स्तोत्रं १४५:१-२१
दावीदचं स्तुतिगीत.
א [आलेफ ]
१४५ हे माझ्या देवा, माझ्या राजा, मी तुझा महिमा करीन,+मी सदासर्वकाळ तुझ्या नावाचं गुणगान करीन.+
ב [बेथ ]
२ मी दिवसभर तुझी स्तुती करीन;+मी सदासर्वकाळ तुझ्या नावाचं गुणगान करीन.+
ג [गिमेल ]
३ यहोवा महान आणि सर्वात स्तुतिपात्र आहे;+त्याची महानता कल्पनेपलीकडे* आहे.+
ד [दालेथ ]
४ लोक पिढ्या न् पिढ्या तुझ्या कार्यांची स्तुती करतील;ते तुझ्या पराक्रमांचं वर्णन करतील.+
ה [हे ]
५ तुझ्या वैभवाच्या गौरवी ऐश्वर्याचं ते वर्णन करतील+आणि मी तुझ्या अद्भुत कार्यांवर मनन करीन.
ו [वाव ]
६ ते तुझ्या विस्मयकारक कार्यांबद्दल* सांगतील,आणि मी तुझी महानता घोषित करीन.
ז [झाइन ]
७ तुझा अपार चांगुलपणा आठवून, ते तुझी भरभरून स्तुती करतील,+तुझ्या नीतिमत्त्वामुळे ते आनंदाने जल्लोष करतील.+
ח [हेथ ]
८ यहोवा दयाळू, करुणामय* आणि सहनशील आहे;+त्याचं एकनिष्ठ प्रेम अपार आहे.+
ט [तेथ ]
९ यहोवा सर्वांना चांगुलपणा दाखवतो,+त्याची दया त्याच्या सर्व कार्यांतून दिसून येते.
י [योद ]
१० हे यहोवा, तुझी सर्व कार्यं तुझा महिमा करतील,+तुझे एकनिष्ठ सेवक तुझं गुणगान करतील.+
כ [खाफ ]
११ ते तुझ्या राज्याचा गौरव घोषित करतील+आणि तुझ्या सामर्थ्याबद्दल सर्वांना सांगतील.+
ל [लामेद ]
१२ ते लोकांना तुझ्या पराक्रमांबद्दल;+तुझ्या राज्याच्या गौरवी ऐश्वर्याबद्दल सांगतील.+
מ [मेम ]
१३ तुझं राज्य सर्वकाळाचं आहेआणि तुझी सत्ता पिढ्या न् पिढ्या टिकून राहते.+
ס [सामेख ]
१४ पडत असलेल्या सर्वांना यहोवा सावरतो;+तो वाकलेल्या सर्वांना उभं करतो.+
ע [आयन ]
१५ सर्व जीव आशेने तुझ्याकडे पाहतात;तू त्यांना योग्य वेळी अन्न पुरवतोस.+
פ [पे ]
१६ तू आपली मूठ उघडून,प्रत्येक जिवाची इच्छा पूर्ण करतोस.+
צ [सादे ]
१७ यहोवाचे सर्व मार्ग नीतिमान आहेत+त्याच्या सर्व कार्यांत तो एकनिष्ठ आहे.+
ק [खुफ ]
१८ यहोवा त्याला हाक मारणाऱ्या सर्वांच्या जवळ आहे;+प्रामाणिकपणे* त्याला हाक मारणाऱ्या सर्वांच्या तो जवळ आहे.+
ר [रेश ]
१९ त्याचं भय मानणाऱ्या सर्वांची इच्छा तो पूर्ण करतो;+तो त्यांची मदतीची याचना ऐकून त्यांना सोडवतो.+
ש [शिन ]
२० यहोवा आपल्यावर प्रेम करणाऱ्या सर्वांचं रक्षण करतो,+पण सगळ्या दुष्टांचा तो सर्वनाश करेल.+
ת [ताव ]
२१ मी यहोवाची स्तुती गाईन;+प्रत्येक जिवाने त्याच्या पवित्र नावाची सदासर्वकाळ स्तुती करावी.+
तळटीपा
^ किंवा “समजण्यापलीकडे.”
^ किंवा “सामर्थ्याबद्दल.”
^ किंवा “कृपाळू.”
^ किंवा “खऱ्या मनाने.”