व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

गीत १०२

दुर्बळांना मदत करू या

दुर्बळांना मदत करू या

(प्रेषितांची कार्यं २०:३५)

  1. १. ए-क-ही ज्यात दो-ष ना,

    आ-हे कोण अ-सा?

    के-ली दे-वा-ने त-री,

    आ-भा-ळ-मा-या.

    मे-घ कृ-पे-चा तो,

    प्री-ती व-र्ष-वि-तो.

    द्या-वे आ-म्ही-ही त-से,

    प्रे-म दु-र्ब-ळां.

  2. २. ले-क-रे य-हो-वा-ची,

    सा-री प्रि-य त्यास.

    बो-लु-नी प्रे-मा-चे बोल,

    दे-ऊ त्यां-ना आस.

    आ-सू प्र-त्ये-का-चा,

    तो ले-खी मो-ला-चा.

    ला-गो बां-ध-वां-चे घाव,

    आम-च्या-ही म-नास.

  3. ३. जी-वन हे क-ठीण कि-ती,

    या दु-ष्ट ज-गी.

    बां-ध-व कि-ती-त-री,

    ओ-झी वा-ह-ती.

    वा-हू या त्यां-चा भार,

    दे-ऊ त्यां-ना आ-धार,

    दा-ख-वू या दु-र्ब-ळां,

    दे-वा-ची प्री-ती.