प्रश्न २
तुम्ही देवाबद्दल कसं शिकून घेऊ शकता?
“हे नियमशास्त्र नेहमी तुझ्या ओठांवर असू दे. त्यातल्या सर्व आज्ञांचं काळजीपूर्वक पालन करण्यासाठी त्यावर रात्रंदिवस मनन कर. असं केलंस तर तू यशस्वी होशील आणि सुज्ञपणे वागशील.”
“ते पुस्तकातून, म्हणजेच खऱ्या देवाच्या नियमशास्त्रातून वाचत राहिले. त्यांनी ते लोकांना चांगल्या प्रकारे समजावून सांगितलं आणि वाचलेल्या गोष्टींचा अर्थ स्पष्ट केला. अशा रितीने, जे वाचलं जात होतं, ते समजून घेण्यासाठी त्यांनी लोकांना मदत केली.”
“सुखी आहे तो माणूस, जो दुष्टांच्या सल्ल्याप्रमाणे वागत नाही; . . . तर तो यहोवाच्या नियमशास्त्रावर मनापासून प्रेम करतो, आणि रात्रंदिवस त्याच्यावर विचार करतो। . . . तो जे काही करतो त्यात त्याला यश मिळतं.”
“फिलिप्प जाऊन त्या रथासोबत धावू लागला. तेव्हा तो माणूस यशया संदेष्ट्याच्या पुस्तकातून वाचत असल्याचं त्याने ऐकलं. तो त्याला म्हणाला: “तुम्ही जे वाचताय ते तुम्हाला खरंच कळतंय का?” तो म्हणाला: “कोणी समजावून सांगितल्याशिवाय ते मला कसं कळेल?”
“जगाच्या निर्मितीपासूनच देवाचे अदृश्य गुण, म्हणजे त्याचं सर्वकाळाचं सामर्थ्य आणि देवपण हे त्याने निर्माण केलेल्या गोष्टींवरून अगदी स्पष्टपणे दिसून येतं. आणि यामुळे खरंतर देवावर विश्वास न ठेवण्यासाठी ते कोणतंही निमित्त सांगू शकत नाहीत.”
“या गोष्टींबद्दल खोलवर विचार करत राहा; त्यांत अगदी गढून जा, म्हणजे तुझी प्रगती सर्वांना स्पष्टपणे दिसून येईल.”
“एकमेकांचा विचार करून आपण प्रेम आणि चांगली कार्यं करण्यासाठी एकमेकांना उत्तेजन देऊ या. तसंच, . . . आपण एकत्र येणं सोडू नये.”
“तुमच्यापैकी कोणाला बुद्धीची गरज असली, तर त्याने ती देवाजवळ मागत राहावी म्हणजे त्याला ती दिली जाईल. कारण देव कोणालाही कमी न लेखता सगळ्यांना उदारपणे बुद्धी देतो.”