१ शमुवेल २:१-३६

  • हन्‍नाची प्रार्थना (१-११)

  • एलीच्या मुलांची वाईट कामं (१२-२६)

  • एलीच्या घराण्यावर यहोवाचा न्यायदंड (२७-३६)

 त्यानंतर हन्‍नाने प्रार्थनेत म्हटलं: “यहोवामुळे माझं मन आनंदित झालंय;+यहोवाने माझं शिंग उंच केलंय.* आता मी माझ्या शत्रूंना सडेतोड उत्तर देऊ शकते,कारण तू केलेल्या तारणामुळे मला आनंद झालाय.  २  यहोवासारखा पवित्र कोणीही नाही,देवा, तुझ्याशिवाय आणखी कोणीच नाही,+आमच्या देवासारखा भक्कम खडक दुसरा कोणीही नाही.+  ३  गर्विष्ठपणे बोलण्याचं सोडून द्या,अहंकाराचा एकही शब्द तुमच्या तोंडून निघू देऊ नका,कारण यहोवाला सगळ्या गोष्टींचं ज्ञान आहे,+तो माणसांच्या कृत्यांची योग्य पारख करतो.  ४  शूरवीरांच्या धनुष्यांचे तुकडे-तुकडे करण्यात आले,पण दुर्बळांना* मात्र बलवान करण्यात आलं.+  ५  पोटभर जेवणाऱ्‍यांना मोल-मजुरी करून खावं लागतय,पण उपाशी राहणारे आता जेवून तृप्त होत आहेत.+ जिला मूलबाळ होत नव्हतं, तिने सात मुलांना जन्म दिलाय,+आणि जिला अनेक मुलं होती, तिला आता मुलं होणार नाहीत.*  ६  यहोवा नाश करू शकतो आणि प्राणाचं रक्षणही करू शकतो;*तो खाली कबरेत* पाठवू शकतो आणि पुन्हा जिवंतही करू शकतो.+  ७  यहोवा एखाद्याला गरीब करू शकतो किंवा श्रीमंतही करू शकतो;+तो एखाद्याला खाली पाडू शकतो किंवा उंचावूही शकतो.+  ८  तो कंगाल मनुष्याला धुळीतून उठवतो;गरिबाला राखेच्या ढिगाऱ्‍यातून* वर उचलतो,+तो त्यांना अधिकाऱ्‍यांसोबत बसवतो,त्यांना मानाचं स्थान देतो. पृथ्वीचे आधारस्तंभ यहोवाच्या हातांत आहेत,+त्यांवर त्याने पृथ्वी ठेवली आहे.  ९  आपल्या विश्‍वासू सेवकांचं तो पावलोपावली रक्षण करतो,+पण दुष्टाला मात्र अंधारात गप्प केलं जाईल,+कारण मनुष्य स्वतःच्या बळावर विजयी होऊ शकत नाही.+ १०  आपल्याविरुद्ध लढणाऱ्‍यांचा यहोवा चुराडा करेल;*+त्यांच्यावर तो आकाशातून गर्जना करेल.+ यहोवा पृथ्वीच्या कानाकोपऱ्‍यांपर्यंत न्याय करेल,+तो आपल्या राजाला सामर्थ्य देईल+आणि आपल्या अभिषिक्‍ताचं शिंग उंचावेल.”*+ ११  नंतर एलकाना रामा इथे आपल्या घरी परत गेला. आणि तो मुलगा एली याजकाच्या देखरेखीखाली यहोवाची सेवा करू लागला.*+ १२  एलीची मुलं फार दुष्ट होती.+ यहोवाबद्दल त्यांना जराही आदर नव्हता. १३  लोकांनी आणलेल्या बलिदानाच्या हिश्‍शावर याजकांचा जो हक्क होता त्याबाबतीत ते असं करायचे:+ एखाद्याने बलिदान अर्पण केल्यावर, मांस शिजत असताना याजकाचा एक सहायक तिथे त्रिशूळ घेऊन यायचा, १४  आणि ते त्रिशूळ मोठ्या कढईत किंवा पातेल्यात शिजत असलेल्या मांसात खुपसायचा. मग त्याला लागून जितकं मांस वर यायचं ते याजक स्वतःसाठी घ्यायचा. शिलो इथे येणाऱ्‍या सगळ्या इस्राएली लोकांच्या बाबतीत ते असंच करायचे. १५  इतकंच नाही, तर एखादा मनुष्य बलिदानाची चरबी हवन+ करण्याआधीच याजकाचा सहायक त्याच्याकडे येऊन म्हणायचा: “याजकासाठी मांस भाजायला दे. तो तुझ्याकडून शिजवलेलं मांस घेणार नाही, कच्चंच घेईल.” १६  पण तो माणूस जर म्हणाला: “आधी त्यांना चरबीचं हवन करू द्या.