१ इतिहास ४:१-४३

  • यहूदाचे इतर वंशज (१-२३)

    • याबेस आणि त्याची प्रार्थना (९, १०)

  • शिमोनचे वंशज (२४-४३)

 यहूदाच्या मुलांची नावं पेरेस,+ हेस्रोन,+ कर्मी, हूर+ आणि शोबाल+ अशी होती. २  शोबालच्या मुलाचं नाव राया; रायाच्या मुलाचं नाव यहथ; यहथच्या मुलाचं नाव अहूमय व लहद असं होतं; ही सर्व सराथी+ लोकांची घराणी होती. ३  एटामच्या+ वडिलांची मुलं ही: इज्रेल, इश्‍मा आणि इद्‌बाश (त्यांच्या बहिणीचं नाव हस्सलेलपोनी असं होतं). ४  पनुएलच्या मुलाचं नाव गदोर; आणि एजेरच्या मुलाचं नाव हूशा होतं. ही हूरची+ मुलं होती. (हूर हा एफ्राथ हिचा पहिला मुलगा होता.) हूर हा बेथलेहेमचा+ पिता होता. ५  अशहूर+ हा तकोवाचा+ पिता असून, त्याला हेला आणि नारा अशा दोन बायका होत्या. ६  त्याला नारा हिच्यापासून अहुज्जाम, हेफेर, तेमनी आणि अहष्टारी ही मुलं झाली. ही सर्व नाराची मुलं होती. ७  हेलाच्या मुलांची नावं सेरथ, इसहार आणि एथनान अशी होती. ८  कोसचे वंशज हे: आनूब, सोबेबा आणि हारुमचा मुलगा अहरहेल याच्या घराण्यातले लोक. ९  याबेस आपल्या भावांमध्ये जास्त प्रतिष्ठित होता. त्याच्या आईने त्याचं नाव याबेस* ठेवलं; कारण ती म्हणाली: “याला जन्म देताना मला फार वेदना झाल्या.” १०  याबेसने इस्राएलच्या देवाला अशी प्रार्थना केली: “हे देवा, मला आशीर्वाद दे आणि माझ्या प्रदेशाच्या सीमा वाढव. माझ्या पाठीशी राहा आणि संकटापासून मला वाचव, म्हणजे माझं काही वाईट होणार नाही!” तेव्हा देवाने त्याची प्रार्थना ऐकून त्याच्या म्हणण्याप्रमाणे केलं. ११  शूहाचा भाऊ कलूब याच्या मुलाचं नाव महीर होतं. महीरच्या मुलाचं नाव एष्टोन; १२  एष्टोनच्या मुलांची नावं बेथ-राफा, पासेहा आणि तहिन्‍ना अशी होती; तहिन्‍ना हा ईर-नाहाशचा पिता होता. ही रेकाह इथली माणसं होती. १३  कनाजच्या मुलांची नावं अथनिएल+ व सराया अशी होती. आणि अथनिएलच्या मुलाचं नाव हथथ असं होतं. १४  म्योनोथायच्या मुलाचं नाव अफ्रा होतं. सरायाच्या मुलाचं नाव यवाब होतं. यवाब हा गेहराशीमच्या* लोकांचा पिता होता; हे नाव, त्यांना कुशल कारागीर असल्यामुळे पडलं. १५  यफुन्‍नेचा मुलगा कालेब+ याच्या मुलांची नावं ही: इरू, एलाह आणि नाम. एलाहच्या मुलाचं नाव कनाज होतं. १६  यहल्ललेलच्या मुलांची नावं जीफ, जीफा, तीरीया आणि असरेल अशी होती. १७  एजराहच्या मुलांची नावं येथेर, मेरेद, एफर आणि यालोन अशी होती; तिने* मिर्याम, शम्मय आणि इश्‍बह यांना जन्म दिला; इश्‍बह हा एष्टमोवाचा पिता होता. १८  (त्याला आपल्या यहुदी बायकोपासून येरेद, हेबेर आणि यकूथीएल ही मुलं झाली; येरेद हा गदोरचा पिता होता, हेबेर हा सोखोचा पिता होता आणि यकूथीएल हा जानोहचा पिता होता.) ही सर्व बिथ्याची मुलं होती. बिथ्या ही फारोची मुलगी असून तिने मेरेदशी लग्न केलं होतं. १९  नहमची बहीण, म्हणजे होदीयाची बायको हिला जे मुलगे झाले, ते गार्मी लोकांच्या कईलाचे आणि माकाथी लोकांच्या एष्टमोवाचे पिता होते. २०  शिमोनच्या मुलांची नावं अम्नोन, रिन्‍ना, बेन-हानान आणि तिलोन अशी होती. आणि इशीच्या मुलांची नावं जोहेथ आणि बेन-जोहेथ अशी होती. २१  यहूदाचा मुलगा शेला+ याचे वंशज हे: लेखाचा पिता एर आणि मारेशाचा पिता