होशेय १३:१-१६
१३ “एफ्राईम बोलायचा तेव्हा लोक थरथर कापायचे;तो इस्राएलमध्ये प्रतिष्ठित होता.+
पण बआलमुळे तो दोषी ठरला+ आणि मेला.
२ आता ते आपल्या पापांमध्ये भर घालतातआणि आपल्या चांदीपासून मूर्ती* बनवतात;+कारागिरांप्रमाणे ते कुशलतेने मूर्ती बनवतात.
ते त्यांना म्हणतात, ‘बलिदानं देणाऱ्या माणसांनी वासरांचं चुंबन घ्यावं.’+
३ म्हणून ते सकाळच्या मेघांसारखे,लगेच नाहीशा होणाऱ्या दवासारखे,वादळाने खळ्यातून* उडून जाणाऱ्या भुशासारखे,आणि धुराड्यातून बाहेर पडणाऱ्या धुरासारखे होतील.
४ पण इजिप्तपासून मीच तुमचा देव यहोवा आहे;+तुम्हाला माझ्याशिवाय दुसरा कोणी देव माहीत नव्हता,आणि माझ्याशिवाय कोणी तारणकर्ता नाही.+
५ ओसाड रानात, दुष्काळ पडलेल्या देशात मी तुझी काळजी घेतली.+
६ ते आपल्या कुरणांमध्ये* तृप्त होते,+ते तृप्त झाले आणि त्यांचं हृदय गर्विष्ठ बनलं.
आणि त्यामुळे ते मला विसरले.+
७ मी त्यांच्यासाठी तरुण सिंहासारखा,+आणि वाटेवर लपून बसलेल्या चित्त्यासारखा होईन.
८ पिल्लं हरवलेल्या अस्वलीसारखा मी त्यांच्यावर हल्ला करीन,आणि मी त्यांची छाती* फाडीन.
सिंहासारखा मी त्यांचा फडशा पाडीन.
रानातला जंगली पशू त्यांचे तुकडेतुकडे करेल.
९ हे इस्राएल, तो तुझा नाश करेल,कारण तू माझ्यावर, तुला मदत करणाऱ्यावर उलटलास.
१० मग आता तुझ्या सर्व शहरांमध्ये तुला सोडवू शकेल, असा तुझा राजा कुठे आहे?+
आणि ‘मला राजा आणि अधिकारी दे,’ असं तू ज्यांच्याबद्दल बोललास, ते तुझे शासक* कुठे आहेत?+
११ मी तुला रागावून राजा दिला,+आणि माझ्या क्रोधात मी त्याला तुझ्याकडून काढून घेईन.+
१२ एफ्राईमच्या अपराधाचं गाठोडं बांधलेलं आहे;*
त्याचं पाप साठवून ठेवलेलं आहे.
१३ जन्म देणाऱ्या स्त्रीप्रमाणे त्याला वेदना होतील.
तो एका मूर्ख मुलासारखा आहे;जन्माच्या वेळी तो गर्भाशयाच्या मुखाजवळ येत नाही.
१४ मी त्यांना कबरेच्या* तावडीतून सोडवीन;मी त्यांना मृत्यूकडून परत आणीन.+
अरे मरणा, तुझा डंख कुठे आहे?+
अगं कबरे, तुझी नाश करण्याची शक्ती कुठे आहे?+
मी दया दाखवणार नाही.
१५ जरी त्याची गवतामध्ये भरभराट झाली,तरी पूर्वेचा, म्हणजे यहोवाकडून येणारा वारावाळवंटातून येईल आणि त्याची विहीर सुकवेल आणि त्याचा झरा आटवेल.
तो त्याच्या मौल्यवान वस्तूंचा खजिना लुटेल.+
१६ शोमरोनने आपल्या देवाविरुद्ध बंड केलंय,+म्हणून तिला दोषी ठरवलं जाईल.+
त्यांचा तलवारीने नाश होईल,+त्यांच्या मुलांना आपटून मारलं जाईल,आणि त्यांच्या गरोदर बायकांना चिरून टाकलं जाईल.”
तळटीपा
^ किंवा “ओतीव मूर्ती.”
^ शब्दार्थसूची पाहा.
^ किंवा “गुरं चारण्याच्या जमिनींमध्ये.”
^ शब्दशः “त्यांच्या हृदयाचं कुंपण.”
^ शब्दशः “न्यायाधीश.”
^ किंवा “सांभाळून ठेवलेलं आहे.”
^ हिब्रू भाषेत “शिओल.” शब्दार्थसूची पाहा.