१ इतिहास ६:१-८१

 लेवीच्या+ मुलांची नावं ही: गेर्षोन, कहाथ+ आणि मरारी.+ २  कहाथच्या मुलांची नावं ही: अम्राम, इसहार,+ हेब्रोन आणि उज्जियेल.+ ३  अम्रामच्या+ मुलांची नावं ही: अहरोन+ व मोशे;+ आणि त्याच्या मुलीचं नाव मिर्याम.+ अहरोनच्या मुलांची नावं ही: नादाब, अबीहू,+ एलाजार+ आणि इथामार.+ ४  एलाजारच्या मुलाचं नाव फिनहास+ होतं. फिनहासच्या मुलाचं नाव अबीशूवा, ५  अबीशूवाच्या मुलाचं नाव बुक्की आणि बुक्कीच्या मुलाचं नाव उज्जी होतं. ६  उज्जीच्या मुलाचं नाव जरहयाह, जरहयाहच्या मुलाचं नाव मरायोथ, ७  मरायोथच्या मुलाचं नाव अमऱ्‍या आणि अमऱ्‍याच्या मुलाचं नाव अहीटूब+ होतं. ८  अहीटूबच्या मुलाचं नाव सादोक,+ सादोकच्या मुलाचं नाव अहीमास,+ ९  अहीमासच्या मुलाचं नाव अजऱ्‍या, अजऱ्‍याच्या मुलाचं नाव योहानान, १०  आणि योहानानच्या मुलाचं नाव अजऱ्‍या होतं; तो शलमोनने यरुशलेममध्ये बांधलेल्या मंदिरात याजक म्हणून सेवा करायचा. ११  अजऱ्‍याच्या मुलाचं नाव अमऱ्‍या होतं. अमऱ्‍याच्या मुलाचं नाव अहीटूब, १२  अहीटूबच्या मुलाचं नाव सादोक+ आणि सादोकच्या मुलाचं नाव शल्लूम होतं. १३  शल्लूमच्या मुलाचं नाव हिल्कीया,+ हिल्कीयाच्या मुलाचं नाव अजऱ्‍या, १४  अजऱ्‍याच्या मुलाचं नाव सराया+ आणि सरायाच्या मुलाचं नाव यहोसादाक+ होतं. १५  यहोवाने जेव्हा नबुखद्‌नेस्सरचा उपयोग करून यहूदाच्या आणि यरुशलेमच्या लोकांना बंदिवासात नेलं, तेव्हा यहोसादाकही त्यांच्यामध्ये होता. १६  लेवीच्या मुलांची नावं ही: गेर्षोम,* कहाथ आणि मरारी. १७  गेर्षोमच्या मुलांची नावं लिब्नी आणि शिमी+ अशी होती. १८  कहाथच्या मुलांची नावं अम्राम, इसहार, हेब्रोन आणि उज्जियेल+ अशी होती. १९  मरारीच्या मुलांची नावं महली आणि मूशी होती. आपल्या पूर्वजांपासून आलेली लेव्यांची घराणी पुढे दिली आहेत.+ २०  गेर्षोमचे+ वंशज हे: गेर्षोमचा मुलगा लिब्नी, लिब्नीचा मुलगा यहथ, यहथचा मुलगा जिम्मा, २१  जिम्माचा मुलगा यवाह, यवाहचा मुलगा इद्दो, इद्दोचा मुलगा जेरह आणि जेरहचा मुलगा यात्राय. २२  कहाथचे वंशज हे: कहाथचा मुलगा अम्मीनादाब, अम्मीनादाबचा मुलगा कोरह,+ कोरहचा मुलगा अस्सीर, २३  अस्सीरचा मुलगा एलकाना, एलकानाचा मुलगा एब्यासाफ,+ एब्यासाफचा मुलगा अस्सीर, २४  अस्सीरचा मुलगा तहथ, तहथचा मुलगा उरीयेल, उरीयेलचा मुलगा उज्जीया आणि उज्जीयाचा मुलगा शौल. २५  एलकानाच्या मुलांची नावं अमासय आणि अहीमोथ अशी होती. २६  एलकानाचे वंशज हे: एलकानाचा मुलगा सोफय, सोफयचा मुलगा नहाथ, २७  नहाथचा मुलगा अलीयाब, अलीयाबचा मुलगा यरोहाम आणि यरोहामचा मुलगा एलकाना.