अशांत जगात शांतीने राहू या!
१. नव्या दिवसाच्या त्या प्रवासाची, सुरुवात मी करताच.
लोक रागीट, धीर ना त्यांच्यात, चोहीकडे पाहा.
जिवाला प्रत्येक, चिंता अनेक, गरज दयेची त्यां.
शांत राहण्या, करेन प्रार्थना, शक्ती देईल याह मला!
(कोरस)
जग अशांतीचं, नाही प्रेमाचं. कसं जगू कळेना?
ना सोपं ते जरीही, पाहेन पुढे मी, घेतंय जग नवं ते आकार.
२. हा दिवस असाच पुढे चालतो, नि हवा बदलू लागे.
कुणी ओरडे, कुणी रुसे. लपू आता मी कुठे?
ना हे कायमचं, हे स्वतःला मी, सांगतो सारखं.
शब्द आवरेन, ना कधी रागवेन, याहाला आठवेन!
(कोरस)
जग अशांतीचं, नाही प्रेमाचं. कसं जगू कळेना?
ना सोपं ते जरीही, पाहेन पुढे मी, घेतंय जग नवं ते आकार.
(जोडणाऱ्या ओळी)
जगाला नाकारणं,
सोपं नाही हे करणं.
या विखुरलेल्या जगामध्ये,
देतो शांती याहा मना.
३. जातो सोबती आम्ही प्रचारा, देण्या संदेश शांतीचा,
चुकीच्या समजुती, लोक रागवती, कडू बोल, डोळ्यात राग.
रागाच्या आगीला विझवण्या निघतो आपण तिथून,
चेहरे हासरे, बोल चांगले, राही शांती ती टिकून.