स्तोत्रं ५१:१-१९
दावीदचं गीत. संचालकासाठी. दावीदने बथशेबासोबत+ संबंध ठेवल्यावर संदेष्टा नाथान त्याच्याकडे आला, त्या घटनेनंतर दावीदने हे गीत रचलं.
५१ हे देवा, तुझ्या एकनिष्ठ प्रेमापोटी माझ्यावर कृपा कर.+
तुझ्या अपार दयेमुळे माझे अपराध पुसून टाक.+
२ माझा दोष अगदी पूर्णपणे धुऊन टाक+आणि माझ्या पापापासून मला शुद्ध कर.+
३ कारण माझ्या चुका मी चांगल्या ओळखून आहे,माझं पाप सतत माझ्या डोळ्यांपुढे असतं.*+
४ मी तुझ्याविरुद्ध, हो इतर कोणाहीपेक्षा* तुझ्याविरुद्ध पाप केलंय;+तुझ्या नजरेत जे वाईट, ते मी केलंय.+
म्हणून तुझं बोलणं नीतीचंआणि तुझा न्याय योग्य आहे.+
५ पाहा! मी तर जन्मतःच दोषी आहे;माझ्या आईला गर्भ राहिला, त्या क्षणापासूनच मी पापी आहे.+
६ हे देवा, प्रामाणिक हृदय पाहून तुला आनंद होतो;+माझ्या हृदयाला बुद्धीची शिकवण दे.
७ मला माझ्या पापापासून शुद्ध कर,* म्हणजे मी शुद्ध होईन.+
मला धुऊन स्वच्छ कर, म्हणजे मी बर्फाहून शुभ्र होईन.+
८ मला सौख्याचे आणि आनंदाचे शब्द ऐकू दे,म्हणजे तू चिरडलेली माझी हाडं हर्ष करतील.+
९ माझ्या पापांपासून आपलं तोंड फिरव,+माझे सर्व अपराध पुसून टाक.+
१० हे देवा, माझ्यात शुद्ध मन उत्पन्न कर,+माझ्यात एक नवीन, स्थिर मनोवृत्ती निर्माण कर.+
११ आपल्यापुढून मला घालवून देऊ नकोस;तुझी पवित्र शक्ती* माझ्यापासून काढून घेऊ नकोस.
१२ तुझ्या तारणाचा आनंद मला पुन्हा अनुभवू दे;+तुझ्या आज्ञा पाळण्याची इच्छा माझ्यात जागृत कर.*
१३ मी अपराध्यांना तुझे मार्ग शिकवीन,+म्हणजे पापी लोक तुझ्याकडे परत येतील.
१४ हे देवा, माझं तारण करणाऱ्या देवा,+ मला रक्ताच्या दोषापासून मुक्त कर,+म्हणजे मी आनंदाने सर्वांना तुझ्या नीतीबद्दल सांगीन.+
१५ हे यहोवा, माझे ओठ उघड,म्हणजे मी आपल्या तोंडाने तुझी स्तुती गाईन.+
१६ तुला बलिदान नकोय, नाहीतर मी ते दिलं असतं;+होमार्पणाने तुला आनंद होत नाही.+
१७ देवाला आवडणारं बलिदान, म्हणजे पश्चात्तापी मन.
हे देवा, दुःखी आणि हताश झालेलं हृदय तू झिडकारणार नाहीस.*+
१८ तू आपल्या कृपेमुळे सीयोनचं भलं कर;यरुशलेमच्या भिंती मजबूत कर.
१९ मग तुला नीतीच्या बलिदानांमुळे,होमार्पणांमुळे आणि पूर्णपणे दिलेल्या अर्पणांमुळे आनंद होईल;मग तुझ्या वेदीवर बैलांची अर्पणं दिली जातील.+
तळटीपा
^ किंवा “मी सतत आपल्या पापाबद्दल विचार करतो.”
^ शब्दशः “फक्त तुझ्याविरुद्ध.”
^ शब्दशः “माझ्या पापापासून मला एजोबने शुद्ध कर.”
^ शब्दार्थसूची पाहा.
^ शब्दशः “उत्सुक मनोवृत्तीने मला साहाय्य कर.”
^ किंवा “तुच्छ लेखणार नाहीस.”