होशेय ६:१-११

  • यहोवाकडे परत येण्याचं प्रोत्साहन (१-३)

  • लोकांचं लगेच नाहीसं होणारं प्रेम (४-६)

    • बलिदानापेक्षा एकनिष्ठ प्रेम श्रेष्ठ ()

  • लोकांचं लाजिरवाणं वागणं (७-११)

 “चला, आपण यहोवाकडे परत जाऊ या,कारण त्याने फाडून आपले तुकडे केले आहेत,+ पण तोच आपल्याला बरं करेल. त्याने आपल्याला जखमी केलं, पण तोच आपल्या जखमांना पट्टी बांधेल.  २  तो दोन दिवसांनी आपल्याला जिवंत करेल. तिसऱ्‍या दिवशी तो आपल्याला उठवेल,आणि आपण त्याच्यासमोर जिवंत राहू.  ३  आपण यहोवाला जाणून घेऊ, आपण त्याला जाणून घेण्याचा मनापासून प्रयत्न करू. पहाट उगवण्याइतकंच त्याचं येणं निश्‍चित आहे;तो बरसणाऱ्‍या सरींसारखा आपल्याकडे येईल,पृथ्वीला ओलंचिंब करणाऱ्‍या वसंतातल्या पावसासारखा तो येईल.”  ४  “अरे एफ्राईम, मी तुझ्यासोबत काय करू? अरे यहूदा, मी तुझं काय करू? कारण तुझं प्रेम सकाळच्या मेघांसारखं आहे,लगेच नाहीशा होणाऱ्‍या दवासारखं आहे.  ५  म्हणून मी संदेष्ट्यांद्वारे त्यांना कापून टाकीन;+माझ्या तोंडातून निघणाऱ्‍या शब्दांनी मी त्यांना ठार मारीन.+ तुमच्यावर येणारे न्यायदंड प्रकाशासारखे चमकतील.+  ६  कारण मला बलिदानाने नाही, तर एकनिष्ठ प्रेमाने* आनंद होतो,आणि होमार्पणांनी नाही, तर देवाच्या ज्ञानाने मला आनंद होतो.+  ७  पण त्यांनी पापी मानवांप्रमाणे माझा करार मोडला आहे.+ त्यांनी तिथे माझ्याशी विश्‍वासघात केला आहे.  ८  गिलाद दुष्टांचं नगर आहे,+ते रक्‍ताच्या पाऊलखुणांनी माखलेलं आहे.+  ९  याजकांची टोळी एखाद्या माणसाला मारायला टपून बसलेल्या लुटारूंच्या टोळीसारखी आहे. ते शखेमच्या+ रस्त्यावर खून करतात;त्यांचं वागणं लाजिरवाणं आहे. १०  इस्राएलच्या घराण्यात मला एक किळसवाणी गोष्ट दिसली. तिथे एफ्राईम व्यभिचार करतो;*+इस्राएलने स्वतःला दूषित केलं आहे.+ ११  हे यहूदा, तुझ्यासाठी तर कापणीचा काळ ठरलेला आहे;त्या वेळी मी माझ्या बंदिवान लोकांना गोळा करून परत आणीन.”+

तळटीपा

किंवा “दयेने.”
किंवा “वेश्‍येसारखी कामं करतो.”