१ इतिहास ३:१-२४

  • दावीदचे वंशज (१-९)

  • दावीदचं राजघराणं (१०-२४)

 दावीदला हेब्रोनमध्ये+ जी मुलं झाली त्यांची नावं ही: त्याच्या पहिल्या मुलाचं नाव अम्नोन;+ हा त्याला इज्रेलमधल्या अहीनवामपासून+ झाला होता. त्याच्या दुसऱ्‍या मुलाचं नाव दानीएल; हा त्याला कर्मेलमधल्या अबीगईलपासून+ झाला होता. २  त्याचा तिसरा मुलगा अबशालोम,+ त्याला माकापासून झाला होता; माका ही गशूरचा राजा तलमय याची मुलगी होती. त्याचा चौथा मुलगा अदोनीया,+ त्याला हग्गीथ हिच्यापासून झाला होता. ३  दावीदचा पाचवा मुलगा शपत्याह, त्याला अबीटलपासून झाला होता. आणि त्याचा सहावा मुलगा इथ्राम असून, तो त्याला आपली बायको एग्ला हिच्यापासून झाला होता. ४  दावीदला ही सहा मुलं हेब्रोनमध्ये झाली होती. त्याने हेब्रोनमधून ७ वर्षं आणि ६ महिने राज्य केलं; तर, यरुशलेममधून ३३ वर्षं राज्य केलं.+ ५  दावीदला यरुशलेममध्ये+ जी मुलं झाली त्यांची नावं ही: शिमा, शोबाब, नाथान+ आणि शलमोन.+ दावीदला ही चार मुलं अम्मीएलच्या मुलीपासून, बथशेबापासून+ झाली होती. ६  आणि त्याच्या इतर नऊ मुलांची नावं ही: इभार, अलीशामा, अलीफलेट, ७  नोगा, नेफेग, याफीय, ८  अलीशामा, एल्यादा आणि अलीफलेट. ९  ही सर्व दावीदची मुलं होती. आणि तामार+ त्यांची बहीण होती. यांशिवाय, त्याला आपल्या उपपत्नींपासूनही मुलं झाली. १०  शलमोनच्या मुलाचं नाव रहबाम+ होतं. रहबामच्या मुलाचं नाव अबीया;+ अबीयाच्या मुलाचं नाव आसा;+ आसाच्या मुलाचं नाव यहोशाफाट;+ ११  यहोशाफाटच्या मुलाचं नाव यहोराम,+ यहोरामच्या मुलाचं नाव अहज्या;+ अहज्याच्या मुलाचं नाव यहोआश;+ १२  यहोआशच्या मुलाचं नाव अमस्या;+ अमस्याच्या मुलाचं नाव अजऱ्‍या;+ अजऱ्‍याच्या मुलाचं नाव योथाम;+ १३  योथामच्या मुलाचं नाव आहाज;+ आहाजच्या मुलाचं नाव हिज्कीया;+ हिज्कीयाच्या मुलाचं नाव मनश्‍शे;+ १४  मनश्‍शेच्या मुलाचं नाव आमोन;+ आणि आमोनच्या मुलाचं नाव योशीया+ होतं. १५  योशीयाची मुलं ही: पहिला योहानान, दुसरा यहोयाकीम,+ तिसरा सिद्‌कीया+ आणि चौथा शल्लूम. १६  यहोयाकीमच्या मुलाचं नाव यखन्या; आणि यखन्याच्या+ मुलाचं नाव सिद्‌कीया होतं. १७  बंदिवान यखन्या याच्या मुलांची नावं ही: शल्तीएल, १८  मल्कीराम, पदायाह, शेनस्सर, यकम्या, होशामा आणि नदब्या. १९  पदायाहच्या मुलांची नावं जरूब्बाबेल+ आणि शिमी अशी होती. जरूब्बाबेलच्या मुलांची नावं मशुल्लाम आणि हनन्या अशी होती (शलोमीथ ही त्यांची बहीण होती); २०  त्याच्या इतर पाच मुलांची नावं ही: हशूबा, ओहेल, बरेख्या, हसदया आणि यूशब-हेसेद. २१  हनन्याच्या मुलांची नावं पलत्याह आणि यशाया अशी होती; यशायाच्या मुलाचं नाव रफाया; रफायाच्या मुलाचं नाव अर्णान; अर्णानच्या मुलाचं नाव ओबद्या; आणि ओबद्याच्या मुलाचं नाव शखन्याह असं होतं. २२  शखन्याहची मुलं* ही: शमाया आणि शमायाची मुलं, म्हणजे हत्तूश, इगाल, बारीहा, निरय्या आणि शाफाट, अशी एकूण सहा मुलं. २३  निरय्याच्या तीन मुलांची नावं एल्योवेनय, हिज्कीया आणि अज्रीकाम अशी होती. २४  एल्योवेनयच्या सात मुलांची नावं ही: होदव्याह, एल्याशीब, पलायाह, अक्कूब, योहानान, दलाया आणि अनानी.

तळटीपा

हिब्रू भाषेत “मुलं” असं जे म्हटलं आहे त्याचा अर्थ मुलगा, नातू किंवा वंशज असाही होऊ शकतो.