१ इतिहास १:१-५४

  • आदामपासून अब्राहामपर्यंत (१-२७)

  • अब्राहामचे वंशज (२८-३७)

  • अदोमचे लोक, त्यांचे राजे आणि शेख (३८-५४)

 आदाम,शेथ,+अनोश, २  केनान,महललेल,+यारेद,+ ३  हनोख,+मथुशलह,लामेख,+ ४  नोहा,+शेम,+ हाम आणि याफेथ.+ ५  याफेथच्या मुलांची नावं गोमर, मागोग, मादय, यावान, तुबाल,+ मेशेख+ आणि तीरास+ अशी होती. ६  गोमरच्या मुलांची नावं आष्कनाज, रीपाथ आणि तोगार्मा+ अशी होती. ७  यावानच्या मुलांची नावं एलीशा, तार्शीश, कित्तीम आणि रोदानीम अशी होती. ८  हामच्या मुलांची नावं कूश,+ मिस्राईम, पूट आणि कनान+ अशी होती. ९  कूशच्या मुलांची नावं सबा,+ हवीला, साब्ता, रामा+ आणि साब्तका अशी होती. रामाच्या मुलांची नावं शबा आणि ददान+ अशी होती. १०  कूशला आणखी एक मुलगा झाला; त्याचं नाव निम्रोद.+ तो पृथ्वीवरचा पहिला शक्‍तिशाली योद्धा होता. ११  मिस्राईमच्या मुलांची नावं लूदीम,+ अनामीम, लहाबीम, नाप्तुहीम,+ १२  पात्रुसीम,+ कास्लूहीम आणि कफतोरी+ अशी होती; कास्लूहीम याच्यापासून पलिष्टी+ लोक आले. १३  कनानच्या पहिल्या मुलाचं नाव सीदोन+ होतं. नंतर त्याला हेथ+ झाला. १४  तसंच यबूसी,+ अमोरी,+ गिर्गाशी,+ १५  हिव्वी,+ आर्की, शीनी, १६  अर्वादी,+ समारी आणि हमाथी हे लोकही त्याच्यापासून आले. १७  शेमच्या मुलांची नावं एलाम,+ अश्‍शूर,+ अर्पक्षद, लूद व अराम, आणि* ऊस, हूल, गेतेर व मश+ अशी होती. १८  अर्पक्षदच्या मुलाचं नाव शेलह;+ आणि शेलहच्या मुलाचं नाव एबर होतं. १९  एबरला दोन मुलं झाली. एकाचं नाव पेलेग*+ होतं, कारण त्याच्या काळात पृथ्वीची* वाटणी झाली. त्याच्या भावाचं नाव योकतान होतं. २०  योकतानच्या मुलांची नावं अलमोदाद, शेलेफ, हसरमावेथ, येरह,+ २१  हदोराम, ऊजाल, दिक्ला, २२  ओबाल, अबीमाएल, शबा, २३  ओफीर,+ हवीला+ आणि योबाब अशी होती; ही सर्व योकतानची मुलं होती. २४  शेम,अर्पक्षद,शेलह, २५  एबर,पेलेग,+रऊ,+ २६  सरूग,+नाहोर,+तेरह,+ २७  अब्राम, म्हणजेच अब्राहाम.+ २८  अब्राहामच्या मुलांची नावं इसहाक+ आणि इश्‍माएल+ अशी होती. २९  यांचे वंशज हे: इश्‍माएलचा पहिला मुलगा नबायोथ;+ त्याच्यानंतर केदार,+ अदबील, मिबसाम,+ ३०  मिश्‍मा, दुमा, मस्सा, हदाद, तेमा, ३१  यतूर, नाफीश आणि केदमा. ही सगळी इश्‍माएलची मुलं होती. ३२  अब्राहामची उपपत्नी कटूरा+ हिला जिम्रान, यक्षान, मदान, मिद्यान,+ इश्‍बाक आणि शूह+ ही मुलं झाली. यक्षानला शबा व ददान+ ही मुलं झाली. ३३  मिद्यानला एफा,+ एफर, हनोख, अबीदा आणि एल्दा ही मुलं झाली. ही सगळी कटूराची मुलं