होशेय १४:१-९

  • यहोवाकडे परत येण्याची विनंती (१-३)

    • ओठांच्या स्तुतीचं अर्पण ()

  • इस्राएलचा अविश्‍वासूपणा बरा करणं (४-९)

१४  “हे इस्राएल, तुझ्या देवाकडे, यहोवाकडे परत ये,+कारण तुझ्या अपराधामुळे तू अडखळून पडला आहेस.  २  यहोवाकडे परत ये आणि त्याला असं म्हण,‘कृपा करून आमच्या अपराधाची क्षमा कर+ आणि जे चांगलं आहे त्याचा स्वीकार कर,म्हणजे, जशी आम्ही वासरं अर्पण करतो, तशी आमच्या ओठांची स्तुती तुला अर्पण करू.+  ३  अश्‍शूर आम्हाला वाचवणार नाही.+ आम्ही घोड्यांवर स्वार होणार नाही,+आणि आमच्या हातांनी घडवलेल्या गोष्टींना आम्ही पुन्हा कधीही, “हे आमच्या देवा!” असं म्हणणार नाही,कारण अनाथाला* दया दाखवणारा तूच आहेस.’+  ४  मी त्यांचा अविश्‍वासूपणा बरा करीन.+ मी माझ्या स्वतःच्या इच्छेने त्यांच्यावर प्रेम करीन,+कारण त्यांच्यावरचा माझा राग गेला आहे.+  ५  मी इस्राएलसाठी पहाटेच्या दवासारखा होईन;तो भुईकमळासारखा फुलेलआणि त्याची मुळं लबानोनच्या झाडांच्या मुळांसारखी खोलवर रुजतील.  ६  त्याच्या फांद्या पसरतील,त्याचं सौंदर्य जैतुनाच्या झाडासारखं,आणि त्याचा सुगंध लबानोनच्या झाडांसारखा असेल.  ७  ते पुन्हा एकदा त्याच्या छायेत राहतील. ते धान्य उगवतील आणि द्राक्षवेलीसारखे बहरतील.+ तो लबानोनच्या द्राक्षारसासारखा प्रसिद्ध* होईल.  ८  एफ्राईम म्हणेल, ‘मूर्तींशी आता माझं काय घेणंदेणं?’+ मी त्याचं ऐकेन आणि त्याची काळजी घेईन.+ मी हिरव्यागार गंधसरूच्या झाडासारखा होईन. मीच तुला फळ देईन.”  ९  बुद्धिमान कोण आहे? त्याने या गोष्टी समजून घ्याव्या. समजदार कोण आहे? त्याने त्या जाणाव्या. कारण यहोवाचे मार्ग सरळ आहेत,+नीतिमान त्यांवर चालतील;पण पापी लोक त्यांवर अडखळतील.

तळटीपा

किंवा “वडील नसलेल्या मुलाला.”
शब्दशः “स्मारक.”