तीमथ्य याला पहिलं पत्र २:१-१५
२ तर सगळ्यात आधी मी अशी विनंती करतो, की सर्व प्रकारच्या माणसांसाठी याचना, प्रार्थना, इतरांच्या वतीने विनवण्या आणि उपकारस्तुतीच्या प्रार्थना केल्या जाव्यात.
२ राजे आणि उच्च पदांवर असलेले अधिकारी यांच्यासाठीही प्रार्थना केल्या जाव्यात.+ हे यासाठी, की आपल्याला देवाला पूर्णपणे विश्वासू राहून, गांभीर्याने आणि शांतपणे जीवन जगता यावं.+
३ आपला तारणकर्ता देव याच्या दृष्टीने हे चांगलं आणि योग्य आहे.+
४ त्याची अशी इच्छा आहे, की सर्व प्रकारच्या लोकांचं तारण व्हावं*+ आणि त्यांना सत्याचं अचूक ज्ञान मिळावं.
५ कारण, एकच देव+ आहे. तसंच, देवामध्ये आणि मानवांमध्ये+ एकच मध्यस्थ+ आहे, म्हणजे एक मानव, अर्थात ख्रिस्त येशू.+
६ त्याने सर्वांच्या* मोबदल्यात खंडणी म्हणून स्वतःला अर्पण केलं.+ या गोष्टीबद्दल ठरवलेली वेळ आल्यावर साक्ष दिली जाईल.
७ हीच साक्ष देण्यासाठी,+ मला घोषणा करणारा आणि प्रेषित,+ म्हणजे विश्वास आणि सत्य यांबद्दल सांगण्यासाठी विदेश्यांचा शिक्षक+ म्हणून नेमण्यात आलं आहे. मी खरं बोलतो, खोटं बोलत नाही.
८ म्हणून माझी अशी इच्छा आहे, की सर्व ठिकाणी पुरुषांनी राग आणि वादविवाद सोडून,+ शुद्ध मनाने प्रार्थना करत राहावी.*+
९ त्याच प्रकारे, स्त्रियांनी योग्य* पेहराव करून, शालीनतेने आणि विचारशीलपणे* स्वतःला सजवावं. त्यांनी खास प्रकारच्या केशरचना करून,* तसंच सोनं, मोती किंवा महागडे कपडे घालून नाही,+
१० तर स्वतःला देवाच्या उपासक म्हणवणाऱ्या स्त्रियांना शोभेल अशा प्रकारे,+ म्हणजे चांगली कामं करून आपलं सौंदर्य वाढवावं.
११ स्त्रीने पूर्ण अधीनतेने शांत* राहून शिकावं.+
१२ मी स्त्रीला शिकवायची किंवा पुरुषावर अधिकार चालवायची परवानगी देत नाही. तिने शांत* राहावं.+
१३ कारण आधी आदामला आणि मग हव्वाला बनवण्यात आलं.+
१४ तसंच, आदाम फसवला गेला नाही, तर स्त्री ही पूर्णपणे फसली+ आणि अपराधी बनली.
१५ तरीसुद्धा, मुलांना जन्म देण्याद्वारे ती सुरक्षित राहील.+ पण, यासाठी तिने* विचारशीलपणा,*+ तसंच विश्वास, प्रेम आणि पवित्रता यांत टिकून राहणं गरजेचं आहे.
तळटीपा
^ किंवा “लोकांना वाचवलं जावं.”
^ किंवा “सर्व प्रकारच्या लोकांच्या.”
^ शब्दशः “हात वर करून प्रार्थना करत राहावी.”
^ किंवा “आदरणीय.”
^ शब्दशः “निरोगी मनाने.”
^ शब्दशः “खास प्रकारे केस गुंफून.”
^ किंवा “गप्प.”
^ किंवा “गप्प.”
^ शब्दशः “त्यांनी.”
^ शब्दशः “मनाचा निरोगीपणा.”