“आनंदी राहा!”
१. जाईल जिथे ही नजर,
आकाशात, धरतीवर,
देवाची किमया, चोहीकडे त्याची कृपा.
पण नाही तोड त्याच्या असीम प्रेमाला; जपू हा ठेवा.
(कोरस)
स्तुती यहोवाची गाऊ या.
सेवा करू त्याची.
आली समोर दुःखं लाख जरी,
सौख्याची ही चावी.
आनंदी राहा! आनंदी राहा!
आनंदी राहा! आनंदी राहा!
२. नाती ही जिव्हाळ्याची,
एकी ही भावांची.
देवाच्या या देणग्या, अतूट या रेशीमगाठी.
साखळ्या कैद करतील, पण आनंद ना हरवेल कधी.
(कोरस)
स्तुती यहोवाची गाऊ या.
सेवा करू त्याची.
आली समोर दुःखं लाख जरी,
सौख्याची ही चावी.
आनंदी राहा! आनंदी राहा!
आनंदी राहा! आनंदी राहा!
(जोडणाऱ्या ओळी)
पृथ्वी एक सुंदर बाग, होईल कायमची,
अर्पण येशूचे अनमोल, देई खरी मुक्ती.
(कोरस)
स्तुती यहोवाची गाऊ या.
सेवा करू त्याची.
आली समोर दुःखं लाख जरी,
सौख्याची ही चावी.
आनंदी राहा! आनंदी राहा!
आनंदी राहा! आनंदी राहा!
आनंदी राहा! आनंदी राहा!
आनंदी राहा! आनंदी राहा!
आनंदी राहा! आनंदी राहा!
आनंदी राहा! आनंदी राहा!
आनंदी राहा!