स्तोत्रं ५६:१-१३
दावीदचं गीत. मिक्ताम.* संचालकासाठी सूचना. “दूरचा मुका पारवा” याच्या चालीवर गायलं जावं. पलिष्टी लोकांनी गथमध्ये दावीदला ताब्यात घेतलं,+ तेव्हा त्याने हे गीत रचलं.
५६ हे देवा, माझ्यावर कृपा कर, कारण माणसं माझ्यावर हल्ला करत आहेत.
ती दिवसभर माझ्याविरुद्ध लढतात आणि माझा छळ करतात.
२ माझे वैरी दिवसभर माझ्यावर हल्ला करतात;पुष्कळ जण गर्विष्ठपणे माझ्याविरुद्ध लढतात.
३ मला भीती वाटते,+ तेव्हा मी तुझ्यावर भरवसा ठेवतो.+
४ मी देवावर भरवसा ठेवतो, त्याच्या अभिवचनांची मी स्तुती करतो.
मी देवावर भरवसा ठेवतो, मी घाबरणार नाही.
माणूस माझं काय बिघडवू शकतो?+
५ ते दिवसभर माझ्या प्रयत्नांवर पाणी फिरवतात;माझं नुकसान कसं करता येईल, याचाच ते विचार करत असतात.+
६ ते हल्ला करण्यासाठी लपून बसतात;माझा जीव घेण्यासाठी,+ते माझ्या प्रत्येक पावलावर नजर ठेवतात.+
७ त्यांच्या दुष्टतेमुळे त्यांच्याकडे पाठ फिरव.
हे देवा, तू आपल्या क्रोधाने राष्ट्रांचा नाश कर.+
८ मी वणवण फिरतो, तेव्हा तू माझ्यावर लक्ष ठेवतोस.+
माझे अश्रू तुझ्या बुधलीत* जमा कर.+
तुझ्या वहीत तू त्यांचा हिशोब लिहून ठेवला आहेस.+
९ मी मदतीसाठी देवाला हाक मारीन, त्या दिवशी माझे शत्रू माघार घेतील.+
देव माझ्या बाजूने आहे,+ याची मला पूर्ण खातरी आहे.
१० मी देवावर भरवसा ठेवतो, त्याच्या अभिवचनांची मी स्तुती करतो.
मी यहोवावर भरवसा ठेवतो, त्याच्या अभिवचनांची मी स्तुती करतो.
११ मी देवावर भरवसा ठेवतो; मी घाबरणार नाही.+
माणूस माझं काय बिघडवू शकतो?+
१२ हे देवा, तुला दिलेली वचनं मला पूर्ण करायची आहेत;+मी तुला उपकारस्तुतीची अर्पणं देईन.+
१३ कारण मी जिवंत राहावं आणि तुझी सेवा करत राहावी,+म्हणून तू मला* मृत्यूपासून वाचवलं आहेस+
आणि अडखळण्यापासून मला सावरलं आहेस.+