+ मग तुम्हाला जे पाहिजे ते घ्या,” तर सहायक त्याला म्हणायचा: “नाही! मला आत्ताच दे; नाहीतर, मी ते जबरदस्तीने घेईन.” १७  ते करत असलेलं हे पाप यहोवाच्या नजरेत फार भयंकर होतं.+ कारण, यहोवासाठी अर्पण केल्या जाणाऱ्‍या बलिदानांचा ती माणसं अनादर करायची. १८  शमुवेल लहान असला, तरी मलमलीचं एफोद* वस्त्र घालून+ तो यहोवासमोर सेवा करायचा.+ १९  शमुवेलची आईसुद्धा प्रत्येक वर्षी त्याच्यासाठी बिनबाह्‍यांचा एक छोटासा झगा बनवायची. आणि दरवर्षी केलं जाणारं बलिदान अर्पण करायला+ ती आपल्या नवऱ्‍यासोबत शिलो इथे यायची, तेव्हा तो झगा त्याला द्यायची. २०  एलीने एलकानाला आणि त्याच्या बायकोला आशीर्वाद दिला आणि तो म्हणाला: “तू तुझा मुलगा यहोवाला दिलाय.* म्हणून यहोवा तुला आशीर्वाद देवो. या मुलाच्या जागी तो तुला तुझ्या या बायकोपासून आणखी एक मूल देवो.”+ मग ते आपल्या घरी परत गेले. २१  यहोवाने हन्‍नाची आठवण केली आणि तिने आणखी मुलांना जन्म दिला.+ तिला तीन मुलं आणि दोन मुली झाल्या. इकडे, लहान शमुवेल यहोवासमोर वाढत गेला.+ २२  एली आता बराच वयस्कर झाला होता. आपली मुलं सगळ्या इस्राएली लोकांशी कशी वागतात हे त्याने ऐकलं होतं.+ तसंच, भेटमंडपाच्या दाराजवळ सेवा करणाऱ्‍या स्त्रियांशी ते शरीरसंबंध ठेवतात हेही त्याच्या कानावर आलं होतं.+ २३  तो त्यांना म्हणायचा: “तुमच्या दुष्ट कामांबद्दल मी सगळ्या लोकांकडून ऐकतोय. अशा वाईट गोष्टी का करता? २४  नका माझ्या मुलांनो, असं वागू नका. यहोवाचे लोक तुमच्याबद्दल आपसात फार वाईट बोलत आहेत. २५  एखाद्या मनुष्याने दुसऱ्‍याचा अपराध केला, तर कदाचित त्याच्यासाठी यहोवाकडे कोणी विनवणी करेलही.* पण जर एखाद्याने यहोवाविरुद्धच पाप केलं,+ तर त्याच्यासाठी कोण प्रार्थना करू शकेल?” पण एलीची मुलं आपल्या वडिलांचं काहीएक ऐकायची नाहीत; यहोवाने त्यांचा नाश करायचं ठरवलं होतं.+ २६  दुसरीकडे, शमुवेल मोठा होत गेला. यहोवा आणि लोक त्याच्यावर खूश होते.+ २७  एकदा देवाचा एक माणूस एलीकडे आला आणि म्हणाला: “यहोवा म्हणतो: ‘तुझा पूर्वज आणि त्याचं घराणं इजिप्तमध्ये* फारोच्या घराण्याची गुलामी करत होतं, तेव्हा मी तुझ्या पूर्वजासमोर प्रकट झालो नव्हतो का?+ २८  मी इस्राएलच्या सर्व वंशांमधून त्याला याजक म्हणून माझी सेवा करण्यासाठी निवडलं होतं.