होशेय ४:१-१९

  • यहोवाचा इस्राएलविरुद्ध खटला (१-८)

    • देशात देवाचं ज्ञान नाही ()

  • इस्राएल मूर्तिपूजा आणि व्यभिचार करतो (९-१९)

    • व्यभिचारी वृत्तीमुळे इस्राएली लोक भरकटले (१२)

 इस्राएली लोकांनो, यहोवाचा संदेश ऐका,देशाच्या रहिवाशांविरुद्ध यहोवाचा खटला आहे,+कारण देशात सत्य, एकनिष्ठ प्रेम किंवा देवाबद्दलचं ज्ञान नाही.+  २  खोट्या शपथा घेणं, खोटं बोलणं,+ हत्या करणं,+चोरी आणि व्यभिचार+ सगळीकडे होत आहे,हत्येमागून हत्या होत आहे.+  ३  म्हणून हा देश शोक करेल;+त्यातला प्रत्येक रहिवासी अशक्‍त होत जाईल. रानातले पशू, आकाशातले पक्षी,आणि समुद्रातले मासेही नष्ट होतील.  ४  “म्हणून कोणीही दुसऱ्‍याचा विरोध करू नये किंवा दोष दाखवू नये,+कारण याजकाचा विरोध करणाऱ्‍या लोकांसारखे तुझे लोक झाले आहेत.+  ५  म्हणून तू भरदिवसा अडखळशील,आणि रात्र असल्याप्रमाणे, संदेष्टा तुझ्यासोबत अडखळेल. आणि मी तुझ्या आईचा आवाज बंद करीन.*  ६  मी माझ्या लोकांचा आवाज बंद करीन,*कारण त्यांना माझी ओळख नाही. त्यांनी मला नाकारल्यामुळे,+मीही त्यांना नाकारीन आणि माझे याजक म्हणून सेवा करू देणार नाही. तुम्ही आपल्या देवाचं नियमशास्त्र* विसरलात,+म्हणून मीही तुमच्या मुलांना विसरेन.  ७  त्यांची संख्या जितकी वाढली, तितकंच जास्त त्यांनी माझ्याविरुद्ध पाप केलं.+ मी त्यांचा गौरव अपमानात बदलून टाकीन.*  ८  माझ्या लोकांच्या पापांवर ते आपलं पोट भरतात,त्यांच्या अपराधांसाठी ते हपापले आहेत.*  ९  लोकांशी आणि याजकांशी मी एकसारखाच व्यवहार करीन;त्यांच्या वागणुकीबद्दल मी त्यांच्याकडून हिशोब मागीन,आणि त्यांच्या कृत्यांचे परिणाम मी त्यांना भोगायला लावीन.+ १०  ते खातील पण तृप्त होणार नाहीत.+ ते व्यभिचार करतील,* पण त्यांची संख्या वाढणार नाही.+ कारण त्यांनी यहोवाचा अनादर केला आहे. ११  व्यभिचार,* द्राक्षारस आणि नवीन द्राक्षारसयोग्य ते करण्याची इच्छा* नष्ट करतात.*+ १२  माझे लोक आपल्या लाकडी मूर्तींचा सल्ला घेतात,त्यांची काठी* सांगेल तसं ते वागतात;कारण व्यभिचारी* वृत्तीमुळे ते भरकटले आहेत,आणि व्यभिचार* करून ते आपल्या देवाच्या अधीन राहायला नकार देतात. १३  ते पर्वतांच्या माथ्यांवर बलिदानं देतात,+आणि टेकड्यांवर हवन करतात. अल्लोन* आणि लिवने* वृक्षांखाली आणि प्रत्येक मोठ्या झाडाखाली ते बलिदानं देतात,+कारण या झाडांखाली चांगली सावली असते. म्हणून तुमच्या मुली वेश्‍येसारखी कामं* करतातआणि तुमच्या सुना व्यभिचार करतात. १४  मी तुमच्या मुलींना वेश्‍यांसारखं वागल्याबद्दल,*आणि तुमच्या सुनांना व्यभिचार केल्याबद्दल जबाबदार धरणार नाही. कारण पुरुष वेश्‍यांसोबत जातातआणि मंदिरातल्या वेश्‍यांसोबत बलिदानं देतात. समजबुद्धी नसलेल्या या लोकांचा+ नाश होईल. १५  हे इस्राएल, तू वेश्‍येसारखं वागत आहेस,*+पण यहूदाने तसं पाप करू नये.+ गिलगाल+ किंवा बेथ-आवेन+ इथे येऊ नकोस,आणि ‘यहोवाच्या जिवाची शपथ!’ असं म्हणून शपथ घेऊ नकोस.+ १६  एखाद्या हट्टी गायीसारखा इस्राएल हट्टी झाला आहे.+ कोकऱ्‍याला मोकळ्या कुरणात* चरायला नेतात, तसं आता यहोवा त्याला चरायला नेईल का? १७  एफ्राईम मूर्तींच्या नादी लागला आहे.+ त्याला सोडून द्या! १८  त्याचं मद्य संपतं,तेव्हा तो व्यभिचार करतो.* त्याच्या शासकांना* नीच कामं आवडतात.+ १९  वारा त्याला आपल्या पंखांत लपेटून टाकेल,*त्याच्या बलिदानांमुळे त्याची लाजिरवाणी स्थिती होईल.

तळटीपा

किंवा “नाश करीन.”
किंवा “नाश करीन.”
किंवा “शिक्षण.”
किंवा कदाचित, “त्यांनी माझा गौरव करण्याऐवजी अपमान केला आहे.”
किंवा “लोभी झाले आहेत.”
किंवा “अतिशय अनैतिक कामं करतील; वेश्‍येसारखी कामं करतील.”
शब्दशः “हृदय काढून घेतात.”
किंवा “प्रेरणा.”
किंवा “अनैतिक लैंगिक कृत्यं; चारित्र्यहीन वर्तन.”
किंवा “शकुन पाहणाऱ्‍याची काठी.”
किंवा “अनैतिक लैंगिक कृत्यं करण्याच्या; चारित्र्यहीन.”
किंवा “अनैतिक लैंगिक कृत्यं; चारित्र्यहीन वर्तन.”
एक प्रकारचा मोठा वृक्ष. इंग्रजीत त्याला “ओक”  म्हणतात.
सुंदर आणि सुगंधी फुलांचं एक झाड.
किंवा “अनैतिक लैंगिक कृत्यं; चारित्र्यहीन वर्तन.”
किंवा “अनैतिक लैंगिक कृत्यं केल्याबद्दल; चारित्र्यहीन वर्तनाबद्दल.”
किंवा “अनैतिक लैंगिक कृत्यं करत आहेस; चारित्र्यहीन आहेस.”
शब्दशः “मोकळ्या जागेत.”
किंवा “अतिशय अनैतिक कामं करतो; वेश्‍येसारखी कामं करतो.”
शब्दशः “ढालींना.”
किंवा “वाहून नेईल.”