स्तोत्रं ७५:१-१०
-
देव निःपक्षपणे न्याय करतो
-
दुष्ट यहोवाच्या प्याल्यातून पितील (८)
-
आसाफचं गीत.+ संचालकासाठी सूचना. “नाश करू नकोस” याच्या चालीवर गायलं जावं.
७५ आम्ही तुला धन्यवाद देतो. हे देवा, आम्ही तुला धन्यवाद देतो.
तुझं नाव आमच्यासोबत आहे.+
सर्व लोक तुझ्या अद्भुत कार्यांचं वर्णन करतात.
२ तू म्हणतोस: “मी जेव्हा एक वेळ ठरवतो,तेव्हा मी निःपक्षपणे न्याय करतो.
३ पृथ्वी आणि तिचे रहिवासी थरथर कापू लागले,*तेव्हा मीच तिचे पाये स्थिर केले.” (सेला )
४ बढाया मारणाऱ्यांना मी म्हणतो, “बढाई मारू नका,”
आणि दुष्टांना म्हणतो, “आपल्या ताकदीचा* तोरा मिरवू नका.
५ तुमच्या ताकदीचा* जास्त तोरा मिरवू नका,आणि उद्धटपणे बोलू नका.
६ कारण माणसाला प्रतिष्ठापूर्वेकडून, पश्चिमेकडून किंवा दक्षिणेकडून मिळत नाही.
७ देवच न्यायाधीश आहे.+
तो एका माणसाला खाली आणतो, तर दुसऱ्याला वर चढवतो.+
८ कारण यहोवाच्या हातात एक प्याला आहे;+त्यात फेसाळणारा आणि मसाले घालून तयार केलेला द्राक्षारस आहे.
तो हा प्याला नक्कीच ओतेलआणि पृथ्वीवरचे सर्व दुष्ट लोक त्यातल्या गाळासहित त्यातून पितील.”+
९ पण मी तर सर्वकाळ याविषयी लोकांना सांगत राहीन;मी याकोबच्या देवाचं गुणगान करीन.*
१० कारण तो म्हणतो, “दुष्टांची ताकद* मी नाहीशी करीन,पण नीतिमानांची ताकद* आणखी वाढेल.”
तळटीपा
^ शब्दशः “विरघळले.”
^ शब्दशः “शिंग.”
^ शब्दशः “शिंग.”
^ किंवा “संगीत रचीन.”
^ शब्दशः “शिंगं.”
^ शब्दशः “शिंगं.”