स्तोत्रं ५०:१-२३

  • देव एकनिष्ठ आणि दुष्ट यांच्यात न्याय करतो

    • बलिदानाच्या आधारावर देवाचा करार ()

    • “देव स्वतः न्याय करणारा आहे” ()

    • सर्व प्राणी देवाचे आहेत (१०, ११)

    • देव दुष्टांचे दोष प्रकट करतो (१६-२१)

आसाफचं+ गीत. ५०  सर्व देवांपेक्षा श्रेष्ठ देव यहोवा+ बोलला आहे;तो पूर्वेपासून पश्‍चिमेपर्यंत राहणाऱ्‍यापृथ्वीच्या सर्व रहिवाशांना बोलावतो.  २  सौंदर्याने परिपूर्ण अशा सीयोनमधून+ देवाचं तेज चमकतं.  ३  आपला देव येईल; तो शांत राहू शकत नाही.+ त्याच्यापुढे भस्म करणारा अग्नी आहे+ आणि त्याच्यासभोवती मोठं वादळ घोंघावतं.+  ४  आपल्या लोकांचा न्याय करण्यासाठी+ तो उंच आकाशाला आणि पृथ्वीला बोलावून म्हणतो:+  ५  “बलिदानाच्या आधारावर माझ्याशी करार करणाऱ्‍या,+माझ्या एकनिष्ठ लोकांना माझ्यापुढे जमवा.”  ६  आकाश देवाचं नीतिमत्त्व घोषित करतं,कारण देव स्वतः न्याय करणारा आहे.+ (सेला )  ७  “माझ्या लोकांनो, ऐका. मी तुमच्याशी बोलेन;हे इस्राएल, मी तुझ्याविरुद्ध साक्ष देईन.+ मी देव, तुझा देव आहे.+  ८  मी काही तुझ्या बलिदानांमुळे,किंवा सतत माझ्यापुढे असलेल्या तुझ्या होमार्पणांमुळे तुला ताडन करत नाही.+  ९  तुझ्या घरचा बैल घेण्याची,किंवा तुझ्या मेंढवाड्यातले बकरे घेण्याची मला गरज नाही.+ १०  कारण, रानातले सर्व जंगली पशू माझे आहेत;+हजारो पर्वतांवरचे प्राणीही माझेच आहेत. ११  पर्वतांवरच्या प्रत्येक पक्ष्याबद्दल मला माहीत आहे;+रानात राहणारे असंख्य प्राणी माझेच आहेत. १२  मला भूक लागली, तर मी तुला थोडंच सांगेन? कारण, उपजाऊ जमीन आणि तिच्यावर असलेलं सगळं काही माझं आहे.+ १३  मी बैलांचं मांस खाईन का? मी बकऱ्‍यांचं रक्‍त पिईन का?+ १४  देवाला उपकारस्तुतीचं बलिदान दे;+सर्वोच्च देवाला केलेले नवस फेड.+ १५  संकटाच्या काळात मला हाक मार.+ म्हणजे मी तुझी सुटका करीन आणि तू माझा गौरव करशील.”+ १६  पण देव दुष्टाला म्हणेल: “माझ्या नियमांबद्दल सांगण्याचा,+किंवा माझ्या कराराबद्दल+ बोलण्याचा तुला काय हक्क? १७  कारण तू शिक्षेचा* तिरस्कार करतोस,आणि माझ्या शब्दांकडे तू सतत पाठ फिरवतोस.*+ १८  एखाद्या चोराला पाहिल्यावर, तू त्याला चांगला समजतोस,*+तू व्यभिचार करणाऱ्‍यांची संगत धरतोस. १९  तू आपल्या तोंडाने वाईट गोष्टी पसरवतोस,तुझ्या जिभेवर सतत फसवणुकीच्या गोष्टी असतात.+ २०  तू बसून आपल्याच भावाविरुद्ध बोलतोस;+आपल्या सख्ख्या भावाचे दोष तू दुसऱ्‍यांना सांगतोस.* २१  तू या गोष्टी केल्या, तेव्हा मी गप्प राहिलो;त्यामुळे तुला वाटलं, की मीही तुझ्यासारखाच आहे. पण आता मी तुला ताडन करीन,मी तुझ्याविरुद्ध माझा वाद मांडीन.+ २२  देवाला विसरणाऱ्‍यांनो, जरा या गोष्टीकडे लक्ष द्या;+नाहीतर, मी तुमचे फाडून तुकडे करीन, तेव्हा तुम्हाला सोडवणारा कोणीही नसेल. २३  जो उपकारस्तुतीचं बलिदान अर्पण करतो तोच माझा गौरव करतो,+आणि जो योग्य मार्गाने चालत राहील,त्याचं मी तारण करीन.”+

तळटीपा

किंवा “शिक्षणाचा.”
शब्दशः “माझे शब्द मागे टाकून देतोस.”
किंवा कदाचित, “त्याच्यासोबत जातोस.”
किंवा “बदनामी करतोस.”