+ २८  शमुवेलच्या+ पहिल्या मुलाचं नाव योएल आणि दुसऱ्‍याचं नाव अबीया+ असं होतं. २९  मरारीचे वंशज हे: मरारीचा मुलगा महली,+ महलीचा मुलगा लिब्नी, लिब्नीचा मुलगा शिमी, शिमीचा मुलगा उज्जा, ३०  उज्जाच्या मुलाचं नाव शिमा, शिमाच्या मुलाचं नाव हग्गीयाह आणि हग्गीयाहच्या मुलाचं नाव असाया होतं. ३१  यहोवाच्या उपासना मंडपात* कराराची पेटी ठेवल्यावर गायकांचं निर्देशन करण्यासाठी दावीदने काहींना नेमलं.+ ३२  हे लोक उपासनेच्या मंडपात, म्हणजे भेटमंडपात गाण्यासाठी जबाबदार होते. यरुशलेममध्ये शलमोनने यहोवाचं मंदिर बांधून पूर्ण केलं+ तोपर्यंत त्यांनी ही सेवा केली. त्यांना जसं सांगण्यात आलं होतं, अगदी त्याप्रमाणे ते ही सेवा करायचे.+ ३३  ही सेवा करणाऱ्‍या पुरुषांची आणि त्यांच्या मुलांची नावं पुढे दिली आहेत. कहाथच्या वंशजांपैकी हे: गायक हेमान;+ तो योएलचा+ मुलगा होता. योएल शमुवेलचा; ३४  शमुवेल एलकानाचा;+ एलकाना यरोहामचा; यरोहाम अलीएलचा; आणि अलीएल तोहाचा मुलगा होता. ३५  तोहा सूफचा मुलगा होता. सूफ एलकानाचा; एलकाना महथचा; महथ अमासयचा; ३६  अमासय एलकानाचा; एलकाना योएलचा; योएल अजऱ्‍याचा आणि अजऱ्‍या सफन्याचा मुलगा होता. ३७  सफन्या तहथचा मुलगा होता. तहथ अस्सीरचा; अस्सीर एब्यासाफचा; एब्यासाफ कोरहचा; ३८  कोरह इसहारचा; इसहार कहाथचा; कहाथ लेवीचा आणि लेवी इस्राएलचा मुलगा होता. ३९  हेमानचा भाऊबंद आसाफ;+ तो हेमानच्या उजवीकडे उभा राहायचा. आसाफ हा बरेख्याचा मुलगा होता. बरेख्या शिमाचा; ४०  शिमा मीखाएलचा; मीखाएल बासेयाचा; आणि बासेया मल्कीयाचा मुलगा होता. ४१  मल्कीया एथनीचा; एथनी जेरहचा; जेरह अदायाचा; ४२  अदाया एथानचा; एथान जिम्माचा; जिम्मा शिमीचा; ४३  शिमी यहथचा; यहथ गेर्षोमचा आणि गेर्षोम लेवीचा मुलगा होता. ४४  आणि मरारी+ वंशातला त्यांचा भाऊबंद एथान; तो हेमानच्या डावीकडे उभा राहायचा. एथान+ हा किशीचा मुलगा होता. किशी अब्दीचा आणि अब्दी मल्लूखचा मुलगा होता. ४५  मल्लूख हशब्याहचा; हशब्याह अमस्याचा; अमस्या हिल्कीयाचा; ४६  हिल्कीया अमसीचा; अमसी बानीचा; बानी शेमेरचा; ४७  शेमेर महलीचा; महली मूशीचा; मूशी मरारीचा आणि मरारी लेवीचा मुलगा होता. ४८  त्यांच्या इतर लेवी भाऊबंदांना, खऱ्‍या देवाच्या उपासना मंडपातल्या सर्व सेवेसाठी नेमण्यात आलं होतं.