१ इतिहास २:१-५५
२ इस्राएलच्या+ मुलांची नावं ही होती: रऊबेन,+ शिमोन,+ लेवी,+ यहूदा,+ इस्साखार,+ जबुलून,+
२ दान,+ योसेफ,+ बन्यामीन,+ नफताली,+ गाद+ आणि आशेर.+
३ यहूदाच्या मुलांची नावं ही होती: एर, ओनान आणि शेला. ही तिन्ही मुलं यहूदाला आपल्या कनानी बायकोपासून, म्हणजे शूवाच्या मुलीपासून झाली होती.+ पण यहूदाचा पहिला मुलगा एर हा यहोवाच्या* नजरेत दुष्ट होता, त्यामुळे देवाने त्याला मारून टाकलं.+
४ यहूदाची सून तामार+ हिला यहूदापासून पेरेस+ आणि जेरह ही मुलं झाली. यहूदाला अशी एकूण पाच मुलं झाली.
५ पेरेसच्या मुलांची नावं हेस्रोन आणि हामूल+ अशी होती.
६ जेरह याला जिम्री, एथान, हेमान, कल्कोल आणि दारा अशी एकूण पाच मुलं होती.
७ कर्मीच्या मुलाचं नाव आखार* होतं. यानेच इस्राएलवर मोठं संकट आणलं होतं;+ ज्या गोष्टींचा नाश करायची आज्ञा देण्यात आली होती,+ ती आज्ञा मोडून त्याने अविश्वासूपणा दाखवला होता.
८ एथानच्या मुलाचं नाव अजऱ्या होतं.
९ हेस्रोनच्या मुलांची नावं यरहमेल,+ राम+ आणि कलुबाय* अशी होती.
१० रामच्या मुलाचं नाव अम्मीनादाब होतं. अम्मीनादाबच्या+ मुलाचं नाव नहशोन+ असून तो यहूदाच्या वंशजांचा प्रधान होता.
११ नहशोनच्या मुलाचं नाव सल्मा;+ आणि सल्माच्या मुलाचं नाव बवाज+ होतं.
१२ बवाजच्या मुलाचं नाव ओबेद; आणि ओबेदच्या मुलाचं नाव इशाय+ होतं.
१३ इशायच्या पहिल्या मुलाचं नाव अलीयाब, दुसऱ्याचं अबीनादाब,+ तिसऱ्याचं शिमा,+
१४ चौथ्याचं नथनेल, पाचव्याचं रदाय,
१५ सहाव्याचं ओसेम आणि सातव्याचं दावीद+ होतं.
१६ त्यांच्या बहिणींची नावं सरूवा आणि अबीगईल+ अशी होती. सरूवाच्या तीन मुलांची नावं अबीशय,+ यवाब+ आणि असाएल+ अशी होती.
१७ अबीगईलच्या मुलाचं नाव अमासा+ होतं. आणि अमासाच्या वडिलांचं नाव येथेर असून ते इश्माएली होते.
१८ हेस्रोनचा मुलगा कालेब* याला आपली बायको अजूबा आणि यरियोथ यांच्यापासून मुलं झाली. त्याच्या मुलांची नावं येशेर, शोबाब आणि अर्दोन अशी होती.
१९ अजूबाचा मृत्यू झाल्यावर कालेबने एफ्राथशी+ लग्न केलं आणि तिच्यापासून त्याला हूर+ हा मुलगा झाला.
२० हूरच्या मुलाचं नाव उरी; आणि उरीच्या मुलाचं नाव बसालेल+ होतं.
२१ पुढे हेस्रोनने माखीरच्या+ मुलीशी लग्न केलं (माखीर हे गिलादचे+ वडील होते); आणि तिच्यापासून त्याला सगूब हा मुलगा झाला; हेस्रोनने लग्न केलं तेव्हा तो ६० वर्षांचा होता.
२२ सगूबच्या मुलाचं नाव याईर+ होतं; गिलादच्या+ प्रदेशात याईरची २३ शहरं होती.
२३ नंतर, गशूरच्या+ आणि सीरियाच्या+ लोकांनी त्यांच्याकडून हव्वोथयाईर+ घेतलं. यासोबतच, त्यांनी कनाथ+ आणि त्याची आजूबाजूची नगरं, अशी एकूण ६० शहरं घेतली. गिलादचे वडील माखीर यांचे हे सगळे वंशज होते.
२४ कालेब-एफ्राथा इथे हेस्रोनच्या+ मृत्यूनंतर, त्याची बायको अबीया हिला अशहूर+ हा मुलगा झाला; अशहूर हा नंतर तकोवाचा+ पिता बनला.*
२५ हेस्रोनचा पहिला मुलगा यरहमेल याच्या मुलांची नावं ही: पहिला मुलगा राम, त्यानंतर बुना, ओरेन, ओसेम आणि अहीया.
२६ यरहमेलची आणखी एक बायको होती. तिचं नाव अटारा असून ती ओनाम याची आई होती.
२७ यरहमेलचा पहिला मुलगा राम याच्या मुलांची नावं मास, यामीन आणि एकर अशी होती.
२८ ओनामच्या मुलांची नावं शम्मय आणि यादा अशी होती. शम्मयच्या मुलांची नावं नादाब आणि अबीशूर अशी होती.
