स्तोत्रं ३२:१-११
दावीदचं गीत. मस्कील.*
३२ सुखी आहे तो माणूस, ज्याच्या अपराधांची क्षमा करण्यात आली आहे आणि ज्याचं पाप झाकण्यात आलं आहे!+
२ सुखी आहे तो माणूस, ज्याला यहोवा दोषी ठरवत नाही+
आणि ज्याच्या मनात कपट नाही!
३ मी गप्प राहिलो, तेव्हा दिवसभर कण्हून कण्हूनमाझी हाडं झिजू लागली.+
४ कारण रात्रंदिवस तुझ्या नाराजीचं* दडपण माझ्या मनावर होतं.+
उन्हाच्या तापाने पाणी सुकून जातं, तशी माझी ताकद नाहीशी झाली. (सेला )
५ शेवटी मी माझं पाप तुझ्याजवळ कबूल केलं;मी माझी चूक लपवली नाही.+
मी म्हणालो: “मी यहोवाजवळ आपले अपराध कबूल करीन.”+
तेव्हा तू माझ्या चुकांची, माझ्या पापांची क्षमा केलीस.+ (सेला )
६ म्हणूनच, तू सापडू शकतोस तोपर्यंत+प्रत्येक एकनिष्ठ माणसाने तुला प्रार्थना करावी.+
मग महापूर आला, तरी त्याला त्याचा स्पर्श होणार नाही.
७ तू माझा आश्रय आहेस;तू मला संकटापासून सुरक्षित ठेवशील.+
सुटकेच्या जल्लोषाने तू मला वेढशील.+ (सेला )
८ तू म्हणालास, “मी तुला सखोल समज देईन आणि ज्या मार्गाने तू गेलं पाहिजे तो तुला दाखवीन.+
मी तुझ्याकडे लक्ष देऊन* तुला सल्ला देईन.+
९ बुद्धी नसलेल्या घोड्यासारखे किंवा खेचरासारखे होऊ नका;+त्यांना आवरण्यासाठी लगाम किंवा दोरी लागते,तेव्हाच ते तुमच्याजवळ येतात.”
१० दुष्टाला पुष्कळ दुःखं भोगावी लागतात;पण यहोवावर भरवसा ठेवणाऱ्यावर तो आपल्या एकनिष्ठ प्रेमाची पाखर घालतो.*+
११ नीतिमान लोकांनो, यहोवामुळे आनंद करा आणि हर्षित व्हा;सरळ मनाच्या लोकांनो, आनंदाने जयजयकार करा.
तळटीपा
^ शब्दार्थसूची पाहा.
^ किंवा “हाताचं.”
^ किंवा “दृष्टी लावून.”
^ किंवा “एकनिष्ठ प्रेमाच्या सावलीत ठेवतो; एकनिष्ठ प्रेमाने वेढतो.”