*+ ४९  अहरोन आणि त्याची मुलं+ होमार्पणाच्या वेदीवर आणि धूपवेदीवर+ बलिदानांचं हवन करायचे.*+ खऱ्‍या देवाचा सेवक मोशे याने सांगितलं होतं, त्याप्रमाणे ते परमपवित्र गोष्टींच्या बाबतीत असलेली आपली सगळी कर्तव्यं पार पाडायचे; आणि इस्राएलसाठी प्रायश्‍चित्त करायचे.+ ५०  अहरोनचे वंशज हे:+ अहरोनचा मुलगा एलाजार+ होता. एलाजारचा मुलगा फिनहास; फिनहासचा मुलगा अबीशूवा; ५१  अबीशूवाचा मुलगा बुक्की; बुक्कीचा मुलगा उज्जी; उज्जीचा मुलगा जरहयाह; ५२  जरहयाहचा मुलगा मरायोथ; मरायोथचा मुलगा अमऱ्‍या; अमऱ्‍याचा मुलगा अहीटूब;+ ५३  अहीटूबचा मुलगा सादोक+ आणि सादोकचा मुलगा अहीमास. ५४  लेवी आपल्या प्रदेशांत ज्या ठिकाणी छावण्या* करून राहिले ती ठिकाणं ही: पहिली चिठ्ठी अहरोनच्या वंशातल्या कहाथच्या घराण्याची निघाली, ५५  म्हणून त्यांनी त्यांना यहूदाच्या प्रदेशातलं हेब्रोन+ आणि त्याच्या आसपासची कुरणं दिली. ५६  पण, त्या शहराची शेती आणि त्याच्या आसपासच्या वस्त्या त्यांनी यफुन्‍नेचा मुलगा कालेब+ याला दिल्या. ५७  त्यांनी अहरोनच्या वंशजांना दिलेली शहरं ही: हेब्रोन+ हे शरण-शहर;+ तसंच, लिब्ना+ व तिथली कुरणं, यत्तीर,+ एष्टमोवा व तिथली कुरणं,+ ५८  हिलेन व तिथली कुरणं, दबीर+ व तिथली कुरणं, ५९  आशान+ व तिथली कुरणं आणि बेथ-शेमेश+ व तिथली कुरणं. ६०  तसंच, बन्यामीन वंशाच्या प्रदेशातून त्यांना गेबा+ व तिथली कुरणं, आलेमेथ व तिथली कुरणं आणि अनाथोथ+ व तिथली कुरणं मिळाली. अशी एकूण १३ शहरं त्यांच्या घराण्यांना मिळाली.+ ६१  कहाथच्या बाकी राहिलेल्या वंशजांना चिठ्ठ्या टाकून दहा शहरं देण्यात आली. ही शहरं, इतर वंशांतल्या घराण्यांच्या प्रदेशातून, तसंच अर्ध्या वंशाच्या, म्हणजे मनश्‍शेच्या अर्ध्या वंशाच्या प्रदेशातून देण्यात आली.+ ६२  गेर्षोमच्या वंशजांना त्यांच्या घराण्यांप्रमाणे १३ शहरं देण्यात आली. ही शहरं इस्साखार, आशेर आणि नफताली वंशांच्या प्रदेशातून; तसंच, बाशानमध्ये असलेल्या मनश्‍शे वंशाच्या प्रदेशातून देण्यात आली.+ ६३  मरारी वंशजांना त्यांच्या घराण्यांप्रमाणे रऊबेन, गाद आणि जबुलून या वंशांच्या प्रदेशातून १२ शहरं चिठ्ठ्या टाकून देण्यात आली.