१ इतिहास ७:१-४०

  • इस्साखारचे वंशज (१-५), बन्यामीनचे वंशज (६-१२), नफतालीचे वंशज (१३), मनश्‍शेचे वंशज (१४-१९), एफ्राईमचे वंशज (२०-२९), आणि आशेरचे वंशज (३०-४०)

 इस्साखारच्या चार मुलांची नावं ही: तोला, पुवा, याशूब आणि शिम्रोन.+ २  तोलाच्या मुलांची नावं ही: उज्जी, रफाया, यरीएल, यहमय, इबसाम आणि शमुवेल. हे सगळे आपल्या घराण्यांचे प्रमुख होते. तोलाचे वंशज शूर योद्धे होते आणि दावीदच्या काळात त्यांची संख्या २२,६०० इतकी होती. ३  उज्जीचे वंशज हे: उज्जीचा मुलगा इज्रह्‍या, आणि इज्रह्‍याची मुलं मीखाएल, ओबद्या, योएल व इश्‍शीया. हे पाचही जण प्रमुख होते. ४  वंशावळीतल्या नोंदीनुसार या प्रमुखांच्या वंशजांपैकी ३६,००० सैनिक त्यांच्या सैन्यात होते. कारण त्यांना बऱ्‍याच बायका आणि मुलं होती. ५  इस्साखारच्या सर्व घराण्यांतले त्यांचे भाऊबंद शूर योद्धे असून, वंशावळीच्या नोंदीनुसार त्यांची संख्या ८७,००० इतकी होती.+ ६  बन्यामीनच्या+ तीन मुलांची नावं ही: बेला,+ बेकेर+ आणि यदीएल.+ ७  बेलाच्या पाच मुलांची नावं ही: एसबोन, उज्जी, उज्जियेल, यरीमोथ आणि ईरी. हे सगळे आपल्या घराण्यांचे प्रमुख असून शूर योद्धे होते; आणि वंशावळीच्या नोंदीनुसार त्यांच्या वंशजांची संख्या २२,०३४ इतकी होती.+ ८  बेकेरच्या मुलांची नावं ही: जमीरा, योवाश, अलियेजर, एल्योवेनय, अम्री, यरेमोथ, अबीया, अनाथोथ आणि आलेमेथ. ही सगळी बेकेरची मुलं होती. ९  त्यांच्या वंशजांची, आपल्या घराण्यांच्या प्रमुखांनुसार वंशावळीत जी नोंद करण्यात आली त्यात २०,२०० शूर योद्धे होते. १०  यदीएलच्या+ मुलाचं नाव बिल्हान होतं. बिल्हानच्या मुलांची नावं ही: यऊश, बन्यामीन, एहूद, कनाना, जेथान, तार्शीश आणि अहीशाहर. ११  कुळप्रमुखांच्या वंशावळीतल्या नोंदीनुसार, यदीएलच्या वंशजांपैकी* १७,२०० शूर योद्धे असून ते सैन्यासोबत युद्धात जायला तयार असायचे. १२  शुप्पीम आणि हुप्पीम हे ईरचे+ वंशज होते. हुशीम हे अहेरचे वंशज होते. १३  नफतालीच्या मुलांची+ नावं ही: यहसिएल, गूनी, येसेर आणि शल्लूम; ही सगळी बिल्हा हिची मुलं होती.+ १४  मनश्‍शेची+ मुलं ही: अस्रीयेल; हा त्याला आपल्या उपपत्नीपासून झाला होता. ती सीरियाची राहणारी होती. (तिने माखीरला+ जन्म दिला; माखीर हा नंतर गिलादचा पिता बनला. १५  माखीरने हुप्पीमचं आणि शुप्पीमचं लग्न लावून दिलं. त्यांच्या बहिणीचं नाव माका होतं.) मनश्‍शेच्या दुसऱ्‍या मुलाचं नाव सलाफहाद+ होतं; सलाफहादला फक्‍त मुली होत्या.+ १६  माखीरची बायको माका, हिला एक मुलगा झाला आणि तिने त्याचं नाव पेरेस ठेवलं. पेरेसच्या भावाचं नाव शेरेश होतं. शेरेशच्या मुलांची नावं ऊलाम आणि रेकेम अशी होती. १७  ऊलामच्या मुलाचं नाव बदान होतं. ही सर्व गिलादची मुलं होती; गिलाद माखीरचा आणि माखीर मनश्‍शेचा मुलगा होता. १८  गिलादच्या बहिणीचं नाव हम्मोलेखेथ होतं. तिला इशहोद, अबियेजेर आणि महला ही मुलं झाली. १९  शमीदाची मुलं ही: अह्‍यान, शखेम, लिखी आणि अनीयाम. २०  एफ्राईमचे वंशज+ हे: एफ्राईमचा मुलगा शुथेलह,+ शुथेलहचा