व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

गीत ५३

ऐक्य जपू या

ऐक्य जपू या

(इफिसकर ४:३)

१. आणले याहाने आम्हा,

प्रीतीच्या छायेत त्याच्या,

जोडले त्याने आम्हाला

ऐक्याच्या बंधनात.

ऐक्याची इमारत

प्रीतीवर उभी.

प्रीती बांधवां करू या,

आपुलकी त्यां दाखवू या,

धीराने निरंतर नीट,

रचू एकेक वीट.

२. एकदिलीने राहू सारे,

दाखवू या प्रेम खरे,

प्रीतीने राहू मिळुनी

शांतीच्या सदनी.

शांती देई आम्हा

गार ताजवा.

एकी ख्रिस्ती बांधवांची,

देणगी असे याहाची,

यत्न नेटाने करुनी

जपू अनुदिनी.