व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

गीत २५

ख्रिस्ताच्या शिष्यांचे ओळखचिन्ह

ख्रिस्ताच्या शिष्यांचे ओळखचिन्ह

(योहान १३:३४, ३५)

१. ‘प्रीती करा इतरांवरी!’

येशूची आज्ञा राजसी,

पाळुनी नेटाने सर्वदा

शिष्य ख्रिस्ताचे शोभू या.

दाखवुनी खरे प्रेम स्वतः

वाहिले त्याने जीवना.

चालू या पाऊलखुणांवर त्याच्या,

मार्गावरी या प्रीतीच्या.

२. स्नेह मनी वसता खरा

आटेना हा कधी झरा,

सांत्वन देउनी दुर्बळां,

भागवू या त्यांची तृषा.

नाही जगी दिसणार प्रीती

दाखविती ख्रिस्ती जशी,

प्रेम निरंतर सर्वां देऊन,

फेडू या हे अनंत ऋण.