योहान याचं पहिलं पत्र ३:१-२४

  • आपण देवाची मुलं आहोत (१-३)

  • देवाची मुलं आणि सैतानाची मुलं यांच्यातला फरक (४-१२)

    • येशू सैतानाची कार्यं उद्ध्‌वस्त करेल ()

  • एकमेकांवर प्रेम करा (१३-१८)

  • देव आपल्या मनापेक्षा मोठा आहे (१९-२४)

 पाहा, पित्याने आपल्यावर किती प्रेम केलं आहे!+ त्याने आपल्याला त्याची मुलं* म्हटलं आहे+ आणि खरोखरच आपण देवाची मुलं आहोत. म्हणूनच, जग आपल्याला ओळखत नाही,+ कारण जगाने त्याला ओळखलेलं नाही.+ २  प्रिय बांधवांनो, आपण आता देवाची मुलं आहोत,+ पण पुढे आपण कसे असू हे अजून प्रकट झालेलं नाही.+ त्याला प्रकट करण्यात येईल तेव्हा आपण त्याच्यासारखेच होऊ इतकं मात्र आपल्याला माहीत आहे. कारण तो जसा आहे तसाच आपण त्याला पाहू. ३  आणि ज्या कोणाला ही आशा आहे तो स्वतःला त्याच्यासारखंच शुद्ध करतो.+ ४  जो पाप करत राहतो तो देवाचे नियम मोडत राहतो, कारण पाप म्हणजेच देवाचे नियम मोडणं. ५  तो आपली पापं दूर करण्यासाठी आला हेसुद्धा तुम्हाला माहीत आहे,+ आणि त्याच्यात पापाचा अंशही नाही. ६  जो त्याच्या ऐक्यात राहतो तो पाप करत राहत नाही.+ जो पाप करत राहतो त्याने त्याला पाहिलेलं नाही किंवा त्याला ओळखलेलंही नाही. ७  मुलांनो, कोणालाही तुमची फसवणूक करू देऊ नका. जो नीतीने चालतो तो येशू ख्रिस्तासारखाच नीतिमान आहे. ८  जो पाप करत राहतो तो सैतानापासून* आहे, कारण सैतान पूर्वीपासूनच* पाप करत आला आहे.+ देवाचा मुलगा यासाठीच आला, की त्याने सैतानाची कार्यं उद्ध्‌वस्त करावीत.+ ९  जो कोणी देवापासून जन्मला आहे तो पाप करत राहत नाही,+ कारण देवाची पवित्र शक्‍ती* त्याच्यामध्ये टिकून राहते. आणि त्याने पाप करत राहणं शक्य नाही, कारण तो देवापासून जन्मला आहे.+ १०  देवाची मुलं कोण आणि सैतानाची मुलं कोण, हे यावरून दिसून येतं: जो कोणी नीतीने चालत नाही तो देवापासून नाही. तसंच जो आपल्या बांधवावर प्रेम करत नाही तोही देवापासून नाही.+ ११  कारण तुम्ही सुरुवातीपासून ऐकलेला संदेश हाच आहे, की आपण एकमेकांवर प्रेम केलं पाहिजे.+ १२  आपण काइनसारखं होऊ नये. तो त्या दुष्टापासून होता आणि त्याने आपल्या भावाची हत्या केली.+ त्याने त्याची हत्या का केली? कारण त्याची स्वतःची कार्यं दुष्ट होती,+ पण त्याच्या भावाची कार्यं मात्र नीतिमान होती.+ १३  बांधवांनो, जग तुमचा द्वेष करतं याबद्दल आश्‍चर्य करू नका.+ १४  आपण पूर्वी मेलेल्यांसारखे होतो. पण आता आपण जिवंत झालो आहोत हे आपल्याला माहीत आहे,+ कारण आपण बांधवांवर प्रेम करतो.+ जो प्रेम करत नाही तो मेलेल्या स्थितीतच राहतो.+ १५  जो कोणी आपल्या बांधवाचा द्वेष करतो तो खुनी आहे+ आणि तुम्हाला माहीत आहे की खुनी असलेल्या कोणत्याही माणसात सर्वकाळाचं जीवन राहत नाही.+ १६  प्रेम काय असतं हे आपल्याला यावरूनच कळलं आहे, कारण त्याने आपल्यासाठी त्याचं जीवन* अर्पण केलं.+ आणि आपणही आपल्या बांधवांसाठी जीवन* अर्पण करावं, हे आपलं कर्तव्य आहे.+ १७  जगात धनसंपत्ती असलेल्या एखाद्याने जर आपल्या बांधवाला अडचणीत पाहूनही त्याला दया दाखवली नाही, तर मग त्याचं देवावर प्रेम आहे असं कसं म्हणता येईल?+ १८  मुलांनो, आपण शब्दांनी किंवा फक्‍त तोंडाने नाही,+ तर कार्यांतून+ आणि अगदी खऱ्‍या मनाने प्रेम केलं पाहिजे.+ १९  यावरूनच आपल्याला कळेल की आपण सत्यापासून आहोत. आपलं मन कोणत्याही गोष्टीबद्दल आपल्याला दोष देत असलं, २०  तरीसुद्धा आपण देवासमोर त्याबद्दल आपल्या मनाला दिलासा देऊ.* कारण देव आपल्या मनापेक्षा मोठा आहे आणि त्याला सर्वकाही माहीत आहे.+ २१  प्रिय बांधवांनो, जर आपलं मन आपल्याला दोष देत नसेल, तर मात्र आपल्याला देवासमोर मोकळेपणाने बोलण्याचं धैर्य आहे.+ २२  आणि आपण त्याच्याकडे जे काही मागतो ते आपल्याला मिळतं,+ कारण आपण त्याच्या आज्ञांचं पालन करत आहोत आणि त्याच्या दृष्टीने जे योग्य ते करत आहोत. २३  खरंतर, त्याची आज्ञा हीच आहे, की आपण त्याचा मुलगा, येशू ख्रिस्त याच्या नावावर विश्‍वास ठेवावा+ आणि त्याने आपल्याला आज्ञा दिल्याप्रमाणे एकमेकांवर प्रेम करावं.+ २४  तसंच, जो देवाच्या आज्ञांचं पालन करतो, तो देवासोबत ऐक्यात राहतो आणि देवही अशा माणसासोबत ऐक्यात राहतो.+ आणि त्याने आपल्याला दिलेल्या पवित्र शक्‍तीद्वारे आपल्याला हे कळतं, की तो आपल्यासोबत ऐक्यात आहे.+

तळटीपा

शब्दशः “देवाची मुलं.”
शब्दशः “सुरुवातीपासूनच,” म्हणजे, त्याने पहिल्यांदा देवाविरुद्ध बंड केलं तेव्हापासून.
शब्दशः “दियाबलापासून.” म्हणजे, निंदा करणारा.
शब्दार्थसूची पाहा. शब्दशः “बीज.”
किंवा “जीव.”
किंवा “जीव.”
किंवा “समजूत घालू; खातरी देऊ.”