१ इतिहास २७:१-३४

  • राजाच्या सेवेसाठी असलेले अधिकारी (१-३४)

२७  राजाच्या सैन्यात इस्राएली लोकांचे पुढील गट होते. या सैन्य-गटांत घराण्यांचे प्रमुख, हजारांवर व शंभरांवर असलेले प्रमुख+ आणि या गटांची देखरेख करणारे अधिकारी होते. सैन्याच्या एका गटात २४,००० माणसं होती. आणि वर्षातला एक महिना प्रत्येक गट राजाची सेवा करायचा.+ २  पहिल्या महिन्यासाठी नेमलेल्या पहिल्या सैन्य-गटाचा प्रमुख याशबाम+ होता. तो जब्दीएलचा मुलगा असून त्याच्या सैन्य-गटात २४,००० माणसं होती. ३  याशबाम हा पेरेसचा वंशज+ होता. पहिल्या महिन्यात सेवा करायला नेमलेल्या गटातल्या सर्व तुकड्यांच्या अधिकाऱ्‍यांवर तो प्रमुख होता. ४  दुसऱ्‍या महिन्यासाठी नेमलेल्या गटाचा प्रमुख दोदय+ असून तो अहोहीचा वंशज+ होता. मिक्लोथ हा त्याचा सहायक होता आणि त्याच्या सैन्य-गटात २४,००० माणसं होती. ५  तिसऱ्‍या महिन्यासाठी सेवा करायला नेमलेल्या तिसऱ्‍या सैन्य-गटाचा प्रमुख बनाया+ होता. तो मुख्य याजक यहोयादा+ याचा मुलगा होता. आणि त्याच्या गटात २४,००० माणसं होती. ६  बनाया हा तीस शूर योद्ध्यांपैकी एक असून त्यांचा अधिकारी होता. आणि त्याचा मुलगा अम्मीजाबाद हा त्याच्या सैन्य-गटाचा प्रमुख होता. ७  चौथ्या महिन्यासाठी नेमलेल्या चौथ्या सैन्य-गटाचा प्रमुख यवाबचा भाऊ+ असाएल+ होता. असाएलनंतर त्याचा मुलगा जबद्याह त्याच्या जागी प्रमुख बनला. आणि त्याच्या गटात २४,००० माणसं होती. ८  पाचव्या महिन्यासाठी नेमलेल्या पाचव्या सैन्य-गटाचा प्रमुख शम्हूथ होता. तो इज्रह्‍या याच्या वंशातला होता. आणि त्याच्या गटात २४,००० माणसं होती. ९  सहाव्या महिन्यासाठी नेमलेल्या सहाव्या सैन्य-गटाचा प्रमुख ईरा+ होता. तो इक्केश तकोई+ याचा मुलगा होता. आणि त्याच्या गटात २४,००० माणसं होती. १०  सातव्या महिन्यासाठी नेमलेल्या सातव्या सैन्य-गटाचा प्रमुख हेलस+ पलोनी असून तो एफ्राईमच्या वंशातला होता. आणि त्याच्या गटात २४,००० माणसं होती. ११  आठव्या महिन्यासाठी नेमलेल्या आठव्या सैन्य-गटाचा प्रमुख सिब्बखय+ हूशाथी असून तो जेरहच्या वंशातला+ होता. आणि त्याच्या गटात २४,००० माणसं होती. १२  नवव्या महिन्यासाठी नेमलेल्या नवव्या सैन्य-गटाचा प्रमुख अबियेजेर+ अनाथोथी+ असून तो बन्यामीनच्या वंशातला होता. आणि त्याच्या गटात २४,००० माणसं होती. १३  दहाव्या महिन्यासाठी नेमलेल्या दहाव्या सैन्य-गटाचा प्रमुख महरय+ नटोफाथी असून तो जेरहच्या वंशातला+ होता. त्याच्या गटात २४,००० माणसं होती. १४  ११ व्या महिन्यासाठी नेमलेल्या ११ व्या सैन्य-गटाचा प्रमुख बनाया+ पिराथोनी असून तो एफ्राईमच्या वंशातला होता. त्याच्या गटात २४,००० माणसं होती. १५  १२ व्या महिन्यासाठी नेमलेल्या १२ व्या सैन्य-गटाचा प्रमुख हेल्दय नटोफाथी असून तो अथनिएलच्या वंशातला होता. त्याच्या गटात २४,००० माणसं होती. १६  इस्राएलच्या वंशांचे पुढारी हे होते: रऊबेन वंशाचा पुढारी जिख्रीचा मुलगा अलियेजर