१ इतिहास २५:१-३१

  • देवाच्या मंदिरातले संगीतकार आणि गायक (१-३१)

२५  पुढे दावीद आणि मंदिरात सेवा करणाऱ्‍या गटांचे प्रमुख यांनी आसाफ, हेमान आणि यदूथून यांच्या काही मुलांना वेगळं केलं.+ त्यांनी त्यांना वीणा,* तंतुवाद्यं+ आणि झांजा+ वाजवून भविष्यवाणी करण्याच्या सेवेसाठी वेगळं केलं. या सेवेसाठी नेमलेल्या पुरुषांची नावं ही: २  आसाफच्या मुलांपैकी जक्कूर, योसेफ, नथन्या आणि अशरेलाह. आसाफची ही मुलं त्याच्या देखरेखीखाली सेवा करायची आणि आसाफ हा राजाच्या देखरेखीखाली भविष्यवाणी करायचा. ३  यदूथूनच्या+ मुलांपैकी गदल्या, सरी, यशाया, शिमी, हशब्याह आणि मतिथ्य.+ यदूथूनची ही सहा मुलं त्याच्या देखरेखीखाली सेवा करायची. यदूथून हा वीणा वाजवून भविष्यवाणी करायचा आणि यहोवाचे आभार मानायचा व त्याची स्तुती करायचा.+ ४  हेमानच्या+ मुलांपैकी बुक्कीया, मत्तन्याह, उज्जियेल, शबुएल, यरीमोथ, हनन्या, हनानी, अलियाथा, गिद्दाल्ती, रोममती-एजेर, याशबकाशा, मल्लोथी, होथीर आणि महजियोथ. ५  ही सर्व हेमानची मुलं होती. हेमान हा राजासाठी दृष्टान्त पाहणारा असून तो खऱ्‍या देवाचा गौरव करण्यासाठी त्याचा संदेश सांगायचा. अशा प्रकारे, खऱ्‍या देवाने त्याला १४ मुलं आणि ३ मुली दिल्या. ६  हेमानची ही सर्व मुलं खऱ्‍या देवाची सेवा करण्यासाठी, आपल्या वडिलांच्या मार्गदर्शनाखाली यहोवाच्या मंदिरात झांजा, तंतुवाद्यं आणि वीणा+ वाजवून गीतं गायची. आसाफ, यदूथून आणि हेमान हे तिघं राजाच्या देखरेखीखाली सेवा करायचे. ७  या सगळ्यांची आणि यांच्या भाऊबंदांची संख्या २८८ इतकी होती. त्यांना यहोवासाठी गीत गाण्याचं प्रशिक्षण मिळालं असून ते गाण्यात तरबेज होते. ८  या सर्वांनी, मग तो छोटा असो किंवा मोठा, शिकाऊ असो किंवा कुशल, चिठ्ठ्या टाकून+ आपली कामं वाटून घेतली. ९  पहिली चिठ्ठी आसाफचा मुलगा योसेफ+ याची निघाली. दुसरी गदल्याची+ (तो, त्याची मुलं आणि त्याचे भाऊ मिळून १२); १०  तिसरी जक्कूरची;+ त्याची मुलं आणि त्याचे भाऊ मिळून १२; ११  चौथी इस्रीची; त्याची मुलं आणि त्याचे भाऊ मिळून १२; १२  पाचवी नथन्याची;+ त्याची मुलं आणि त्याचे भाऊ मिळून १२; १३  सहावी बुक्कीयाची; त्याची मुलं आणि त्याचे भाऊ मिळून १२; १४  सातवी यशरेलाहची; त्याची मुलं आणि त्याचे भाऊ मिळून १२; १५  आठवी यशायाची; त्याची मुलं आणि त्याचे भाऊ मिळून १२; १६  नववी मत्तन्याहची; त्याची मुलं आणि त्याचे भाऊ मिळून १२; १७  दहावी शिमीची; त्याची मुलं आणि त्याचे भाऊ मिळून १२; १८  ११ वी अजरेलची; त्याची मुलं आणि त्याचे भाऊ मिळून १२; १९  १२ वी हशब्याहची; त्याची मुलं आणि त्याचे भाऊ मिळून १२; २०  १३ वी शूबाएलची;+ त्याची मुलं आणि त्याचे भाऊ मिळून १२; २१  १४ वी मतिथ्यची; त्याची मुलं आणि त्याचे भाऊ मिळून १२; २२  १५ वी यरेमोथची; त्याची मुलं आणि त्याचे भाऊ मिळून १२; २३  १६ वी हनन्याची; त्याची मुलं आणि त्याचे भाऊ मिळून १२; २४  १७ वी याशबकाशाची; त्याची मुलं आणि त्याचे भाऊ मिळून १२; २५  १८ वी हनानीची; त्याची मुलं आणि त्याचे भाऊ मिळून १२; २६  १९ वी मल्लोथीची; त्याची मुलं आणि त्याचे भाऊ मिळून १२; २७  २० वी अलियाथाची; त्याची मुलं आणि त्याचे भाऊ मिळून १२; २८  २१ वी होथीरची; त्याची मुलं आणि त्याचे भाऊ मिळून १२; २९  २२ वी गिद्दाल्तीची;+ त्याची मुलं आणि त्याचे भाऊ मिळून १२; ३०  २३ वी महजियोथची;+ त्याची मुलं आणि त्याचे भाऊ मिळून १२; ३१  आणि २४ वी रोममती-एजेरची;+ त्याची मुलं आणि त्याचे भाऊ मिळून १२.

तळटीपा