व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

गीत ६

देवाच्या सेवकाची प्रार्थना

देवाच्या सेवकाची प्रार्थना

(इफिसकर ६:१८)

१. प्रेमळ पित्या, यहोवा देवा,

गाऊ तुझ्या नावाचा महिमा!

प्रेमदया विशाल तुझी,

आहे अचल ती सूर्यापरी!

प्रेमदया सूर्यापरी

अविचल आहे तुझी.

२. दान आम्हा सुबुद्धीचे दे,

जीवनातून दाखवू आम्ही ते,

प्रेम ओथंबुनी तू असे,

आमच्या मनातुनी वाहू दे.

प्रेम मनातुनी असे

ओथंबुनी वाहू दे.

३. दे सत्याचा प्रकाश आम्हा,

शोधू आम्ही सर्व नम्र जनां.

लोकांनी ओळखावे तुला,

होऊ दे आम्हा ज्योती अशा.

ओळखावे त्यांनी तुला

होऊ दे ज्योती अशा.