होशेय ३:१-५

  • होशेय आपल्या बायकोला पुन्हा विकत घेतो (१-३)

  • इस्राएल यहोवाकडे परत येतो (४, ५)

 मग यहोवा मला म्हणाला: “इस्राएलचे लोक दुसऱ्‍या देवांच्या मागे जातात+ आणि आवडीने मनुकांच्या ढेपा* अर्पण करतात, तरीसुद्धा यहोवा त्यांच्यावर प्रेम करतो;+ तसाच आता तूही, जिच्यावर दुसरा माणूस प्रेम करतो आणि जी व्यभिचार करत आहे,+ अशा स्त्रीवर पुन्हा प्रेम कर.” २  म्हणून मी चांदीचे १५ तुकडे आणि दीड होमर माप* जव देऊन तिला विकत घेतलं. ३  मग मी तिला म्हणालो: “तू बऱ्‍याच दिवसांपर्यंत माझी म्हणून राहशील. तू वेश्‍येसारखी कामं करू नकोस* आणि दुसऱ्‍या माणसाशी संबंध ठेवू नकोस आणि मीही तुझ्याशी तसाच वागीन.”* ४  कारण इस्राएलचे लोकही बऱ्‍याच काळापर्यंत* राजाशिवाय,+ राजकुमाराशिवाय, अर्पणाशिवाय, पूजेच्या खांबाशिवाय, तसंच एफोद+ व कुलदैवतांच्या मूर्ती* यांशिवाय राहतील.+ ५  नंतर इस्राएलचे लोक परत येऊन आपला देव यहोवा याचा,+ आणि आपला राजा दावीद याचा शोध घेतील+ आणि येणाऱ्‍या काळात, ते यहोवाचा चांगुलपणा अनुभवण्यासाठी थरथर कापत त्याच्याकडे येतील.+

तळटीपा

म्हणजे, ज्या खोट्या उपासनेसाठी वापरल्या जात होत्या.
एक होमर म्हणजे २२० ली. अति. ख१४ पाहा.
किंवा “अनैतिक लैंगिक कृत्यं करू नकोस; चारित्र्यहीन वर्तन करू नकोस.”
किंवा “मी तुझ्याशी संबंध ठेवणार नाही.”
शब्दशः “बरेच दिवस.”
किंवा “तेराफीम मूर्ती.”