गीत २८
नवे गीत
१. गीत गाऊ या, यहोवाच्या स्तुतीचे गीत!
थोर पराक्रम त्याचे आहेत शब्दांतीत!
गाऊ जयजयकार, विजयी राज्याचा त्याच्या!
न्यायनीती त्याची कळावी सर्वांना.
(कोरस)
गाऊ या,
यहोवाची स्तुती,
तो राजा,
आमचा गौरवशाली!
२. सारे गाऊ या, मिळून गीत आनंदाचे.
नाव उंचावू या साऱ्या जगी त्याचे!
गाती गीत नवे, थवे लोकांचे एकसुरात,
वीणा, डफ, सारंग्या देती सुरेल साथ.
(कोरस)
गाऊ या,
यहोवाची स्तुती,
तो राजा,
आमचा गौरवशाली!
३. गाते ही धरा, नभीच्या ज्योतीही साऱ्या,
सागरात उठती लहरी आनंदाच्या.
सारी निर्मिती करिते याहाचे स्तवन,
डोंगर दऱ्यांतून निनादो हे भजन!
(कोरस)
गाऊ या,
यहोवाची स्तुती,
तो राजा,
आमचा गौरवशाली!
(स्तो. ९६:१; १४९:१; यश. ४२:१० देखील पाहा.)