होता. शिमोन वंशाचा पुढारी माकाचा मुलगा शपत्याह होता. १७  लेवी वंशाचा पुढारी कमुवेलचा मुलगा हशब्याह होता; अहरोनच्या वंशजांचा पुढारी सादोक होता. १८  यहूदा वंशाचा पुढारी अलीहू+ होता; तो दावीदच्या भावांपैकी एक होता. इस्साखार वंशाचा पुढारी मीखाएलचा मुलगा अम्री होता. १९  जबुलून वंशाचा पुढारी ओबद्याचा मुलगा इश्‍माया होता. नफताली वंशाचा पुढारी अज्रीएलचा मुलगा यरीमोथ होता. २०  एफ्राईम वंशाचा पुढारी अजज्याचा मुलगा होशे होता. मनश्‍शेच्या अर्ध्या वंशाचा पुढारी पदायाहचा मुलगा योएल होता. २१  गिलादमध्ये असलेल्या मनश्‍शेच्या अर्ध्या वंशाचा पुढारी जखऱ्‍याचा मुलगा इद्दो होता. बन्यामीन वंशाचा पुढारी अबनेरचा+ मुलगा यासीएल होता. २२  दान वंशाचा पुढारी यरोहामचा मुलगा अजरेल होता. हे सर्व इस्राएलच्या वंशांचे अधिकारी होते. २३  पण दावीदने, २० वर्षं आणि त्याहून कमी वय असलेल्यांना मोजलं नाही. कारण यहोवाने असं अभिवचन दिलं होतं, की तो इस्राएली लोकांची संख्या आकाशातल्या ताऱ्‍यांइतकी अगणित करेल.+ २४  सरूवाचा मुलगा यवाब हा लोकांची संख्या मोजू लागला. पण त्याने ते काम पूर्ण केलं नाही. त्यांची संख्या मोजल्यामुळे देवाचा राग इस्राएलवर भडकला.+ म्हणून लोकांची संख्या दावीद राजाच्या काळातल्या इतिहासाच्या पुस्तकात लिहिण्यात आलेली नाही. २५  अदिएलचा मुलगा अजमावेथ हा राजाच्या भांडारांवर अधिकारी होता.+ उज्जीयाचा मुलगा योनाथान हा शेतांतल्या, शहरांतल्या, गावांतल्या आणि मनोऱ्‍यांतल्या* कोठारांवर* अधिकारी होता. २६  कलूबचा मुलगा एज्री हा शेतीची कामं करणाऱ्‍यांवर अधिकारी होता. २७  शिमी रामाथी हा द्राक्षमळ्यांचा अधिकारी होता. जब्दी शिफमी हा द्राक्षमळ्यांच्या उत्पन्‍नावर आणि द्राक्षारसाच्या कोठारांवर अधिकारी होता. २८  गेदेरचा बाल-हनान हा शेफीलातल्या+ जैतुनाच्या बागांची आणि उंबराच्या झाडांची+ देखरेख करणारा अधिकारी होता. योवाश हा तेलाच्या कोठारांवर अधिकारी होता. २९  शारोनमध्ये+ राहणारा शित्रय हा तिथे चरणाऱ्‍या गुराढोरांची देखरेख करणारा अधिकारी होता. आणि अदलयचा मुलगा शाफाट हा खोऱ्‍यातल्या गुरांची देखरेख करणारा अधिकारी होता. ३०  ओबील इश्‍माएली हा उंटांची देखरेख करणारा अधिकारी होता. तर येहद्या मेरोनोथी हा गाढवांची देखरेख करणारा अधिकारी होता. ३१  याजीज हागारी हा मेंढरांच्या व बकऱ्‍यांच्या कळपांची देखरेख करणारा अधिकारी होता. हे सर्व अधिकारी दावीद राजाच्या मालमत्तेची देखरेख करायचे. ३२  दावीदचा पुतण्या योनाथान+ हा सल्लागार असून एक हुशार माणूस होता. तो सचिव होता. आणि हखमोनीचा मुलगा यहीएल हा राजाच्या मुलांची+ देखभाल करायचा. ३३  अहिथोफेल+ हा राजाचा सल्लागार होता आणि हूशय+ अर्की राजाचा मित्र* होता. ३४  अहिथोफेलनंतर बनायाचा+ मुलगा यहोयादा व अब्याथार+ हे सल्लागार होते. आणि यवाब+ हा राजाचा सेनापती होता.

तळटीपा

अतिशय उंच इमारत.
किंवा “खजिन्यांवर.”
किंवा “विश्‍वासातला माणूस.”