होशेय २:१-२३

  • अविश्‍वासू इस्राएलला शिक्षा (१-१३)

  • नवऱ्‍याप्रमाणे असलेल्या यहोवाकडे परत येणं (१४-२३)

    • तू मला “माझा नवरा म्हणून हाक मारशील” (१६)

 तुमच्या भावांना, ‘माझे लोक!’*+ आणि तुमच्या बहिणींना, ‘देवाने दया दाखवलेली स्त्री!’* असं म्हणा.+  २  आपल्या आईला दोष द्या; तिला दोष द्या,कारण ती माझी बायको नाही+ आणि मी तिचा नवरा नाही. तिने वेश्‍येसारखं वागायचं* थांबवलं पाहिजेआणि आपल्या स्तनांच्या मधून व्यभिचार दूर केला पाहिजे,  ३  नाहीतर ती तिच्या जन्माच्या दिवशी होती, तशी मी तिला नग्न करीन,मी तिची अवस्था ओसाड रानासारखी,आणि निर्जल भूमीसारखी करीन,म्हणजे ती तहानेने तडफडून मरेल.  ४  मी तिच्या मुलांना दयामाया दाखवणार नाही,कारण ती वेश्‍येची* मुलं आहेत.  ५  त्यांच्या आईने वेश्‍येसारखी कामं* केली आहेत.+ त्यांना आपल्या गर्भात वाढवणारी त्यांची आई निर्लज्जपणे वागली आहे,+ कारण ती म्हणाली,‘मी माझ्या प्रियकरांमागे जाईन;+जे मला अन्‍नपाणी पुरवतात,जे मला लोकर, मलमल, तेल आणि द्राक्षारस पुरवतात, त्यांच्यामागे मी जाईन.’  ६  म्हणून मी काट्यांचं कुंपण घालून तिला अडवीन;मी तिच्यासमोर दगडांची भिंत रचीन म्हणजे तिला मार्ग सापडणार नाही.  ७  ती आपल्या प्रियकरांच्या मागे धावेल, पण त्यांच्यापर्यंत पोहोचू शकणार नाही;+ती त्यांना शोधेल, पण तिला ते सापडणार नाहीत. मग ती म्हणेल, ‘मी माझ्या पहिल्या नवऱ्‍याकडे परत जाईन,+कारण माझी आधीची स्थिती आतापेक्षा चांगली होती.’+  ८  तिला धान्य, नवीन द्राक्षारस आणि तेल देणारा मीच होतो, हे तिने ओळखलं नाही,+मीच तिला भरपूर चांदी दिली,आणि सोनंही दिलं. पण, तिने ते बआलच्या उपासनेसाठी वापरलं.+  ९  ‘म्हणून मी कापणीच्या वेळी परत येऊन माझं धान्य घेईन,मी द्राक्षांच्या हंगामात माझा नवीन द्राक्षारस परत घेईन,+आणि तिचं उघडं अंग झाकण्यासाठी असलेली लोकरीची आणि मलमलीची वस्त्रं मी हिसकावून घेईन. १०  तिच्या प्रियकरांसमोर मी तिची नग्नता* उघडी करीन,आणि कोणीही तिला माझ्या हातून सोडवू शकणार नाही.+ ११  मी तिचे सगळे आनंदाचे सोहळे बंद करीन,तिचे उत्सव,+ नवचंद्राचे दिवस,* शब्बाथ आणि नेमलेले सण मी बंद करीन. १२  तिच्या द्राक्षवेली आणि अंजिराची झाडं मी उद्ध्‌वस्त करीन; त्यांविषयी ती म्हणाली होती: ‘माझ्या प्रियकरांनी मला दिलेली ही कमाई आहे’;पण, मी त्यांचं जंगल करून टाकीन,आणि जंगली जनावरं ती खाऊन टाकतील. १३  मी त्या सर्व दिवसांचा तिच्याकडून हिशोब मागीन, जेव्हा ती बआलच्या मूर्तींना बलिदानं अर्पण करायची,+आणि नथ आणि दागदागिने घालून आपल्या प्रियकरांमागे जायची;पण मला मात्र ती विसरून गेली,’+ असं यहोवा म्हणतो. १४  ‘म्हणून मी तिची समजूत घालीन;मी तिला रानात नेईन,आणि तिच्याशी प्रेमाने बोलीन. १५  मग, तिचे द्राक्षमळे मी तिला परत देईन,+आणि अखोरचं खोरं*+ तिच्यासाठी आशेचं द्वार ठरेल;इजिप्त* देशातून ती बाहेर आली होती, त्या दिवसाप्रमाणे,+तिच्या तारुण्याच्या दिवसांप्रमाणे, ती तिथे माझं ऐकेल.’ १६  यहोवा म्हणतो, ‘त्या दिवशी तू मला, “माझा मालक”* नाही, तर “माझा नवरा” म्हणून हाक मारशील.’ १७  ‘मी तिच्या तोंडून बआलच्या मूर्तींची नावं काढून टाकीन,+त्यांच्या नावांची पुन्हा कधी आठवण केली जाणार नाही.+ १८  त्या दिवशी मी माझ्या लोकांसाठी रानातल्या पशूंशी,आकाशातल्या पक्ष्यांशी आणि जमिनीवर रांगणाऱ्‍या जिवांशी करार करीन;+मी देशातून धनुष्य, तलवार आणि युद्ध नाहीसं करीन,+आणि ते तिथे निर्भयपणे राहतील.+ १९  मी लग्नाचं वचन देऊन तुला आपली वधू म्हणून कायमचं स्वीकारीन,आणि तुझ्याशी नीतीने, न्यायाने,एकनिष्ठ प्रेमाने आणि दयेने+ वागण्याचं मी तुला वचन देईन. २०  मी तुला विश्‍वासू राहण्याचं वचन देईन,आणि मी जो यहोवा, त्याला तू नक्कीच ओळखशील.’+ २१  यहोवा म्हणतो, ‘त्या दिवशी मी ऐकेन,मी आकाशाचं ऐकेनआणि आकाश पृथ्वीचं ऐकेल;+ २२  पृथ्वीही धान्य, नवीन द्राक्षारस आणि तेल यांचं ऐकेल;आणि हे सर्व इज्रेलचं* ऐकतील.+ २३  बी पेरतात तसं मी तिला माझ्यासाठी जमिनीत पेरीन,+आणि जिला दया दाखवण्यात आली नव्हती, तिला मी दया दाखवीन;* जे माझे लोक नव्हते त्यांना,* “तुम्ही माझे लोक आहात” असं मी म्हणीन,+आणि तेही, “तू आमचा देव आहेस” असं म्हणतील.’”+

तळटीपा

होशे १:६ तळटीप पाहा.
होशे १:९ तळटीप पाहा.
किंवा “अनैतिक लैंगिक कृत्यं करण्याचं; चारित्र्यहीन वर्तन.”
किंवा “अनैतिक लैंगिक कृत्यांतून झालेली; चारित्र्यहीन वर्तनामुळे झालेली.”
किंवा “अनैतिक लैंगिक कृत्यं; चारित्र्यहीन वर्तन.”
शब्दशः “गुप्तांगे.”
चंद्राची पहिली कोर दिसते तो दिवस.
किंवा “खालचं मैदान.”
किंवा “मिसर.”
किंवा “माझा बआल.”
म्हणजे, “देव बी पेरेल.”
होशे १:६ तळटीप पाहा.
होशे १:९ तळटीप पाहा.