व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

गीत ४०

पहिल्याने राज्यासाठी झटा!

पहिल्याने राज्यासाठी झटा!

(मत्तय ६:३३)

१. वैभवी याहाचे राज्य,

सोपिले जे ख्रिस्ताला,

कणा मोडुनी वैऱ्‍याचा,

करील अंत दुःखांचा!

(कोरस)

झटू देवराज्यासाठी,

नीती याहाची शोधू,

गाजवू जगी सुवार्ता,

याहाच्या नावा स्तवू!

२. आम्हा का फिकीर उद्याची?

याह जाणतो गरजा.

ठेवता प्रथम राज्याला,

सांभाळील तो आम्हा.

(कोरस)

झटू देवराज्यासाठी,

नीती याहाची शोधू,

गाजवू जगी सुवार्ता,

याहाच्या नावा स्तवू!

३. याहाच्या नीतीचा मार्ग

दाखवू भल्या लोकां,

शिकवू धीराने त्यांना,

आस याहाची धरण्या.

(कोरस)

झटू देवराज्यासाठी,

नीती याहाची शोधू,

गाजवू जगी सुवार्ता,

याहाच्या नावा स्तवू!