स्तोत्रं ८१:१-१६

  • आज्ञा पाळण्याचा आर्जव

    • परक्या देवांची उपासना करू नका ()

    • तुम्ही माझं ऐकलं तर किती बरं होईल (१३)

आसाफचं गीत.+ संचालकासाठी सूचना: गित्तीथ* याच्या चालीवर गायलं जावं. ८१  देव आपली ताकद आहे.+ त्याचा जयजयकार करा! जल्लोष करून याकोबच्या देवाची स्तुती करा!  २  संगीत वाजवायला सुरुवात करा आणि हातात डफ,सुरेल वीणा आणि तंतुवाद्य घ्या.  ३  नवचंद्राच्या दिवशी*आणि पौर्णिमेला आपल्या उत्सवाच्या दिवशी शिंग फुंका.+  ४  कारण हा इस्राएलसाठी एक नियम आहे,याकोबच्या देवाचा हा आदेश आहे.+  ५  जेव्हा तो इजिप्तचा देश ओलांडून गेला,+तेव्हा त्याने योसेफला एक स्मरण-सूचना म्हणून तो दिला होता.+ मी एक आवाज* ऐकला, पण मी तो ओळखू शकलो नाही.  ६  देव म्हणतो: “मी त्याच्या खांद्यावरचं ओझं काढलं;+त्याच्या हातातली टोपली मी घेतली.  ७  तुझ्या संकटात तू मला हाक मारलीस आणि मी तुझी सुटका केली;+गरजणाऱ्‍या ढगातून* मी तुला उत्तर दिलं.+ मरीबाच्या* पाण्याजवळ मी तुझी परीक्षा पाहिली.+ (सेला )  ८  माझ्या लोकांनो, ऐका, म्हणजे मी तुमच्याविरुद्ध साक्ष देईन. हे इस्राएल, तू माझं ऐकलंस तर किती बरं होईल!+  ९  मग तुझ्यात कोणताच अनोळखी देव असणार नाही,आणि तू परक्या देवाला नमन करणार नाहीस.+ १०  मी यहोवा तुझा देव आहे. मीच तुला इजिप्तच्या देशातून बाहेर आणलं.+ तुझं तोंड चांगलं उघड, म्हणजे तू तृप्त होईपर्यंत मी तुला अन्‍न भरवीन.+ ११  पण माझ्या लोकांनी माझं ऐकलं नाही;इस्राएलने माझ्या आज्ञा पाळल्या नाहीत.+ १२  म्हणून मी त्यांना त्यांच्या हट्टी मनाप्रमाणे वागू दिलं;त्यांना जे योग्य वाटलं ते त्यांनी केलं.*+ १३  जर माझ्या लोकांनी माझं ऐकलं,आणि इस्राएलने माझ्या मार्गांचं पालन केलं, तर किती बरं होईल!+ १४  मग मी लगेच त्यांच्या शत्रूंना त्यांच्या हाती देईन;मी त्यांच्या वैऱ्‍यांचा पराभव करीन.+ १५  यहोवाचा द्वेष करणारे त्याच्यापुढे भीतीने थरथर कापत येतील,त्यांचा नाश* कायमचा असेल. १६  पण तुला* मात्र तो सगळ्यात उत्तम गहू खायला देईल+तो खडकातल्या मधाने तुला तृप्त करेल.”+

तळटीपा

चंद्राची पहिली कोर दिसते तो दिवस.
किंवा “भाषा.”
शब्दशः “मेघगर्जनेच्या गुप्त ठिकाणातून.”
म्हणजे, “भांडण.”
शब्दशः “आपल्या इच्छेप्रमाणे चालले.”
शब्दशः “काळ.”
शब्दशः “त्याला.” म्हणजे, देवाच्या लोकांना.