होशेय ७:१-१६

  • एफ्राईमच्या दुष्टतेचं वर्णन (१-१६)

    • देवाच्या जाळ्यातून सुटका नाही (१२)

 “जेव्हा जेव्हा मी एफ्राईमला बरं करायचा प्रयत्न करतो, तेव्हा तेव्हा त्यांचे अपराध,+आणि शोमरोनची दुष्टता+ उजेडात येते. कारण ते फसवणूक करतात;+चोर घरफोडी करतात आणि बाहेर लुटारूंच्या टोळ्या लुटालूट करतात.+  २  पण मी त्यांची सगळी दुष्टता लक्षात ठेवीन, असं ते मनात म्हणत नाहीत.+ त्यांच्या अपराधांनी त्यांना घेरलं आहे;त्यांचे अपराध माझ्यापासून लपलेले नाहीत.  ३  ते आपल्या दुष्टतेमुळे राजाला,आणि आपल्या लबाडीने राजकुमारांना खूश करतात.  ४  ते सर्व व्यभिचारी आहेत,रोटी भाजणाऱ्‍याने तापवलेल्या भट्टीसारखे ते आहेत. तो पीठ मळल्यावर ते फुगेपर्यंत, विस्तव चाळवत नाही.*  ५  आमच्या राजाच्या उत्सवाच्या दिवशी, अधिकाऱ्‍यांना मळमळू लागलं​—द्राक्षारसामुळे ते संतापले आहेत.+ राजाने थट्टा करणाऱ्‍यांच्या हातात हात दिला आहे.  ६  कारण त्यांचं हृदय तापलेल्या भट्टीसारखं आहे.* रोटी भाजणारा रात्रभर झोपतो,सकाळी त्याच्या भट्टीतली आग धगधगत असते.  ७  ते सर्व भट्टीसारखे तापलेले असतात,ते आपल्या शासकांना* गिळून टाकतात. त्यांचे सर्व राजे पडले आहेत;+त्यांच्यापैकी कोणीही मला हाक मारत नाही.+  ८  एफ्राईम इतर राष्ट्रांसोबत मिसळतो.+ तो एका बाजूने भाजलेल्या रोटीसारखा आहे.  ९  अनोळखी लोकांनी त्याची शक्‍ती शोषून घेतली आहे,+ पण त्याला याची कल्पना नाही. त्याचे केस पांढरे झाले आहेत, पण त्याच्या लक्षात येत नाही. १०  इस्राएलच्या गर्वाने त्याच्याविरुद्ध साक्ष दिली आहे,+पण ते आपला देव यहोवा याच्याकडे परत आले नाहीत;+आणि हे सर्व झाल्यावरही त्यांनी त्याचा शोध घेतला नाही. ११  एफ्राईम एखाद्या भोळ्या कबुतरासारखा आहे, त्याला बुद्धी नाही.*+ त्यांनी इजिप्तला हाक मारली आहे+ आणि त्यांनी अश्‍शूरकडे धाव घेतली आहे.+ १२  ते कुठेही गेले, तरी मी माझं जाळं त्यांच्यावर टाकीन. मी आकाशातल्या पक्ष्यांसारखं त्यांना खाली पाडीन. त्यांना* ताकीद दिल्याप्रमाणे मी त्यांना शिक्षा करीन.+ १३  त्यांचा धिक्कार असो, कारण ते माझ्यापासून दूर गेले आहेत! त्यांचा नाश होवो, कारण त्यांनी माझ्याविरुद्ध पाप केलं आहे! मी त्यांना सोडवायला तयार होतो, पण ते माझ्याविरुद्ध खोटं बोलले आहेत.+ १४  त्यांनी मनापासून मला मदतीसाठी हाक मारली नाही,+ते फक्‍त आपल्या अंथरुणांवर पडून ओरडत राहिले. ते धान्यासाठी आणि नवीन द्राक्षारसासाठी शरीरावर घाव करून घ्यायचे;ते माझा विरोध करतात. १५  मी त्यांना शिकवलं आणि त्यांचे हात मजबूत केले,पण ते माझा विरोध करतात आणि कटकारस्थानं रचतात. १६  त्यांनी आपला मार्ग बदलला, पण ते चांगल्या मार्गाला लागले नाहीत;* सैल दोरी असलेल्या धनुष्यासारखे ते बेभरवशाचे होते.+ त्यांचे अधिकारी त्यांच्या उद्धट जिभांमुळे तलवारीने मारले जातील. यामुळेच इजिप्त देशात त्यांची थट्टा केली जाईल.”+

तळटीपा

किंवा “आग वाढवण्यासाठी निखारे हलवत नाही.”
किंवा कदाचित, “कारस्थानं करायला येताना त्यांचं हृदय तापलेल्या भट्टीसारखं असतं.”
शब्दशः “न्यायाधीशांना.”
शब्दशः “हृदय नाही.”
शब्दशः “त्यांच्या मंडळीला.”
म्हणजे, उच्च दर्जाच्या उपासनेकडे वळले नाहीत.