करिंथकर यांना दुसरं पत्र ६:१-१८

  • देवाची कृपा व्यर्थ ठरू न देणं (१, २)

  • पौलच्या सेवेचं वर्णन (३-१३)

  • विश्‍वासात नसलेल्यांसोबत जोडले जाऊ नका (१४-१८)

 त्याच्यासोबत कार्य करत असताना,+ आम्ही तुम्हाला अशी विनंतीही करतो, की देवाची अपार कृपा स्वीकारल्यावर ती व्यर्थ ठरेल असं वागू नका.+ २  कारण तो म्हणतो: “कृपेच्या काळात मी तुझं ऐकलं, आणि तारणाच्या दिवशी तुला मदत केली.”+ पाहा! आताच विशेषकरून कृपेचा काळ आहे. पाहा! आताच तारणाचा दिवस आहे. ३  आमच्या सेवेत दोष दाखवला जाऊ नये, म्हणून आम्ही कोणत्याही प्रकारे अडखळण्याचं कारण होत नाही.+ ४  तर, सर्व प्रकारे आम्ही देवाचे सेवक म्हणून स्वतःची शिफारस करतो.+ धीराने पुष्कळ दुःखं सोसून, संकटं, अडचणी आणि कठीण प्रसंगांचा सामना करून,+ ५  मारहाण आणि तुरुंगवास सहन करून,+ दंगलींना तोंड देऊन, कष्ट करून, रात्ररात्र जागून, अन्‍नपाण्याशिवाय दिवस काढून;+ ६  शुद्धतेने, ज्ञानाने, सहनशीलतेने,+ दयाळूपणाने,+ पवित्र शक्‍तीने,* निष्कपट प्रेमाने,+ ७  खरं बोलण्याद्वारे, देवाच्या सामर्थ्याने;+ उजव्या* आणि डाव्या हातात* नीतिमत्त्वाची शस्त्रं घेऊन,+ ८  गौरवाने आणि अपमानाने, निंदेने आणि स्तुतीने आम्ही स्वतःची शिफारस करतो. आम्हाला फसवणूक करणारे असं समजलं जातं, तरीही आम्ही खरं बोलतो. ९  आम्ही अनोळख्यांसारखे असलो, तरी आम्हाला ओळखलं जातं. आम्ही मरायला टेकलेल्यांसारखे असलो,* तरी पाहा! आम्ही जिवंत आहोत;+ शिक्षा देण्यात आलेल्यांसारखे* असलो, तरी आम्हाला मृत्यूच्या स्वाधीन करण्यात आलेलं नाही.+ १०  आम्ही शोक करणाऱ्‍यांसारखे असून नेहमी आनंदी राहतो; आम्हाला गरीब समजलं जात असूनही, आम्ही पुष्कळ जणांना श्रीमंत करतो; कंगाल समजलं जात असूनही, आमच्याजवळ सगळं काही आहे.+ ११  करिंथकरांनो, आम्ही तुमच्याशी अगदी मोकळेपणाने बोललो आहोत आणि आम्ही आमचं मन मोठं केलं आहे. १२  आम्ही तुमच्यावर अगदी पूर्ण मनाने प्रेम करतो,*+ पण तुमची मनं आमच्याबद्दल संकुचित आहेत.* १३  म्हणूनच, मी तुम्हाला स्वतःची मुलं समजून असं सांगतो, की तुम्हीसुद्धा तुमची मनं मोठी करा.+ १४  विश्‍वासात नसलेल्यांसोबत जोडले जाऊ नका.*+ कारण नीती आणि अनीतीचा काय संबंध?+ किंवा उजेड आणि अंधार यांच्यात काय मेळ?+ १५  शिवाय, ख्रिस्त आणि सैतान* यांच्यात काय सारखेपणा?+ विश्‍वास ठेवणारा* आणि विश्‍वासात नसलेला यांचा काय संबंध?*+ १६  आणि देवाच्या मंदिराचा, मूर्तींसोबत कसा मेळ बसेल?+ कारण आपण एका जिवंत देवाचं मंदिर आहोत.+ जसं स्वतः देवाने म्हटलं: “मी त्यांच्यामध्ये राहीन+ आणि त्यांच्यामध्ये चालीन, आणि मी त्यांचा देव होईन आणि ते माझे लोक होतील.”+ १७  “ ‘म्हणून, त्यांच्यातून बाहेर निघा आणि स्वतःला त्यांच्यापासून वेगळं करा,’ ‘आणि अशुद्ध वस्तूला स्पर्श करू नका’ ”;+ “ ‘म्हणजे मी तुम्हाला स्वीकारीन,’ असं यहोवा* म्हणतो.”+ १८  “ ‘मी तुमचा पिता होईन+ आणि तुम्ही माझी मुलं आणि माझ्या मुली व्हाल,’+ असं सर्वसमर्थ देव यहोवा* म्हणतो.”

तळटीपा

कदाचित हल्ला करण्यासाठी.
कदाचित स्वतःचा बचाव करण्यासाठी.
किंवा “आम्हाला मरण्याच्या लायकीचं समजलं जात असलं.”
किंवा “ताडन करण्यात आलेल्यांसारखे.”
किंवा “तुम्ही मात्र आमच्यावर पूर्ण मनाने प्रेम करत नाही.”
किंवा “आमचं मन संकुचित नाही.”
शब्दशः “असमान जुवाखाली येऊ नका.”
किंवा “भागीदारी.”
किंवा “विश्‍वासू व्यक्‍ती.”
शब्दशः “बलियाल.” “कुचकामी” या अर्थाच्या हिब्रू शब्दापासून आलेला.
अति. क५ पाहा.
अति. क५ पाहा.