लादा; तसंच, चांगल्या प्रतीचं कापड विणणारे अश्‍बेच्या घराण्यातल्या कारागिरांच्या कुटुंबांतले लोक. २२  याशिवाय याशूबी-लेहेम आणि मवाबी स्त्रियांशी लग्न केलेले कोजेबाचे लोक, योकीम, योवाश व साराफ. या सर्व प्राचीन काळातल्या नोंदी आहेत. २३  ते कुंभार असून नताईम आणि गदेरा इथे राहायचे. तिथे राहून ते राजासाठी काम करायचे. २४  शिमोनच्या+ मुलांची नावं नमुवेल, यामीन, यारिब, जेरह आणि शौल+ अशी होती. २५  शौलच्या मुलाचं नाव शल्लूम; शल्लूमच्या मुलाचं नाव मिबसाम; आणि मिबसामच्या मुलाचं नाव मिश्‍मा होतं. २६  मिश्‍माचे वंशज हे: हम्मूएल, हम्मूएलचा मुलगा जक्कूर आणि जक्कूरचा मुलगा शिमी. २७  शिमीला १६ मुलं आणि ६ मुली होत्या. पण त्याच्या भावांना जास्त मुलं नव्हती; आणि त्यांचं एकही घराणं यहूदाच्या घराण्याइतकं मोठं नव्हतं.+ २८  ते राहत होते ती शहरं ही: बैर-शेबा,+ मोलादा,+ हसर-शुवाल,+ २९  बिल्हा, असेम,+ तोलाद, ३०  बथुवेल,+ हर्मा,+ सिक्लाग,+ ३१  बेथ-मर्काबोथ, हसरसुसीम,+ बेथ-बिरी आणि शारईम. ही सर्व शहरं, दावीद राज्य करू लागला तोपर्यंत त्यांची होती. ३२  ते या पाच शहरांमध्येही राहत होते: एटाम, अईन, रिम्मोन, तोखेन आणि आशान.+ ३३  तसंच, या शहरांच्या आसपासच्या वस्त्यांमध्येही ते राहायचे; या वस्त्या बालापर्यंत होत्या. या त्यांच्या वंशावळीच्या नोंदी आणि ते राहत असलेल्या ठिकाणांची नावं आहेत. ३४  शिमोनच्या इतर वंशजांची नावं ही: मेशोबाब, यम्लेक आणि अमस्याचा मुलगा योशा, ३५  योएल आणि योशिब्याहचा मुलगा येहू (योशिब्याह हा सरायाचा आणि सराया हा असिएलचा मुलगा होता). ३६  तसंच एल्योवेनय, याकोबाह, यशोहाया, असाया, अदिएल, यशीमिएल, बनाया, ३७  आणि शिफीचा मुलगा जीजा (शिफी हा अल्लोनचा, अल्लोन हा यदायाचा, यदाया हा शिम्रीचा आणि शिम्री शमायाचा मुलगा होता). ३८  इथे ज्यांची नावं दिली आहेत ते सगळे आपापल्या घराण्यांचे प्रधान होते. आणि त्यांच्या पूर्वजांच्या घराण्याची झपाट्याने वाढ झाली. ३९  ते आपल्या शेरडामेंढरांसाठी चारा शोधायला खोऱ्‍याच्या पूर्वेकडे, म्हणजे गदोरच्या प्रवेशापर्यंत गेले. ४०  शेवटी त्यांना हिरवीगार आणि चांगली कुरणं सापडली. आणि तो प्रदेशही बराच मोठा, शांत आणि सुरक्षित होता. त्या प्रदेशात पूर्वी हामचे वंशज+ राहायचे. ४१  ज्या लोकांची नावं वर दिली आहेत, ते यहूदाचा राजा हिज्कीया+ याच्या काळात तिथे आले. त्यांनी तिथे राहणाऱ्‍या हामच्या वंशजांचे आणि मऊनीमच्या लोकांचे तंबू पाडून टाकले, व त्यांचा समूळ नाश केला; आज तिथे त्यांचं काहीच नामोनिशाण उरलं नाही. मग ते त्यांच्या जागी तिथे राहू लागले; कारण त्यांच्या शेरडामेंढरांसाठी तिथे कुरणं होती. ४२  शिमोनच्या वंशजांपैकी ५०० माणसं ही पलत्याह, निरय्या, रफाया आणि उज्जियेल यांच्यासोबत सेईर पर्वताकडे+ गेली. इशीच्या या मुलांनी त्या ५०० लोकांचं नेतृत्व केलं. ४३  जे अमालेकी लोक निसटून इथे पळून आले होते, त्या उरलेल्या लोकांना त्यांनी मारून टाकलं;+ आणि आजपर्यंत ते तिथेच राहत आहेत.

तळटीपा

याबेस या नावाचा संबंध, “वेदना” या अर्थाच्या हिब्रू भाषेतल्या शब्दाशी असावा.
म्हणजे, “कारागिरांचं खोरं.”
ही कदाचित १८ व्या वचनात सांगितलेली बिथ्या असावी.