स्तोत्रं ८३:१-१८
आसाफचं गीत.+ स्तुतिगीत.
८३ हे देवा, शांत राहू नकोस!+
हे देवा, गप्प बसून नुसताच पाहत राहू नकोस!
२ कारण बघ, तुझ्या शत्रूंनी कसा गोंधळ माजवलाय!+
तुझा द्वेष करणारे उद्धटपणे वागतात.*
३ ते गुप्तपणे तुझ्या लोकांविरुद्ध दुष्ट योजना करतात;तुझ्या मौल्यवान लोकांविरुद्ध* ते कटकारस्थानं रचतात.
४ ते म्हणतात: “चला, आपण या राष्ट्राचा असा सर्वनाश करू,+की इस्राएलच्या नावाची कोणाला आठवणही राहणार नाही.”
५ ते सर्व एकमताने योजना आखतात;*तुझा विरोध करण्यासाठी त्यांनी आपसात मैत्री केली आहे*+—
६ अदोमी, इश्माएली, मवाबी+ आणि हागारी+ लोक;
७ गबाल, अम्मोन,+ अमालेकआणि पलेशेथ,+ तसंच सोरचे+ रहिवासी.
८ अश्शूरही+ त्यांच्यात सामील झालंय;ते सर्व लोटच्या मुलांना+ पाठिंबा देतात.* (सेला )
९ तू मिद्यानसोबत+ जसं केलं होतंस;कीशोनच्या+ ओढ्याजवळ सीसरा आणि याबीन यांच्यासोबत तू जसं केलं होतंस,तसंच या सर्वांसोबत कर.
१० एन-दोर+ इथे त्यांचा सर्वनाश झाला होता;ते जमिनीसाठी खत झाले.
११ त्यांच्या प्रतिष्ठित लोकांना ओरेब आणि जेब+ यांच्यासारखं;आणि त्यांच्या राजकुमारांना* जेबह आणि सलमुन्ना+ यांच्यासारखं कर.
१२ कारण ते म्हणाले: “देव ज्या देशात राहतो, त्या देशाचा आपण ताबा घेऊ या.”
१३ हे माझ्या देवा, त्यांना वाऱ्यासोबत उडणाऱ्या पाल्यापाचोळ्यासारखं कर,+वाऱ्याने उडवलेल्या सुक्या गवतासारखं त्यांना कर.
१४ वणव्यामुळे जसं उभं रान जळून जातं;आणि आगीने जसे डोंगर होरपळून जातात,+
१५ तसा तू आपल्या तुफानाने त्यांचा पाठलाग कर+आणि तुझ्या वादळाने त्यांना घाबरवून सोड.+
१६ हे यहोवा, त्यांची तोंडं अपमानाने झाकून टाक,*म्हणजे ते तुझ्या नावाचा शोध घेतील.
१७ ते कायमचे लज्जित आणि भयभीत होवोत;त्यांना शरमेने खाली पाहायला लाव आणि त्यांचा नाश होऊ दे;
१८ लोकांना कळू दे, की तुझं नाव यहोवा आहे+आणि या संपूर्ण पृथ्वीवर फक्त तूच सर्वोच्च देव आहेस.+
तळटीपा
^ किंवा “आपली डोकी वर करतात.”
^ शब्दशः “लपवलेल्या लोकांविरुद्ध.”
^ शब्दशः “ते एकदिलाने विचारविनिमय करतात.”
^ किंवा “करार केला आहे.”
^ शब्दशः “हात बनले आहेत.”
^ किंवा “प्रधानांना.”
^ शब्दशः “भर.”