+ माझ्या वेदीवर बलिदानं अर्पण करण्यासाठी,+ धूप जाळण्यासाठी* आणि एफोद घालून माझ्यासमोर सेवा करण्यासाठी मी त्याला निवडलं होतं. इस्राएली लोकांनी अग्नीत जाळून केलेल्या सर्व अर्पणांतला हिस्सा घेण्याचा हक्क मी तुझ्या पूर्वजाच्या घराण्याला दिला होता.+ २९  तर मग, माझ्या घरात+ मी द्यायला सांगितलेल्या अर्पणांचा आणि बलिदानांचा तुम्ही अपमान का करत आहात?* माझ्या इस्राएली लोकांनी दिलेल्या प्रत्येक अर्पणातला सगळ्यात चांगला हिस्सा घेऊन तुम्ही लठ्ठ होत आहात. तू का असं करतोस? तू माझ्यापेक्षा स्वतःच्या मुलांचा जास्त सन्मान का करतोस?+ ३०  म्हणून इस्राएलचा देव यहोवा म्हणतो: “मी म्हणालो होतो, की तुझं आणि तुझ्या पूर्वजाचं घराणं माझ्यासमोर राहून नेहमी माझी सेवा करेल.”+ पण आता यहोवा म्हणतो: “मी असं करायचा विचारसुद्धा करू शकत नाही. कारण जे माझा आदर करतात त्यांचा मी आदर करीन;+ पण जे माझा अपमान करतात त्यांचा मी तिरस्कार करीन.” ३१  बघ! अशी वेळ येत आहे जेव्हा मी तुझा आणि तुझ्या घराण्याचा अधिकार काढून घेईन.* म्हणजे तुझ्या घराण्यातला एकही माणूस म्हातारा होईपर्यंत जगणार नाही.+ ३२  मी इस्राएलची कितीही भरभराट केली, तरी तुला माझ्या घरात नेहमी एक शत्रू दिसेल.+ आणि तुझ्या घराण्यातला एकही माणूस म्हातारपणापर्यंत जिवंत राहणार नाही. ३३  तुझ्या घराण्यातल्या ज्या पुरुषाला मी माझ्या वेदीवर सेवा करत राहण्याची संधी देईन, तोसुद्धा तुला दुःख देईल आणि त्याच्यामुळे तुझी दृष्टी मंद होईल. पण तुझ्या घराण्यातले बहुतेक लोक तलवारीने मारले जातील.+ ३४  या सगळ्या गोष्टी खरंच घडून येतील हे तुला कळावं, म्हणून बघ! मी तुला हे चिन्ह देत आहे: हफनी आणि फिनहास ही तुझी दोन्ही मुलं एकाच दिवशी मरतील.+ ३५  त्यानंतर मी माझ्यासाठी एक विश्‍वासू याजक निवडीन.+ तो माझ्या इच्छेप्रमाणे वागेल. मी त्याचं घराणं कायम टिकून राहील असं करीन. आणि याजक म्हणून तो नेहमी माझ्या अभिषिक्‍तापुढे सेवा करेल. ३६  तुझ्या घराण्यातला जो कोणी वाचेल तो थोड्याफार पैशांसाठी आणि भाकरीच्या तुकड्यासाठी त्याच्याकडे येऊन त्याला नमन करेल आणि म्हणेल: “कृपा करून मला याजकाचं काहीतरी काम द्या, म्हणजे मला दोन घास खायला मिळतील.”’”+

तळटीपा

किंवा “मला बळ दिलंय.” शब्दार्थसूचीत “शिंग” पाहा.
किंवा “अडखळणाऱ्‍यांना.”
शब्दशः “ती आता कोमेजली आहे.”
किंवा “जिवंतही करू शकतो.”
हिब्रू भाषेत “शिओल.”  शब्दार्थसूची पाहा.
किंवा कदाचित, “उकिरड्यातून.”
किंवा “अभिषिक्‍ताला बळ देईल.” शब्दार्थसूचीत “शिंग” पाहा.
किंवा कदाचित, “यहोवाशी झगडणाऱ्‍यांचा थरकाप उडेल.”
किंवा “एक सेवक बनला.”
शब्दशः “उसना दिलाय.”
किंवा कदाचित, “तर देव त्याचा न्याय करेल.”
किंवा “मिसरमध्ये.”
किंवा कदाचित, “धूर वर जावा म्हणून बलिदानांचं हवन करण्यासाठी.”
शब्दशः “लाथ का मारत आहात?”
शब्दशः “हात कापून टाकीन.”