स्तोत्रं ८८:१-१८

  • मरणापासून वाचवावं अशी प्रार्थना

    • “मी कबरेच्या उंबरठ्याशी आलोय” ()

    • “दररोज पहाटे मी तुला प्रार्थना करतो” (१३)

कोरहच्या मुलांचं गीत.+ स्तुतिगीत. संचालकासाठी सूचना. महलथ* शैलीप्रमाणे आळीपाळीने गायलं जावं. एज्राही हेमान+ याचं मस्कील.* ८८  हे यहोवा, माझं तारण करणाऱ्‍या देवा,+दिवसभर मी आक्रोश करतोआणि रात्री मी तुझ्यापुढे विनवणी करतो.+  २  माझी प्रार्थना तुझ्यासमोर येऊ दे.+ माझ्या मदतीच्या याचनेकडे लक्ष दे.*+  ३  कारण माझा जीव* संकटांनी त्रस्त झालाय;+मी कबरेच्या* उंबरठ्याशी आलोय.+  ४  खळग्यात* जाणाऱ्‍यांमध्ये मला मोजलं जातंय;+मी एक असाहाय्य माणूस* आहे.+  ५  मला मेलेल्यांमध्ये टाकून देण्यात आलंय. तू ज्यांची आठवण करत नाहीसआणि ज्यांना तुझ्याकडून कोणतीही मदत मिळत नाही,अशा कबरेत पडलेल्या प्रेतांसारखा मी झालोय.  ६  तू मला सगळ्यात खोल खळग्यात;अंधाऱ्‍या ठिकाणी, एका अथांग डोहात टाकून दिलं आहेस.  ७  तुझ्या क्रोधाच्या भाराखाली मी दबून गेलोय,+तुझ्या भयानक लाटा माझ्यावर आदळतात. (सेला )  ८  माझ्या ओळखीच्या लोकांना तू माझ्यापासून दूर केलं आहेस;+त्यांना माझी घृणा वाटेल, अशी तू माझी स्थिती केली आहेस. मी अशा जाळ्यात सापडलोय, ज्यातून सुटण्याचा मार्ग नाही.  ९  माझ्या दुःखामुळे माझे डोळे निस्तेज झाले आहेत.+ हे यहोवा, मी दिवसभर तुला हाक मारतो;+तुझ्यापुढे मी आपले हात पसरतो. १०  तू मेलेल्यांसाठी अद्‌भुत कार्यं करशील का? मृत्यूमुळे शक्‍तिहीन झालेले, उठून तुझी स्तुती करू शकतात का?+ (सेला ) ११  कबरेत कोणी तुझ्या एकनिष्ठ प्रेमाबद्दल सांगेल का? नाशाच्या ठिकाणी कोणी तुझ्या विश्‍वासूपणाचं वर्णन करेल का? १२  अंधारात तुझे पराक्रम प्रकट होतील का? विस्मरणाच्या देशात तुझं नीतिमत्त्व जाहीर होईल का?+ १३  तरीही, हे यहोवा, मी तुला मदतीची याचना करतो,+दररोज पहाटे मी तुला प्रार्थना करतो.+ १४  हे यहोवा, तू मला का झिडकारतोस?+ तू माझ्यापासून तोंड का फिरवतोस?+ १५  लहानपणापासूनचमी दुःखीकष्टी आहे आणि मृत्यूच्या सावलीत राहतोय;+तू माझ्यावर येऊ दिलेली संकटं सोसून मी अगदी बधिर झालोय. १६  तुझ्या संतापाने मला दडपून टाकलंय;+तुझ्या धाकाने माझा नाश होत आहे. १७  दिवसभर तो मला समुद्राच्या लाटांसारखा घेरतो. चारही बाजूंनी* त्याने मला वेढलंय. १८  तू माझ्या मित्रांना आणि सोबत्यांना माझ्यापासून दूर केलं आहेस;+आता मला फक्‍त अंधाराची सोबत आहे.

तळटीपा

किंवा “खाली वाकून ऐक.”
हिब्रू भाषेत “शिओल.”  शब्दार्थसूची पाहा.
किंवा “शक्‍ती नसलेल्या माणसासारखा.”
किंवा “कबरेत.”
किंवा कदाचित, “अचानक.”