होशेय ९:१-१७

  • एफ्राईमच्या पापांमुळे देव त्याला नाकारतो (१-१७)

    • लाजिरवाण्या देवाला समर्पण (१०)

 “हे इस्राएल, तू आनंदी होऊ नकोस,+इतर राष्ट्रांप्रमाणे आनंद करू नकोस. कारण व्यभिचारामुळे* तू आपल्या देवापासून दूर गेला आहेस.+ धान्याच्या प्रत्येक खळ्यामधली* वेश्‍येची कमाई तुला आवडते.+  २  पण खळ्यामुळे आणि द्राक्षकुंडामुळे त्यांचं पोट भरणार नाही,आणि त्यांना नवीन द्राक्षारस मिळणार नाही.+  ३  ते यहोवाच्या देशात टिकणार नाहीत;+तर, एफ्राईम इजिप्तला परत जाईल,आणि अश्‍शूरमध्ये तो अशुद्ध गोष्टी खाईल.+  ४  यापुढे ते यहोवाला द्राक्षारसाचं अर्पण देणार नाहीत;+त्यांच्या बलिदानांनी त्याला आनंद होणार नाही.+ ती बलिदानं शोक करणाऱ्‍यांच्या अन्‍नासारखी आहेत. ते अन्‍न खाणारे स्वतःला दूषित करतात. त्यांचं अन्‍न त्यांच्यासाठीच* आहे;ते यहोवाच्या मंदिरात* येणार नाही.  ५  तुमच्या ठरलेल्या सणांच्या वेळी,आणि यहोवाच्या सणाच्या दिवशी तुम्ही काय कराल?  ६  कारण पाहा! देशाचा नाश झाल्यामुळे त्यांना पळून जावं लागेल.+ इजिप्त त्यांना गोळा करेल+ आणि मोफ* त्यांना दफन करेल.+ जंगली झुडपं* त्यांच्या चांदीच्या मौल्यवान वस्तूंचा ताबा घेतील,आणि त्यांच्या तंबूंमध्ये काटेरी झुडपं येतील.  ७  हिशोब घेण्याचे दिवस येतील,+सूड घेण्याचे दिवस येतील,आणि इस्राएलला हे कळेल. त्यांचा संदेष्टा मूर्ख ठरेल आणि संदेश सांगणारा माणूस वेडा होईल;तुमचे अपराध पुष्कळ असल्यामुळे, तुमचा खूप द्वेष केला जाईल.”  ८  एफ्राईमचा पहारेकरी+ माझ्या देवासोबत होता.+ पण आता संदेष्टे+ एफ्राईमच्या सर्व मार्गांवर पारध्याच्या फासासारखे आहेत;त्याच्या देवाच्या मंदिरात* द्वेष आहे.  ९  गिबाच्या दिवसांत झालं त्याप्रमाणे, ते विनाशकारक गोष्टी करण्यात पूर्णपणे गुंतले आहेत.+ तो त्यांचे अपराध लक्षात ठेवेल आणि त्यांना त्यांच्या पापांची शिक्षा देईल.+ १०  “ओसाड रानातल्या द्राक्षांसारखा इस्राएल मला सापडला.+ तुमचे वाडवडील मला अंजिराच्या झाडाला लागलेल्या पहिल्या अंजिरांप्रमाणे दिसले. पण ते पौरच्या बआलकडे गेले;+त्यांनी स्वतःला लाजिरवाण्या गोष्टीला* समर्पित केलं,+आणि ज्याच्यावर त्यांचं प्रेम आहे, त्याच्यासारखेच ते घृणास्पद बनले आहेत. ११  एफ्राईमचं वैभव पक्ष्यासारखं उडून जातं;कोणाला गर्भ राहणार नाही, किंवा कोणी जन्मही देणार नाही.+ १२  त्यांना मुलं झाली तरी,मी त्यांच्या मुलांना हिरावून घेईन आणि शेवटी त्यांच्यात एकही माणूस उरणार नाही;+मी त्यांच्याकडे पाठ फिरवल्यावर त्यांची खरंच दुर्दशा होईल!+ १३  कुरणात* लावलेला एफ्राईम माझ्यासाठी सोरसारखा होता;+आता एफ्राईमला आपल्या मुलांना कत्तलीसाठी आणावं लागेल.” १४  हे यहोवा, तू त्यांना जे दिलं पाहिजेस, ते त्यांना दे;ज्यात गर्भ टिकत नाही असं गर्भाशय आणि सुकलेले स्तन. १५  “त्यांचा सगळा दुष्टपणा गिलगालमध्ये+ होता,कारण तिथे मी त्यांचा द्वेष करू लागलो. त्यांच्या वाईट कृत्यांमुळे मी त्यांना माझ्या घरातून हाकलून लावीन.+ यापुढे मी त्यांच्यावर प्रेम करणार नाही.+ त्यांचे सगळे अधिकारी हट्टी आहेत. १६  एफ्राईमला एखाद्या झाडासारखं पाडून टाकलं जाईल.+ त्याचं मूळ सुकून जाईल, आणि त्याला फळं येणार नाहीत. त्यांना मुलं झाली, तरी मी त्यांच्या लाडक्या मुलांना* मारून टाकीन.” १७  माझा देव त्यांना नाकारेल,कारण त्यांनी त्याचं ऐकलं नाही,+ते बेघर होऊन राष्ट्रा-राष्ट्रांतून भटकतील.+

तळटीपा

किंवा “वेश्‍येसारखी कामं केल्यामुळे; चारित्र्यहीन वर्तनामुळे.”
शब्दशः “घरात.”
किंवा “त्यांच्याच जिवासाठी.”
किंवा “मेम्फिस.”
किंवा “खाजकुइलीची झुडपं.”
शब्दशः “घरात.”
किंवा “लाजिरवाण्या देवाला.”
किंवा “गुरं चारण्याच्या जमिनीत.”
शब्दशः “संततीला.”