+ ६४  अशा प्रकारे, इस्राएली लोकांनी ही शहरं आणि तिथली कुरणं लेव्यांना दिली.+ ६५  यांशिवाय, त्यांनी चिठ्ठ्या टाकून यहूदा, शिमोन आणि बन्यामीन वंशांच्या प्रदेशातूनही शहरं दिली; त्या शहरांचा उल्लेख त्यांच्या नावांनी करण्यात आला आहे. ६६  कहाथ वंशातल्या काही घराण्यांना एफ्राईम वंशाच्या प्रदेशातून काही शहरं देण्यात आली.+ ६७  त्यांनी त्यांना ही शहरं दिली: एफ्राईमच्या डोंगराळ प्रदेशातलं शखेम+ हे शरण-शहर व तिथली कुरणं; गेजेर+ व तिथली कुरणं, ६८  यकमाम व तिथली कुरणं, बेथ-होरोन+ व तिथली कुरणं, ६९  अयालोन+ व तिथली कुरणं आणि गथ-रिम्मोन+ व तिथली कुरणं; ७०  आणि मनश्‍शेच्या अर्ध्या वंशाच्या प्रदेशातून आनेर व तिथली कुरणं आणि बिलाम व तिथली कुरणं; ही सर्व शहरं कहाथ वंशातल्या बाकीच्या घराण्यांना देण्यात आली. ७१  त्यांनी गेर्षोमच्या वंशजांना पुढील शहरं दिली: मनश्‍शेच्या अर्ध्या वंशाच्या प्रदेशातून, बाशान प्रदेशातलं गोलान+ व तिथली कुरणं आणि अष्टरोथ व तिथली कुरणं.+ ७२  इस्साखार वंशाच्या प्रदेशातून: केदेश व तिथली कुरणं, दाबरथ+ व तिथली कुरणं,+ ७३  रामोथ व तिथली कुरणं आणि आनेम व तिथली कुरणं. ७४  आशेरच्या वंशाच्या प्रदेशातून: माशाल व तिथली कुरणं, अब्दोन व तिथली कुरणं,+ ७५  हूकोक व तिथली कुरणं आणि रहोब+ व तिथली कुरणं. ७६  आणि नफताली वंशाच्या प्रदेशातून: गालीलमधलं+ केदेश+ व तिथली कुरणं, हम्मोन व तिथली कुरणं आणि किर्याथाईम व तिथली कुरणं. ७७  त्यांनी मरारीच्या उरलेल्या वंशजांना पुढील शहरं दिली: जबुलून वंशाच्या प्रदेशातून+ रिम्मोनो व तिथली कुरणं, ताबोर व तिथली कुरणं; ७८  तसंच, यार्देन नदीच्या प्रदेशात असलेल्या यरीहोजवळ, यार्देन नदीच्या पूर्वेकडे, रऊबेन वंशाच्या प्रदेशातून ओसाड रानातलं बेसेर शहर व तिथली कुरणं आणि याहस+ व तिथली कुरणं, ७९  कदेमोथ+ व तिथली कुरणं आणि मेफाथ व तिथली कुरणं. ८०  आणि गाद वंशाच्या प्रदेशातून त्यांनी गिलादमधलं रामोथ व तिथली कुरणं, महनाइम+ व तिथली कुरणं, ८१  हेशबोन+ व तिथली कुरणं आणि याजेर+ व तिथली कुरणं दिली.

तळटीपा

या अध्यायाच्या पहिल्या वचनात याला गेर्षोन म्हटलं आहे.
शब्दशः “मंदिरात.”
शब्दशः “देण्यात आलं होतं.”
किंवा “धूर वर जाण्यासाठी बलिदानं जाळायचे.”
किंवा “सभोवती भिंती असलेल्या छावण्या.”