१ इतिहास ८:१-४०

 बन्यामीनची+ मुलं ही: पहिला मुलगा बेला,+ दुसरा अशबेल,+ तिसरा अहरह, २  चौथा नोहा आणि पाचवा राफा. ३  बेलाची मुलं ही: अद्दार, गेरा,+ अबीहूद, ४  अबीशूवा, नामान, अहोह, ५  गेरा, शफूफाम आणि हुराम. ६  एहूदची मुलं, म्हणजे जे गेबा+ इथल्या रहिवाशांचे कुळप्रमुख होते आणि ज्यांना मानाहथ इथे कैद करून नेण्यात आलं होतं, ते हे: ७  नामान, अहीया आणि गेरा. गेरा यानेच त्यांना बंदिवासात नेलं होतं; त्याच्या मुलांची नावं उज्जा आणि अहीहूद अशी होती. ८  शहरयिम याने लोकांना पाठवून दिल्यावर, मवाबच्या प्रदेशात त्याला मुलं झाली; त्याच्या बायकांची नावं हुशीम आणि बारा अशी होती.* ९  त्याची बायको होदेश हिच्यापासून त्याला ही मुलं झाली: योबाब, सिब्या, मेशा, मल्काम, १०  यऊस, शख्या आणि मिर्मा. शहरयिमचे हे वंशज आपापल्या घराण्यांचे प्रमुख होते. ११  शहरयिमला आपली बायको हुशीम हिच्यापासून अबीटूब आणि एल्पाल ही मुलं झाली. १२  एल्पालची मुलं ही: एबर, मिशाम, शमेद (याने ओनो+ व लोद+ आणि त्याच्या आसपासची नगरं बांधली), १३  बरीया आणि शेमा. हे अयालोन+ इथल्या रहिवाशांच्या घराण्यांचे प्रमुख होते. त्यांनी गथच्या रहिवाशांना हाकलून लावलं होतं. १४  अहयो, शाशक, यरेमोथ, १५  जबद्याह, अराद, एदर, १६  मीखाएल, इश्‍पा व योहा ही बरीयाची मुलं होती. १७  जबद्याह, मशुल्लाम, हिज्की, हेबेर, १८  इश्‍मरय, इज्लीया व योबाब ही एल्पालची मुलं होती. १९  याकीम, जिख्री, जब्दी, २०  एलीएनय, सिलथय, अलीएल, २१  अदाया, बराया व शिम्राथ ही सर्व शिमीची मुलं होती. २२  तसंच इश्‍पान, एबर, अलीएल, २३  अब्दोन, जिख्री, हानान, २४  हनन्या, एलाम, अनथोथीया, २५  इफदया व पनुएल ही शाशकची मुलं होती. २६  आणि शमशेरय, शहऱ्‍याह, अथल्या, २७  यारेश्‍या, एलीया व जिख्री ही सगळी यरोहामची मुलं होती. २८  वंशावळीच्या नोंदीनुसार हे सर्व आपापल्या घराण्यांचे प्रमुख असून यरुशलेममध्ये राहायचे. २९  गिबोनचा पिता ईयेल हा गिबोनमध्ये+ राहायचा; त्याच्या बायकोचं नाव माका होतं.+ ३०  त्याची मुलं ही: पहिला मुलगा अब्दोन, त्यानंतर सूर, कीश, बाल, नादाब, ३१  गदोर, अहयो आणि जेखर. ३२  मिक्लोथच्या मुलाचं नाव शिमाह होतं. आणि हे सर्व आपल्या भाऊबंदांजवळ यरुशलेममध्ये राहायचे. त्यांच्यासोबत त्यांचे इतर भाऊबंदही राहायचे. ३३  नेरच्या+ मुलाचं नाव कीश, आणि कीशच्या मुलाचं नाव शौल+ होतं. शौलची मुलं ही: योनाथान,+ मलकीशुवा,+ अबीनादाब+ आणि एश्‍बाल.*+ ३४  योनाथानच्या मुलाचं नाव मरीब्बाल,*+ आणि मरीब्बालच्या मुलाचं नाव मीखा होतं.+ ३५  मीखाची मुलं ही: पीथोन, मेलेख, तरेया आणि आहाज. ३६  आहाजच्या मुलाचं नाव यहोअद्दा होतं. यहोअद्दाची मुलं ही: आलेमेथ, अजमावेथ आणि जिम्री. आणि जिम्रीच्या मुलाचं नाव मोसा होतं. ३७  मोसाच्या मुलाचं नाव बिना, बिनाच्या मुलाचं नाव राफा, राफाच्या मुलाचं नाव एलासाह आणि एलासाहच्या मुलाचं नाव आसेल होतं. ३८  आसेलला सहा मुलं होती; त्यांची नावं ही: अज्रीकाम, बोखरू, इश्‍माएल, शारीयाह, ओबद्या आणि हानान. ही सगळी आसेलची मुलं होती. ३९  त्याचा भाऊ एशेक याची मुलं ही: पहिला मुलगा ऊलाम, दुसरा यऊश आणि तिसरा अलीफलेट. ४०  ऊलामची मुलं शूर योद्धे असून धनुष्य चालवायची. त्यांना बरीच मुलं आणि नातवंडे असून, त्या सगळ्यांची संख्या एकूण १५० होती. हे सर्व बन्यामीनचे वंशज होते.

तळटीपा

किंवा कदाचित, “शहरयिम याने आपल्या बायकांना, हुशीम आणि बारा यांना पाठवून दिल्यावर मवाबच्या प्रदेशात त्याला मुलं झाली.”
याला ईश-बोशेथ असंही म्हटलं जातं.
याला मफीबोशेथ असंही म्हटलं जातं.