प्रश्न १९
बायबलमधल्या वेगवेगळ्या पुस्तकांमध्ये कोणती माहिती आहे?
हिब्रू शास्त्र (“जुना करार”)
पहिली पाच पुस्तकं (५ पुस्तकं):
उत्पत्ती, निर्गम, लेवीय, गणना, अनुवाद
निर्मितीपासून प्राचीन इस्राएल राष्ट्राच्या स्थापनेपर्यंत
ऐतिहासिक पुस्तकं (१२ पुस्तकं):
यहोशवा, शास्ते, रूथ
इस्राएली लोकांचा वचन दिलेल्या देशात प्रवेश आणि त्यानंतरच्या घटना
१ आणि २ शमुवेल, १ आणि २ राजे, १ आणि २ इतिहास
यरुशलेमचा नाश होईपर्यंत इस्राएल राष्ट्राचा इतिहास
एज्रा, नहेम्या, एस्तेर
बाबेलच्या बंदिवासातून परत आलेल्या यहुद्यांचा इतिहास
कवितेच्या रूपात असलेली पुस्तकं (५ पुस्तकं):
ईयोब, स्तोत्रं, नीतिवचनं, उपदेशक, गीतरत्न
सुविचारांचे आणि गीतांचे संग्रह
भविष्यवाण्यांची पुस्तकं (१७ पुस्तकं):
यशया, यिर्मया, विलापगीत, यहेज्केल, दानीएल, होशेय, योएल, आमोस, ओबद्या, योना, मीखा, नहूम, हबक्कूक, सफन्या, हाग्गय, जखऱ्या, मलाखी
देवाच्या लोकांबद्दल असलेल्या भविष्यवाण्या
ख्रिस्ती ग्रीक शास्त्र (“नवा करार”)
आनंदाच्या संदेशाची पुस्तकं (४ पुस्तकं):
मत्तय, मार्क, लूक, योहान
येशूच्या जीवनाचा आणि सेवाकार्याचा वृत्तान्त
प्रेषितांची कार्यं (१ पुस्तक):
ख्रिस्ती मंडळीची सुरुवात आणि आनंदाच्या संदेशाचा प्रसार याबद्दल माहिती
पत्रं (२१ पुस्तकं):
रोमकर, १ आणि २ करिंथकर, गलतीकर, इफिसकर, फिलिप्पैकर, कलस्सैकर, १ आणि २ थेस्सलनीकाकर
वेगवेगळ्या ख्रिस्ती मंडळ्यांना लिहिलेली पत्रं
१ आणि २ तीमथ्य, तीत, फिलेमोन
ख्रिस्ती व्यक्तींना लिहिलेली पत्रं
इब्री लोकांना, याकोब, १ आणि २ पेत्र, १, २ आणि ३ योहान, यहूदा
ख्रिस्ती बांधवांना लिहिलेली पत्रं
प्रकटीकरण (१ पुस्तक):
प्रेषित योहानला दाखवण्यात आलेले भविष्याबद्दलचे दृष्टान्त