२९ अबीशूरच्या बायकोचं नाव अबीहईल असून, तिला अहबान आणि मोलीद ही मुलं झाली.
३० नादाबच्या मुलांची नावं सलेद व अप्पईम अशी होती; पण सलेद हा बेवारस मेला.
३१ अप्पईमच्या मुलाचं नाव इशी; इशीच्या मुलाचं नाव शेशान आणि शेशानच्या मुलाचं नाव अहलय होतं.
३२ शम्मयचा भाऊ यादा याच्या मुलांची नावं येथेर आणि योनाथान अशी होती; पण येथेर हा बेवारस मेला.
३३ योनाथानच्या मुलांची नावं पेलेथ आणि जाजा अशी होती. हे सर्व यरहमेलचे वंशज होते.
३४ शेशानला एकही मुलगा नव्हता, फक्त मुलीच होत्या. त्याचा यरहा नावाचा इजिप्तमधला* एक सेवक होता.
३५ शेशानने आपल्या मुलीचं लग्न त्या सेवकाशी लावून दिलं. आणि तिला त्याच्यापासून अत्तय हा मुलगा झाला.
३६ अत्तयच्या मुलाचं नाव नाथान; आणि नाथानच्या मुलाचं नाव जाबाद होतं.
३७ जाबादच्या मुलाचं नाव एफ्लाल; आणि एफ्लालच्या मुलाचं नाव ओबेद होतं.
३८ ओबेदच्या मुलाचं नाव येहू; आणि येहूच्या मुलाचं नाव अजऱ्या होतं.
३९ अजऱ्याच्या मुलाचं नाव हेलस; आणि हेलसच्या मुलाचं नाव एलासाह होतं.
४० एलासाहच्या मुलाचं नाव सिस्माय; आणि सिस्मायच्या मुलाचं नाव शल्लूम होतं.
४१ शल्लूमच्या मुलाचं नाव यकम्या; आणि यकम्याच्या मुलाचं नाव अलीशामा असं होतं.
४२ यरहमेलचा भाऊ कालेब*+ याची ही मुलं: पहिला मुलगा मेशा (मेशा हा जीफचा पिता होता) आणि मारेशाची मुलं (मारेशा हा हेब्रोनचा पिता होता).
४३ हेब्रोनच्या मुलांची नावं कोरह, तप्पूहा, रेकेम आणि शेमा अशी होती.
४४ शेमाच्या मुलाचं नाव रहम; आणि रहमच्या मुलाचं नाव यरकाम होतं. रेकेमच्या मुलाचं नाव शम्मय;
४५ शम्मयच्या मुलाचं नाव मावोन; आणि मावोनच्या मुलाचं नाव बेथ-सूर+ होतं.
४६ कालेबची उपपत्नी एफा हिला हारान, मोसा आणि गाजेज ही मुलं झाली. हारानच्या मुलाचं नाव गाजेज होतं.
४७ यादायच्या मुलांची नावं रेगेम, योथाम, गेशान, पेलेट, एफा आणि शाफ अशी होती.
४८ कालेबची उपपत्नी माका हिला शेबेर आणि तिऱ्हना ही मुलं झाली.
४९ पुढे तिला शाफ आणि शवा ही मुलं झाली; (शाफला मदमन्ना+ आणि शवाला मखबेना आणि गिबा+ ही मुलं झाली.) कालेबच्या+ मुलीचं नाव अखसा+ होतं.
५० हे सर्व कालेबचे वंशज होते.
एफ्राथचा+ पहिला मुलगा हूर+ याच्या मुलांची नावं ही: किर्याथ-यारीमचा+ पिता शोबाल,
५१ बेथलेहेमचा+ पिता सल्मा आणि बेथ-गादेरचा पिता हारेफ.
५२ किर्याथ-यारीमचा पिता शोबाल याची ही मुलं: हारोवे आणि मनुहोथचे अर्धे लोक.
५३ किर्याथ-यारीम इथली घराणी ही: इथ्री,+ पूथी, शुमाथी आणि मिश्राई. यांच्यापासून सराथीचे+ आणि अष्टावोलचे+ लोक आले.
५४ सल्माची मुलं ही: बेथलेहेमचे,+ नटोफाचे आणि अटरोथ-बेथ-यवाबचे लोक; तसंच मानाहथचे अर्धे लोक व सोरी लोक.
५५ याबेस इथे राहणाऱ्या शास्त्र्यांची घराणी ही: तिराथी, शिमाथी व सुकाथी. हे केनी+ लोक असून, रेखाबच्या+ घराण्याचा पिता हम्मथ याचे वंशज होते.
तळटीपा
^ शब्दार्थसूची पाहा.
^ या अध्यायातल्या १८, १९ व ४२ या वचनांत त्याला कालेब असंही म्हटलं आहे.
^ नवव्या वचनात याला कलुबाय असंही म्हटलं आहे.
^ या पुस्तकात काही नावं लोकांना नाही, तर जागेला सूचित करतात. अशा वेळी “पिता” किंवा “वडील” हे शब्द “ती जागा स्थापन करणाऱ्याला” सूचित करतात.
^ किंवा “मिसरमधला.”
^ नवव्या वचनात याला कलुबाय असंही म्हटलं आहे.