गीत १३
उपकारस्तुतीची प्रार्थना
१. वंदितो देवा यहोवा तुला,
स्तुतीस पात्र सर्वसमर्था!
विनंत्या आमुच्या ऐकणाऱ्या,
जीवन केले स्वाधीन तुझ्या.
पुत्र रुधिराचे मोल देऊन,
तारिले तू मृत्यूच्या गर्तेतून.
पावले ढळती पदोपदी,
सावर आम्हा क्षमा करुनी.
२. येउनी याहा तुझ्या मंदिरी,
आराधना करितो अंगणी,
राहतो नित्य तुझ्या जवळी,
बोध तुझा जीवना उजळी.
सामर्थ्य तुझे विशाल किती!
बळ ते दासांना तुझ्या देई!
राज्य तुझे येवो तारणहारा,
वाहू सर्वस्व त्याच्या प्रचारा.
३. राज्य तुझे याहा आणील सुकाळ,
संपवुनी मृत्यू, दुःखांचा काळ,
शांती सुखाचा शिंपेल सडा,
व्यापेल गंध मनी हर्षाचा.
दुष्ट सत्तेचा करुनी विनाश,
स्थापील ख्रिस्त नीतीचे आकाश!
जल्लोष करू सारे मिळुनी,
‘याह राजा आमुचा गौरवी!’
(स्तो. ६५:२, ४, ११; फिलिप्पै. ४:६ देखील पाहा.)