१ शमुवेल ७:१-१७

  • किर्याथ-यारीममध्ये कराराची पेटी ()

  • शमुवेलचा आर्जव: ‘फक्‍त यहोवाची उपासना करा’ (२-६)

  • मिस्पामध्ये इस्राएलचा विजय (७-१४)

  • शमुवेल इस्राएलचा न्यायाधीश (१५-१७)

 त्यामुळे किर्याथ-यारीमचे पुरुष आले आणि यहोवाच्या कराराची पेटी घेऊन गेले. त्यांनी ती पेटी टेकडीवर अबीनादाबच्या घरात ठेवली.+ तसंच, त्यांनी यहोवाच्या कराराच्या पेटीची राखण करण्यासाठी अबीनादाबचा मुलगा एलाजार याला नेमलं.* २  त्यानंतर बराच काळ लोटला. किर्याथ-यारीममध्ये कराराची पेटी आणण्यात आली, तेव्हापासून २० वर्षं लोटली. मग सर्व इस्राएली लोक यहोवाचा शोध करू लागले.*+ ३  तेव्हा शमुवेल सगळ्या इस्राएली लोकांना म्हणाला: “तुम्ही जर पूर्ण मनाने यहोवाकडे परत येणार असाल,+ तर तुमच्यामध्ये असलेली परकी दैवतं+ आणि अष्टारोथच्या मूर्ती काढून टाका.+ आपलं पूर्ण मन यहोवाकडे लावा आणि फक्‍त त्याचीच उपासना करा,+ म्हणजे तो तुम्हाला पलिष्टी लोकांपासून सोडवेल.”+ ४  तेव्हा इस्राएली लोकांनी आपल्यामधून बआल दैवतं आणि अष्टारोथच्या मूर्ती काढून टाकल्या. आणि ते फक्‍त यहोवाची उपासना करू लागले.+ ५  मग शमुवेल त्यांना म्हणाला: “सगळ्या इस्राएली लोकांना मिस्पामध्ये एकत्र जमवा,+ म्हणजे मी तुमच्यासाठी यहोवाला प्रार्थना करीन.”+ ६  तेव्हा सर्व इस्राएली लोक मिस्पामध्ये एकत्र जमले. त्यांनी पाणी काढून यहोवासमोर ओतलं आणि त्या दिवशी उपास केला.+ त्या ठिकाणी ते म्हणाले: “आम्ही यहोवाविरुद्ध पाप केलंय.”+ मग, शमुवेल मिस्पामध्ये इस्राएली लोकांचा न्यायाधीश म्हणून काम करू लागला.+ ७  इस्राएली लोक मिस्पामध्ये एकत्र जमले आहेत हे पलिष्टी लोकांना समजलं, तेव्हा त्यांचे प्रमुख+ इस्राएलशी लढाई करायला निघाले. ही गोष्ट इस्राएली लोकांनी ऐकली तेव्हा ते खूप घाबरले. ८  ते शमुवेलला म्हणाले: “आम्हाला पलिष्ट्यांच्या हातून वाचवण्यासाठी कृपा करून आमचा देव यहोवा याला मदतीसाठी विनंती करत राहा.”+ ९  तेव्हा शमुवेलने एक कोकरू घेऊन यहोवाला त्याचं होमार्पण केलं.+ त्याने इस्राएली लोकांच्या वतीने मदतीसाठी यहोवाला प्रार्थना केली आणि यहोवाने त्याची प्रार्थना ऐकली.+ १०  शमुवेल होमार्पण देत होता तेव्हा पलिष्टी लोक इस्राएलशी लढाई करण्यासाठी आणखी जवळ आले. मग त्या दिवशी यहोवाने आकाशातून ढगांचा मोठा गडगडाट करून+ पलिष्टी लोकांना गोंधळात टाकलं+ आणि ते इस्राएलपुढे हरले.+ ११  तेव्हा इस्राएली पुरुष मिस्पामधून निघाले, आणि पलिष्ट्यांचा पाठलाग करत बेथ-कारच्या दक्षिणेपर्यंत त्यांना ठार मारत गेले. १२  मग शमुवेलने एक दगड घेऊन+ तो मिस्पा व यशाना यांच्या मधे ठेवला. त्याने त्याला एबन-एजर* असं नाव दिलं. कारण तो म्हणाला: “यहोवाने आतापर्यंत आपल्याला मदत केली आहे.”+ १३  अशा रितीने पलिष्टी लोकांचा पराभव झाला. ते इस्राएलच्या प्रदेशात परत आले नाहीत.+ शमुवेल जिवंत होता तोपर्यंत यहोवाने आपला हात पलिष्टी लोकांविरुद्ध रोखून धरला.+ १४  पलिष्टी लोकांनी, एक्रोन ते गथपर्यंत बळकावलेली इस्राएलची शहरंही त्यांना परत केली; इस्राएलने पलिष्ट्यांकडून आपला प्रदेश परत मिळवला. इस्राएली लोक आणि अमोरी लोक यांच्यामध्येही शांती राहिली.+ १५  शमुवेलने आयुष्यभर इस्राएलमध्ये न्यायाधीश म्हणून काम केलं.+ १६  दरवर्षी तो बेथेल,+ गिलगाल+ आणि मिस्पा इथे दौरा करायचा आणि या सर्व ठिकाणी तो इस्राएलचा न्याय करायचा.+ १७  पण त्यानंतर तो रामामध्ये परत यायचा,+ कारण तिथे त्याचं घर होतं. आणि रामामध्येही तो इस्राएलचा न्याय करायचा. तिथे त्याने यहोवासाठी एक वेदी बांधली.+

तळटीपा

शब्दशः “पवित्र केलं.”
किंवा “शोक करत त्याच्याकडे वळले.”
म्हणजे “मदतीचा दगड.”