लोटच्या बायकोला लक्षात ठेवा

येशूने जवळजवळ २,००० वर्षांआधी दिलेला इशारा पूर्वी कधी नव्हता तितका आज महत्त्वाचा आहे. येशूने ज्या धोक्यांबद्दल इशारा दिला होता त्यांपासून ब्रायन आणि ग्लोरिया आपल्या कुटुंबाचं कसं रक्षण करतात हे पाहा.

लोटच्या बायकोला लक्षात ठेवा—भाग १

देवाची सेवा आणि पैसा कमवणं या दोन्हीमध्ये निवड करताना आधुनिक काळातल्या एका ख्रिस्ती कुटुंबाची कशी ओढाताण होते?

लोटच्या बायकोला लक्षात ठेवा—भाग २

कोणत्या गोष्टींमुळे आपली आध्यात्मिक दृष्टी अस्पष्ट होऊन आपण आध्यात्मिक आणि नैतिक तत्त्वांशी तडजोड करण्याची शक्यता आहे?

लोटच्या बायकोला लक्षात ठेवा—भाग ३

येशूने त्या कुटुंबाची गोष्ट आपल्याला इशारा देण्यासाठी सांगितली होती. लोटची बायको त्या संकटातून वाचू शकली असती आणि आपणही वाचू शकतो.