.
१३८ मी अगदी मनापासून तुझी स्तुती करीन.+
मी इतर देवांच्या देखत,तुझं गुणगान गाईन.*
२ तुझ्या एकनिष्ठ प्रेमामुळे आणि विश्वासूपणामुळे,मी तुझ्या पवित्र मंदिराकडे* वळून दंडवत घालीन+आणि तुझ्या नावाची स्तुती करीन.+
कारण तू आपले शब्द आणि आपलं नाव,इतर सर्व गोष्टींपेक्षा महान केलं आहेस.*
३ मी हाक मारली, त्या दिवशी तू मला उत्तर दिलंस;+तू मला धैर्यवान आणि ताकदवान बनवलंस.+
४ हे यहोवा, पृथ्वीवरचे सर्व राजे तुझी स्तुती करतील;+कारण तू दिलेली अभिवचनं त्यांनी ऐकली आहेत.
५ ते यहोवाच्या अद्भुत कार्यांचं गुणगान करतील,कारण यहोवा अत्यंत गौरवशाली आहे.+
६ यहोवा उच्च स्थानावर असूनही, नम्र लोकांकडे लक्ष देतो,+पण गर्विष्ठ लोकांना तो जवळ करत नाही.*+
७ मी संकटात सापडलो, तरी तू माझ्या जिवाचं रक्षण करशील.+
माझ्या संतापलेल्या शत्रूंविरुद्ध तू आपला हात उगारशील;तुझा उजवा हात मला वाचवेल.
८ यहोवा माझ्यासाठी असलेले त्याचे सर्व संकल्प पूर्ण करेल.
हे यहोवा, तुझं एकनिष्ठ प्रेम सर्वकाळ टिकून राहतं;+तू आपल्या हातांनी केलेली कार्यं सोडून देऊ नकोस.+
तळटीपा
^ किंवा कदाचित, “इतर देवांना झुगारून मी तुझ्यासाठी संगीत तयार करीन.”
^ किंवा “पवित्र ठिकाणाकडे.”
^ किंवा कदाचित, “तू तुझे शब्द तुझ्या नावाहूनही महान केले आहेत.”
^ शब्दशः “दुरून ओळखतो.”