होशेय १२:१-१४

  • एफ्राईमने यहोवाकडे परत यावं (१-१४)

    • याकोब देवाशी लढला ()

    • देवाच्या आशीर्वादासाठी याकोब रडला ()

१२  “एफ्राईम वाऱ्‍याने आपलं पोट भरतो. तो दिवसभर पूर्वेच्या वाऱ्‍यामागे धावतो. तो खोटेपणात आणि हिंसाचारात भर घालतो. ते अश्‍शूरशी करार करतात+ आणि इजिप्तला तेल नेतात.+  २  यहोवाचा यहूदाविरुद्ध एक खटला आहे;+तो याकोबकडून त्याच्या वागणुकीचा हिशोब घेईल,आणि त्याच्या कृत्यांप्रमाणे त्याला प्रतिफळ देईल.+  ३  त्याने आईच्या गर्भात आपल्या भावाची टाच धरली,+आणि तो जोमाने देवासोबत लढला.+  ४  तो एका स्वर्गदूतासोबत लढत राहिला आणि शेवटी विजयी ठरला. त्याने रडून त्याच्याकडे आशीर्वादाची याचना केली.”+ तो देवाला बेथेलमध्ये सापडला आणि तिथे देव आपल्याशी बोलला.+  ५  यहोवा सैन्यांचा देव आहे,+यहोवा या नावाने त्याची आठवण केली जाते.*+  ६  “म्हणून आपल्या देवाकडे परत या,+एकनिष्ठ प्रेमाने आणि न्यायाने वागायचं सोडू नका,+आणि देवाची सतत वाट पाहत राहा.  ७  पण व्यापाऱ्‍याच्या* हातात फसवं तराजू आहे;त्याला लुबाडायला आवडतं.+  ८  एफ्राईम सारखं म्हणतो, ‘मी खरंच श्रीमंत झालोय;+मला धनसंपत्ती मिळाली आहे.+ ती सगळी मी स्वतःच्या मेहनतीने मिळवली आहे, त्यांना माझ्यात कोणताही अपराध किंवा पाप सापडणार नाही.’  ९  पण तुम्ही इजिप्तमध्ये होता, तेव्हापासून मी तुमचा देव यहोवा आहे.+ ठरलेल्या वेळी होणाऱ्‍या सणाच्या दिवसांप्रमाणे,मी तुम्हाला पुन्हा तंबूंमध्ये राहायला लावीन. १०  मी संदेष्ट्यांशी बोललो,+मी त्यांना पुष्कळ दृष्टान्त दाखवले. मी संदेष्ट्यांद्वारे दाखले देऊन बोललो. ११  गिलादमध्ये फसवणूक*+ आणि असत्य आहे. गिलगालमध्ये त्यांनी बैलांची बलिदानं दिली आहेत.+ त्यांच्या वेदी शेतातल्या दगडांच्या ढिगाऱ्‍यांप्रमाणे आहेत.+ १२  याकोब अरामच्या* प्रदेशात* पळून गेला;+तिथे इस्राएलने+ बायको मिळावी म्हणून चाकरी केली,+बायको मिळावी म्हणून त्याने मेंढरांची राखण केली.+ १३  यहोवाने एका संदेष्ट्याद्वारे इस्राएलला इजिप्तमधून बाहेर आणलं,+आणि एका संदेष्ट्याद्वारे त्याचं रक्षण केलं.+ १४  एफ्राईमने देवाला खूप चीड आणली;+त्याचा रक्‍तदोष त्याच्याच डोक्यावर राहील;त्याने केलेल्या अपमानाबद्दल त्याचा प्रभू त्याची परतफेड करेल.”+

तळटीपा

किंवा “हे नाव त्याचं स्मारक आहे.”
किंवा “दुकानदाराच्या.”
किंवा “गूढ गोष्टी.”
शब्दशः “शेतात.”
किंवा “सीरियाच्या.”