होशेय ८:१-१४

  • मूर्तिपूजेचे परिणाम (१-१४)

    • वाऱ्‍याची पेरणी, वादळाची कापणी ()

    • इस्राएल आपल्या निर्माणकर्त्याला विसरला (१४)

 “शिंग फुंका!+ शत्रू यहोवाच्या लोकांविरुद्ध गरुडासारखा येत आहे,+कारण त्यांनी माझा करारआणि माझा नियम मोडला आहे.+  २  ते मला हाक मारतात, ‘हे आमच्या देवा, आम्ही इस्राएल, तुला ओळखतो!’+  ३  जे चांगलं आहे त्याला इस्राएलने नाकारलंय.+ शत्रू त्याचा पाठलाग करेल.  ४  त्यांनी राजे नेमले आहेत, पण माझ्या परवानगीने नाही. त्यांनी अधिकारी नेमले आहेत, पण त्यांनी मला विचारलं नाही. त्यांनी सोन्याचांदीच्या मूर्ती बनवल्या,+त्यामुळे त्यांचा नाश होईल.+  ५  हे शोमरोन, मी तुझं वासरू नाकारलंय.+ माझा राग त्यांच्याविरुद्ध भडकतो.+ या दोषापासून शुद्ध* व्हायला ते अजून किती काळ लावतील?  ६  कारण ते वासरू इस्राएलचं आहे. एका कारागिराने ते बनवलं, आणि ते देव नाही;शोमरोनच्या वासराचे तुकडेतुकडे होतील.  ७  कारण ते वाऱ्‍याची पेरणी करतात,आणि ते वादळाची कापणी करतील.+ पेरलेल्या बियाण्याला पीक येत नाही;+अंकुरापासून पीठ मिळत नाही. काही मिळालं, तरी विदेशी* लोक ते गिळून टाकतील.+  ८  इस्राएलला गिळून टाकलं जाईल.+ ते राष्ट्रांमध्ये,+नको असलेल्या भांड्यासारखे होतील.  ९  कारण ते एकट्या रानगाढवाप्रमाणे अश्‍शूरकडे गेले.+ ते वेश्‍यांकडे गेले.+ १०  त्यांनी त्यांना पैसे देऊन राष्ट्रांमधून आणलं असलं,तरी, आता मी त्यांना गोळा करीन;राजाने आणि अधिकाऱ्‍यांनी टाकलेल्या ओझ्यामुळे,त्यांना दुःख भोगावं लागेल.+ ११  कारण एफ्राईमने पाप करण्यासाठी पुष्कळ वेदी बांधल्या.+ या वेदी बांधून त्यांनी पाप केलं.+ १२  मी त्याला बरेच नियम लिहून दिले.* पण त्याला ते विचित्र वाटले.+ १३  ते मला बलिदानांच्या भेटी आणून देतात, आणि बलिदानांचं मांस खातात. पण यहोवाला या बलिदानांनी आनंद होत नाही.+ आता तो त्यांच्या अपराधांकडे लक्ष देईल आणि त्यांना त्यांच्या पापांसाठी शिक्षा देईल.+ ते इजिप्तकडे परत गेले आहेत.*+ १४  इस्राएल आपल्या निर्माणकर्त्याला विसरला आहे+ आणि त्याने मंदिरं बांधली आहेत,+आणि यहूदाने तटबंदी असलेली भरपूर शहरं बांधली आहेत.+ पण मी त्याच्या शहरांमध्ये आग पाठवीन,आणि ती प्रत्येक शहराचे बुरूज जाळून टाकेल.”+

तळटीपा

किंवा “निर्दोष.”
किंवा “अनोळखी.”
किंवा “बरंच शिक्षण दिलं.”
किंवा कदाचित, “परत जातील.”