स्तोत्रं ५४:१-७
-
शत्रूंच्या मध्ये असताना मदतीसाठी प्रार्थना
-
“देव माझा सहायक आहे” (४)
-
दावीदचं गीत. मस्कील.* संचालकासाठी सूचना. हे गीत तंतुवाद्यांसोबत गायलं जावं. जीफच्या लोकांनी शौलकडे येऊन, “दावीद आमच्यामध्ये लपलाय,”+ असं सांगितलं तेव्हा दावीदने हे गीत रचलं.
५४ हे देवा, तुझ्या नावाने मला वाचव,+तुझ्या शक्तीने माझं समर्थन कर.*+
२ हे देवा, माझी प्रार्थना ऐक;+माझ्या तोंडून निघणाऱ्या शब्दांकडे लक्ष दे.
३ कारण अनोळखी लोक माझ्याविरुद्ध उठतात,क्रूर माणसं माझा जीव घ्यायला पाहतात.+
त्यांना देवाबद्दल जराही आदर नाही.*+ (सेला )
४ पाहा! देव माझा सहायक आहे;+मला साहाय्य करणाऱ्यांसोबत यहोवा आहे.
५ तो माझ्या शत्रूंची त्यांच्याच दुष्टाईने परतफेड करेल;+तुझ्या विश्वासूपणामुळे त्यांचा नाश कर.*+
६ हे यहोवा, मी तुला आनंदाने बलिदान देईन.+
मी तुझ्या नावाची स्तुती करीन, कारण तुझं नाव चांगलं आहे.+
७ देव माझ्या प्रत्येक संकटातून मला सोडवतो.+
मी माझ्या शत्रूंचा पराभव पाहीन.+
तळटीपा
^ शब्दार्थसूची पाहा.
^ किंवा “माझ्या बाजूने वाद कर.”
^ किंवा “ते देवाला आपल्या डोळ्यांपुढे ठेवत नाहीत.”
^ शब्दशः “शांत कर.”