व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

गीत ७०

योग्य लोकांना शोधा

योग्य लोकांना शोधा

(मत्तय १०:११-१५)

  1. १. सं-दे-श रा-ज्या-चा सां-गा-य-ची रीत,

    दा-खव-ली ये-शू-ने आ-म्हा:

    ‘म-ना-ने जे दीन, ऐ-क-ण्या जे आ-तुर,

    जा-ऊन शो-धा तु-म्ही त्या लो-कां.

    क-रा न-म-स्कार तु-म्ही जाल ज्या घ-री,

    क-रे स्वा-गत त्या शां-ती मि-ळे.

    पण ना-का-र-ले जर का त्यां-नी तु-म्हा,

    झट-का धूळ पा-यां-ची व्हा पु-ढे’

  2. २. स्वी-का-र-ती जे तु-म्हा-ला प्रे-मा-ने,

    ते स्वी-का-र-ती ये-शू-ला.

    अ-से ज्यां-ना दे-वा-च्या ज्ञा-ना-ची भूक,

    ये-तील ते सो-ब-ती तु-म-च्या.

    बो-ला-वे क-से, का-य बो-ला-य-चे,

    न-को या-ची चिं-ता तु-म्हा-ला.

    श-ब्दां-म-ध्ये चव अ-सू द्या प्रे-मा-ची,

    आ-व-डे ती न-म्र लो-कां-ना.