मुलगा बेरेद, बेरेदचा मुलगा तहथ, तहथचा मुलगा एलादा, एलादाचा मुलगा तहथ, २१  तहथचा मुलगा जाबाद आणि जाबादचा मुलगा शुथेलह. तसंच, एजेर आणि एलद हीसुद्धा एफ्राईमची मुलं होती. या दोघांना, गथमध्ये+ राहणाऱ्‍या माणसांनी मारून टाकलं. कारण ते त्यांची जनावरं चोरण्यासाठी गेले होते. २२  त्यांचा पिता एफ्राईम त्यांच्यासाठी बरेच दिवस शोक करत राहिला. आणि त्याचे भाऊ येऊन त्याचं सांत्वन करत राहिले. २३  नंतर त्याने जेव्हा आपल्या बायकोशी संबंध ठेवले, तेव्हा तिला गर्भ राहिला आणि तिने एका मुलाला जन्म दिला. पण त्याने त्याचं नाव बरीया* ठेवलं. कारण, त्याच्या घराण्यावर संकट कोसळलेलं असताना तिने त्याला जन्म दिला होता. २४  त्याच्या मुलीचं नाव शेरा होतं; तिने खालचं+ आणि वरचं बेथ-होरोन,+ तसंच उज्जेन-शेरा बांधलं होतं. २५  त्याच्या वंशजांची नावं रेफह आणि रेशेफ होती. रेशेफच्या मुलाचं नाव तेलह, तेलहच्या मुलाचं नाव तहन, २६  तहनच्या मुलाचं नाव लादान, लादानच्या मुलाचं नाव अम्मीहूद, अम्मीहूदच्या मुलाचं नाव अलीशामा, २७  अलीशामाच्या मुलाचं नाव नून आणि नूनच्या मुलाचं नाव यहोशवा*+ होतं. २८  एफ्राईमचे वंशज जिथे वस्ती करून राहिले ते प्रदेश हे: बेथेल+ व त्याच्या आसपासची नगरं, पूर्वेकडचं नारान, पश्‍चिमेकडचं गेजेर व त्याच्या आसपासची नगरं, शखेम व त्याच्या आसपासची नगरं; तसंच, थेट अय्याहपर्यंत* आणि त्याच्या आसपासच्या नगरांपर्यंतचा प्रदेश; २९  आणि मनश्‍शे वंशजांच्या प्रदेशाजवळ बेथ-शान+ व त्याच्या आसपासची नगरं, तानख+ व त्याच्या आसपासची नगरं, मगिद्दो+ व त्याच्या आसपासची नगरं आणि दोर+ व त्याच्या आसपासची नगरं. या प्रदेशांत इस्राएलचा मुलगा योसेफ याचे वंशज राहायचे. ३०  आशेरची मुलं ही: इम्नाह, इश्‍वा, इश्‍वी व बरीया.+ आणि त्याच्या मुलीचं नाव सेराह होतं.+ ३१  बरीयाच्या मुलांची नावं हेबेर आणि मालकीएल अशी होती; मालकीएलच्या मुलाचं नाव बिर्जाविथ होतं. ३२  हेबेरची मुलं ही: यफलेट, शोमर व होथाम; आणि त्याच्या मुलीचं नाव शूवा होतं. ३३  यफलेटची मुलं ही: पासख, बिम्हाल आणि अश्‍वाथ. ही सगळी यफलेटची मुलं होती. ३४  शेमेरची* मुलं ही: अही, राहागा, यहूबा आणि अराम. ३५  त्याचा भाऊ हेलेम* याची मुलं ही: सोफह, इम्ना, शेलेश आणि आमाल. ३६  सोफहची मुलं ही: सूहा, हर्नेफेर, शुवाल, बेरी, इम्रा, ३७  बेसेर, होद, शम्मा, शिलशा, इथ्रान आणि बैरा. ३८  येथेरची मुलं ही: यफुन्‍ने, पिस्पा आणि अरा. ३९  उल्लाची मुलं ही: आरह, हन्‍नीएल आणि रिस्या. ४०  ही सर्व आशेरची मुलं होती. ते आपापल्या घराण्यांचे प्रमुख होते. ते खास निवडलेले, शूर योद्धे आणि प्रधानांचे प्रमुख होते. वंशावळीच्या नोंदीनुसार,+ त्यांच्यातले २६,००० पुरुष+ सैन्यात असून युद्धासाठी तयार होते.

तळटीपा

शब्दशः “मुलांपैकी.”
म्हणजे, “संकटाच्या वेळी जन्मलेला.”
म्हणजे, “यहोवा तारण आहे.”
किंवा कदाचित, “गाझा.” पण हे पलेशेथचं गाझा नाही.
या अध्यायाच्या ३२ व्या वचनात याला शोमर म्हटलं आहे.
हा या अध्यायाच्या ३२ व्या वचनात सांगितलेला होथाम असावा.