होती. ३४  अब्राहामला इसहाक+ हा मुलगा झाला. इसहाकला एसाव+ व इस्राएल+ ही मुलं झाली. ३५  एसावच्या मुलांची नावं अलीफज, रगुवेल, यऊश, यालाम आणि कोरह+ अशी होती. ३६  अलीफजच्या मुलांची नावं तेमान,+ ओमार, सपो, गाताम, कनाज, तिम्ना आणि अमालेक+ अशी होती. ३७  रगुवेलच्या मुलांची नावं नहाथ, जेरह, शाम्मा आणि मिज्जा+ अशी होती. ३८  सेईरच्या+ मुलांची नावं लोटान, शोबाल, सिबोन, अना, दिशोन, एजेर आणि दिशान+ अशी होती. ३९  लोटानच्या मुलांची नावं होरी आणि होमाम अशी होती. लोटानच्या बहिणीचं नाव तिम्ना+ होतं. ४०  शोबालच्या मुलांची नावं अलवान, मानाहथ, एबाल, शपो आणि ओनाम अशी होती. सिबोनच्या मुलांची नावं अय्या आणि अना+ अशी होती. ४१  अनाच्या मुलाचं नाव दिशोन होतं. दिशोनच्या मुलांची नावं हेमदान, एश्‍बान, इथ्रान आणि करान+ अशी होती. ४२  एजेरच्या+ मुलांची नावं बिल्हान, जावान आणि अकान अशी होती. दिशानच्या मुलांची नावं ऊस आणि अरान+ अशी होती. ४३  इस्राएली लोकांवर कोणत्याही राजाने राज्य करण्याआधी,+ अदोम+ देशात या राजांनी राज्य केलं: बौरचा मुलगा बेला; त्याच्या शहराचं नाव दिन्हाबा होतं. ४४  बेलाचा मृत्यू झाल्यावर, बस्रा+ इथल्या जेरहचा मुलगा योबाब त्याच्या जागी राज्य करू लागला. ४५  योबाबचा मृत्यू झाल्यावर, तेमानी लोकांच्या देशातला हूशाम त्याच्या जागी राज्य करू लागला. ४६  हूशामचा मृत्यू झाल्यावर, मवाबच्या प्रदेशात मिद्यानी लोकांना हरवणारा बदादचा मुलगा हदाद त्याच्या जागी राज्य करू लागला; त्याच्या शहराचं नाव अवीत होतं. ४७  हदादचा मृत्यू झाल्यावर, मास्रेका इथला साम्ला त्याच्या जागी राज्य करू लागला. ४८  साम्लाचा मृत्यू झाल्यावर, नदीजवळच्या रहोबोथ शहरातला शौल त्याच्या जागी राज्य करू लागला. ४९  शौलचा मृत्यू झाल्यावर, अखबोरचा मुलगा बाल-हनान त्याच्या जागी राज्य करू लागला. ५०  बाल-हनानचा मृत्यू झाल्यावर, हदाद त्याच्या जागी राज्य करू लागला. त्याच्या शहराचं नाव पाऊ होतं. त्याच्या बायकोचं नाव महेटाबेल होतं. ती मात्रेदची मुलगी आणि मेजाहाबची नात होती. ५१  मग हदादचा मृत्यू झाला. अदोमचे शेख* हे होते: शेख तिम्ना, शेख आल्वा, शेख यतेथ,+ ५२  शेख अहलीबामा, शेख एलाह, शेख पीनोन, ५३  शेख कनाज, शेख तेमान, शेख मिब्सार, ५४  शेख माग्दीएल आणि शेख ईराम. हे सर्व अदोमचे शेख होते.

तळटीपा

पुढे दिलेली नावं अरामच्या मुलांची आहेत. उत्प १०:२३ पाहा.
किंवा “पृथ्वीच्या लोकसंख्येची.”
म्हणजे, “विभागणी.”
शेख म्हणजे कुळाचा प्रमुख. उत्प ३६:१५ तळटीप पाहा.