व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

गीत ४५

उन्‍नती करू या!

उन्‍नती करू या!

(इब्री लोकांस ६:१)

१. करू या उन्‍नती, चालू या पुढे!

झटुनी सेवेत निपुण होऊ सारे!

देता राज्या सदा स्थान पहिले,

मिळे याहाची कृपा.

सोपिले राज्याचे बीज आम्हा,

पेरू या सर्व नम्र मनांत,

अंकुरे बीज ते वाढुनी जेव्हा,

होई गौरव याहाचा.

२. करू या उन्‍नती, देऊ या मदत!

पाणी घालुनी रोपांची करू मशागत,

वाढण्या देऊ त्यां आधार सतत,

याह देईल फळ आम्हा.

आहे भव्य जरी कार्य हे,

त्याचा आत्मा साहाय्य करे.

वाहता सर्वस्व यास आम्हा मिळे

समाधानाचा ठेवा.

३. करू या उन्‍नती, ना मागे फिरता!

झाले राज्य सुरू, सांगू या हे सर्वांना!

आणो विघ्न कितीही वैरी आता,

करू याहाची सेवा.

येशूच्या पावलांवर चालू,

सर्वदा याहावर विसंबू,

नेक मार्गावरी नेटाने चालू,

लाभेल जीवन आम्हा!